पुसद शहराच्या रस्त्यांवर दिसला देशभक्तीचा जल्लोश;तिरंगा रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद!

पुसद : शहराच्या रस्त्यांवर दिसला देशभक्तीचा जल्लोश, स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या़च्या आवाहानाला प्रतिसाद देत आणि जनमानसात व विद्यार्थ्यांत देशभक्तीची भावना जागृत करण्यासह राष्ट्रध्वज तिरंग्याबद्दल आदर, अभिमान, आत्मीयता निर्माण करण्याच्या उद्देशाने शहरात माजी आमदार ॲड. निलयभाऊ नाईक यांच्या नेतृत्वात शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील चोंढीकर आणि संस्थेच्या सचिव सौ.अश्विनीताई चोंढीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिस्तबद्ध भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
आज सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या प्रांगणात शहरातील सर्व पक्षीयांसह परिसरातील सर्व शैक्षणिक संस्थांनी आपल्या विद्यार्थ्यासह राष्ट्रभक्तीने प्रेरीत होऊन आपला मोठा सहभाग नोंदविली होता.
या शाळेच्या प्रांगणातुन रॅलीला सुरुवात करण्यात आली या रॅलीत पुसद शहरातील श्री शिवाजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय पुसद, गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कुल, श्री शिवाजी अध्यापक विद्यालय, मातोश्री विद्यालय पुसद, वसंतराव नाईक विद्यालय पुसद, गुणवंतराव देशमूख विद्यालय पुसद, डॉ पंजाबराव देशमुख अध्यापक विद्यालय पुसद, समर्थ इंग्लिश मिडीयम स्कुल पुसद, मातोश्री शाळा,वसंतराव पुरके विद्यालय बोरगडी अदी शाळेचे विध्यार्थी सहभागी झाले होते या रॅलीत श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रात्याशिके सादर करण्यात आले.
सर्वप्रथम ही रॅली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्यापासून- नेताजी सुभाषचंद्र बोस चौक- महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक- राष्ट्रपिता माहत्मा गांधी चौक मार्गेक्रम करीत तहसील कार्यालयाच्या प्रांगणातील जयस्तंभ चौकात राष्ट्रगीताने या रॅलीचा समारोप करण्यात आला .
रॅलीत शहरवासीयांसह विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी, व्यापारी, शाळा-विद्यालयांतील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटनांनी सहभाग नोंदवला. तिरंगा हातात घेऊन देशभक्तीच्या घोषणांनी भारावलेल्या वातावरणात निघालेल्या या रॅलीने शहरात राष्ट्रप्रेमाचा उत्साह निर्माण केला. रॅलीच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी सहभागी शाळा- विद्यालयांचे प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, पोलीस प्रशासनाचे नागरिकाचे आभार मानले. ही रॅली यशस्वी करण्यासाठी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या शिक्षक-शिक्षीका कर्मचारी वृंद यांचे विशेष योगदान लाभले या सर्वांनी रॅलीच्या नियोजनापासून अंमलबजावणी पर्यंत अपार मेहनत घेतली.
विशेष म्हणजे-राष्ट्रभक्तीचे ज्ञान पाजणाऱ्या शहरातील स्थानिक भाजपने स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या ‘तिरंगा रॅलीत’ सुद्धा पक्षांतर्गत पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये गटबाजी आणि राजकीय वाद पाहावयास मिळत होते या रॅलीच्या माध्यमातून पक्षसंघटना मजबूत करण्याचा प्रयत्न होत असतानाच, स्थानिक पातळीवरील अंतर्गत मतभेद आणी पदाधिकाऱ्यांमधील नाराजी चव्हाट्यावर आली स्थानिक भाजपने पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे नगर परिषदेची सत्ता सुद्धा गमावली, आणि एक मोठा पक्ष सत्ताधाऱ्यांच्या वळणीला जाऊन बसला ही वस्तुस्थिती आहे. नगर परिषदेच्या निवडणुकीपूर्वी स्थानिक नेत्यांमधील वाद, तिकिट वाटपातील नाराजी आणि बंडखोरीमुळे स्थानिक भाजपला स्वबळावरच्या सत्तेपासून दूर राहावे लागले तरीही देश हिताच्या गप्पा मारणाऱ्या पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मात्र याचे भान राहिले नाही नगर परिषदेत साटंलोटं करून सत्तेत येऊनही काही महिने झाल्यानंतरही सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांची आपल्याच नेत्याबाबत अजूनही नाराजी दूर झाल्याचे चित्र दिसून येत नाही या पक्षाचे दोन तीन गट निर्माण झाल्याने नेते मात्र लंकेमधील त्या बिभिशनचा शोध घेत आहेत. वाढते सत्ताकेंद्र, अंतर्गत गटबाजीमुळे भाजपची मात्र या मतदारसंघात पिछेहाट सुरू झाली असून याचा फटका येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या पक्षाकडून स्थानिकांच्या अशा मावळ्या सारख्या आहेत ज्या पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी देश हिताच्या किंवा सन्मानाच्या मुद्द्यावर एका झेंड्याखाली एका नेत्याच्या नेतृत्वाखाली येण्यास धजावत नाहीत ते जनसमान्याच्या प्रश्नासाठी एकत्रित केव्हा येतील अशी भावना सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केली जात आहे.



