क्राइम

अखेर त्या महिलेच्या खुनाचा काही तासांत उलगडा: पैशाच्या वादातून महिलेस दगडाने ठेचून आणि ब्लेडच्या साह्याने गळा चिरून खुन केल्याचा तपासात उघड सराईत आरोपी अटक!

पुसद ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपीचा अवघ्या काही तासात शोध घेण्यात मोठे यश!

पुसद: ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सांडवा- मांडवा रस्त्यालगत मारोतीच्या मंदिर परिसरात एका ४५ वर्षी महीलेचा दगडाने ठेचलेला व गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता त्यावेळी सदर महिलेची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले होते सदर मयत महिलेचे नाव अलका सुखदेव सोयाम (वय ४५ रा. वसंत नगर पुसद) असे होते आता या महिलेचा खून झाल्या पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी प्रेमदास लखू आडे (वय ४६, रा. नारळी, ता. उमरखेड) या आरोपीला नारळी परिसरातून पोलिसांनी अटक केली असून, पैशाच्या मागणीवरून झालेल्या वादातून हा खून केल्याची कबुली दिली आहे.

तालुक्यातील सांडवा-मांडवा रस्त्यालगत असलेल्या मारोती मंदिराच्या परिसरात दि १० ऑगस्ट२०२६ रोजी एका ४५वर्षीय अनोळखी महिलेचा गळा चिरून डोक्यावर दगडाने मार असलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. त्यावेळी सांडवा येथील पोलीस पाटलांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असता प्रथम दर्शनीय मृतदेहाची पाहणी केली असता कोणीतरी अज्ञात व्यक्तीने सदर महिलेचा खून करून या परिसरात फेकून दिल्याचा संशय आला होता परंतु सदर महिलेची ओळख पटविण्याकरिता पोलीस प्रशासनाने वेगवेगळे दहा पथके तयार करून शोधकामी लावले असता अथक प्रयत्नानंतर एका पथकाला मयत महिलेचे नाव अलका सुखदेव सोयाम असल्याचे कळाले त्यावेळी या मृतदेहाची ओळख पटली त्यावरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुना नंबर ५१८/ २०२६ कलम १०३(१)भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.परंतु जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी सदर गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा उघडकीस अन्याकरीता अधीक्षक केले त्यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे अशीच चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली १० पथके तयार करून परिसरातील दीडशे ते दोनशे सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी केली असता तसेच गोपी नाहीये बातमीदाराकडून माहिती काढण्याचा प्रयत्न करीत असताना मयत अलका सुखदेव सोयाम हिला डोक्याला भगव्या रंगाचा फेटा बांधून असलेल्या आणि त्यास लांब दाढी केस असलेल्या माणसासोबत बोलत असताना व नंतर त्याचे मोटरसायकलवर बसून जाताना पाहिल्याचे खबऱ्याने सांगितल्यावरून पुसद शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी केली असता मिळालेल्या माहितीच्या आधारे तो इसम या महिलेला घेऊन जाताना दिसून आला त्यावरून पोलिसांनी अनोळखी आरोपी बाबत गुप्त माहिती दराकडून खात्रीलायक माहिती प्राप्त करून घेतली की सदर इसम हा नारळी ता. उमरखेड जि. यवतमाळ येथील रहिवाशी असून त्याचे नाव प्रेमदास लखू आडे वय ४५ वर्षे असे आहे. त्यावेळी ग्रामीण पोलिसांच्या पथकांनी व महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सदानंद वानखेडे यांच्या सहकार्याच्या कौशल्याने सीसीटीव्ही फुटेच्या आधारे उमरखेड तालुक्यातील नारळी शिवारात सापळा रचून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सदर आरोपीने पहिले तर उडवाउडीचे उत्तर दिले त्यानंतर पोलिसांनी पोलिसी खाकीया दाखवताच आरोपीने पैशाच्या देवाण-घेवाणी वरून मयत महिलेस दगडाने ठेचून तिचा रेजर ब्लेडने गळा कापून ठार मारले व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने सांडवा मांडवा शिवारात फेकून दिले असल्याची कबुली दिल्याने पोलिसांनी अवघ्या २४ तासाच्या आत या खुनाच्या उलगडा करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले. परंतु विशेष बाब म्हणजे सदर आरोपी यापूर्वी सुद्धा खून चोरी सारख्या दखलपात्र आणि गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात आरोपी आल्याची पोलिसांची माहिती आहे.

सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधिक्षक यवतमाळ कुमार चिंता सा.मा. अप्पर पोलीस अधिक्षक यवतमाळ अशोक थोरात सा., यांचे मार्गदर्शनात तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, पुसद अमर मोहीते सा. पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांचे नेतृत्वात पोलीस ठाणे पुसद ग्रामीण ठाणेदार आशिष चौधरी,पोलीस ठाणे महागाव पोनि / सेवानंद वानखेडे यांच्या सहकार्याने पोउपनि राहूल देशमूख, रवि चव्हाण, ससाने, पो. स्टे. वसंतनगर येथील सुगत पंढगे, पोशि / राठोड ,पुंडलीक वानखडे, शेख जब्बार, सफी मसूद शेख, पोहेका रविंद्र गावंडे, पोअ / अक्षय मोटे, योगेश आळणे, मो. ताज, केशव मुंढे, इमान, संदीप आडे, व आर.सी. पी पथक स्थानिक गुन्हे शाखा कॅम्प पुसद येथील सपोनि / धिरज बांडे, सपोनि / गजानन राजमल्लु, पोउपनि / अमोल राठोड, सागर इंगळे, सफा / मुन्ना आडे, संतोष भोरगे, पोहवा / कुणाल मुंढोकार व पथक,पोलीस ठाणे पुसद शहर येथील सपोनि / गजानन करेवाड, पोउपनि / अक्षय सनगर, पोशि / भगत, पोशि/मनोज कदम, पोशि/ आकाश बाभुळकर, यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close