येलदरी घाटातील रस्त्यांवर एकांतात गाठून भाजीविक्रेत्याला लुटणाऱ्या टोळीला ग्रामीण पोलिसांनी केले जेरबंद!

पुसद : ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील येलदरी घाटातील रस्त्यांवर भाजीपाला विक्रेत्याला एकांतात रस्त्यात अडवून चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीस ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहे. जबरदस्तीने हिसकावून घेतलेलेल्या पैशापैकी तीन हजार रुपये गुन्ह्यात वापरलेला चाकू व हीरो कंपनीची स्प्लेंडर मोसा क्रं.२९ सीके ००६५ असा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त केला असून यामध्ये १) शेख समीर उर्फ सोनू शेख जमील (वय २३ वर्ष रा. तलाव फैल यवतमाळ ह. मु. तुकाराम बापू वार्ड पुसद) आणि २) तौफिक उर्फ भैय्यू शेख हापिज (वय २० वर्ष, रा. तुकाराम बापू वार्ड)यांना जेरबंद करण्यात ग्रामीण पोलिसांना मोठे यश आले आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी ‘झेप न्यूज’ ला दिलेली माहिती अशी, फिर्यादी यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन पुसद येथे दि. २९ मे २०२६ रोजी फीर्याद दाखल केली होती की, नियमित पणे भाजीपाला विक्री करून पुसद वरून मोटर सायकलने ग्राम जनना, ता. पुसद येथे जाण्याकरीता निघाला असता अं. रात्री ०८/३० वाजण्याच्या सुमारास पाठीमागून येणाऱ्या दोन अज्ञातांनी अ.वय २० ते २५ वर्ष वयाच्या दुचाकी स्वराने त्यांची दुचाकी माझ्या दुचाकीच्या समोर आडवी लावून शिवीगाळ करू लागले व दुसरीकडे चाकुचा धाक दाखवून त्याच्या खिश्यातील नगदी ७००० रू. व आयटेल कंपनीचा मोबाईल की. अं. १००० रू. मोबाईल असा एकूण ८००० रू. माल जबरदस्तीने काढून पुसदकडे पळून गेले. अश्या तक्रारीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नंबर ३५०/२०२६ कलम ३०९(४),१२६ (२),३५२,३(५), भा. न्या.सं. अधि. २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलिस अधिक्षक साहेब, यवतमाळ यांनी गुन्हा उघडकीस आणण्या बाबत आदेशीत केले होते. त्यावेळी सदर गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून तात्काळ गुन्ह्यांचे घटनास्थळी भेट देवून घटनास्थळाचे निरीक्षण करून परीसरातील सि.सि.टि.व्ही. फुटेजची पाहणी करून तसेच रेकॉर्ड वरील गुन्हेगारांची चौकशी केली असता त्यानंतर गोपनिय बातमीदार यांच्याकडून माहीती काढण्याचा प्रयत्न करीत असतांना दि.८जुन २०२६ रोजी गोपनिय बातमीदाराकडून माहीती मिळाली की, ईसम नामे १). शेख समीर उर्फ सोनू शेख जमील, वय २३ वर्ष, रा. तलाव फैल, यवतमाळ ह.मू. तुकारामबापु वार्ड, पुसद, २) तौफीक उर्फ भैयू शेख हाफीज वय २० वर्ष, रा. तुकारामबापु वार्ड, पुसद, यांनी खंडाळा येलदरी घाटात जबरी चोरी केलेबाबत माहीती मिळाल्याने सदर दोन्ही ईसमांना ताब्यात घेवून चौकशी केली असता प्रथम त्यांनी उडवा उडवीचे उत्तरे दिली. पोलीस कौशल्याचा वापर करून कसोशीने चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केल्याने त्यांचेकडून गुन्हयात जबरीने चोरी केलेले नगदी ३००० रू., गुन्हयात वापरलेला चाकु, व हिरो कंपनीची स्प्लेंडर मोसा क्रं.२९ सी. के. ००६५ जप्त करण्यात आली असून तपास सूरू आहे.
सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधिक्षक यवतमाळ कुमार चिंता सा.मा. अप्पर पोलीस अधिक्षक यवतमाळ अशोक थोरात सा., यांचे मार्गदर्शनात तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, पुसद श्री. हनूमंतराव गायकवाड सा. पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांचे नेतृत्वात ठाणेदार आशिष चौधरी, सफौ मसूद शेख, पोहेका रविंद्र गावंडे, नाना मस्के, पोअ अक्षय मोटे, योगेश आळणे, मो. ताज, केशव मुंढे पो. स्टे. पुसद ग्रामिण यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.



