क्राइम

अवैध गावठी दारूच्या हातभट्ट्या उध्वस्त, ८५ हजाराच्या वर मुद्देमाल नष्ट; स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकाची कारवाई…

पुसद : पुण्यातील विषारी दारू दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काळी दौ.येथे अवैधरित्या सुरू असलेल्या गावठी दारूच्या तीन हातभट्ट्या स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकाने उध्वस्त केल्या आहेत. या तिन्ही हातभट्टाच्या कारवाईत एकूण १२० लिटर तयार दारूसह८७६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सॅम्पल काढून घेऊन बाकीचा मुद्देमाल जागेवर नष्ट करून ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

१) अमोल मोहन राठोड वय ३३ रा. काळी दौ. ता. महागाव जि. यवतमाळ, २) जयसिंग विजय राठोड वय.३५ रा. काळी दौ. ता. महागाव जि. यवतमाळ, ३) रामभाऊ हुलघुंडे रा.काळी दौ. खान ता.महागाव जि. यवतमाळ, असे अटक केलेल्या आरोपीचे नावे आहे.

या प्रकरणी पोलिस सूत्रांनी दिलेल्या आधिक माहिती नुसार पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काळी दौ. ग्रामपंचायतींच्या हद्दीत अवैधरित्या गावठी हातभट्ट्याची दारू पाडली जात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती त्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तात्काळ काळी दौ.परिसरातील अवैधरित्या गावठी दारू पाडणाऱ्या तिन मुंबई दारूबंदी अधिनियम कलम ६५(ई),(फ) प्रमाणे या हातभट्ट्यावर छापा टाकून ह्या हातभट्ट्या उद्ध्वस्त करीत कारवाई करून मुद्देमाल जप्त करून सॅम्पल काढून घेऊन बाकी मुद्देमात जागेवरच नष्ट करण्यात आला.

या कारवाई मध्ये अमोल मोहन राठोड यांच्या ताब्यातून ५० लिटर तयार दारू किंमत अंदाजे पाच हजार रुपये तर ९२५ लिटर मोहमास सडवा किंमत अंदाजे ३२ हजार ३ ७५ रुपये असा एकूण ३७३७५ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर आरोपी क्रमांक २) जयसिंग विजय राठोड यांचे कडून दहा लिटर तयार दारू किंमत अंदाजे एक हजार रुपये तसेच ११४५ लिटर मोहमांस सडवा किंमत अंदाजे ४००७५ रुपये असा एकूण ४१०७५ रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला तसेच आरोपी क्रमांक३) रामभाऊ हुलघुंडे याचेकडून १६० लिटर तयार दारू किंमत अंदाजे सहा हजार रुपये ९० लिटर मोहमांस सडवा किंमत अंदाजे ३१५० रुपये असा एकूण ९१५० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला या तिन्ही हातभट्ट्यावरील एकूण १२० लिटर तयार दारू कि. रु १२ हजार रुपये तसेच २१६० लिटर मोहमास सडवा कि. रु.७५६०० असा एकूण ८७६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या तिन्ही ठिकाणावरील चालू भट्टीवर मिळून आला त्यातील काही मुद्देमाल सॅम्पल करिता काडून घेऊन बाकी तयार दारू, मोहमास सडवा, दारू गाळण्याचे साहित्य जागेवरच नष्ट करून तिन्ही आरोपीला ताब्यात घेतले आहे. सदरची कारवाई कुमार चिंता, जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ,अशोक थोरात, अपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ , सतीश चवरे, पोलीस निरीक्षक, स्थानीक गुन्हे शाखा, यवतमाळ यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून ही कारवाईस्थानिक गुन्हे शाखा यवतमाळचे शाखा पुसद सपोनि/ धीरज बांडे, Psi /शरद लोहकरे,, Asi/मुन्ना आडे, HC/ संतोष भोरगे , HC/कुणाल मुंडोकार, HC/रमेश राठोड,PC/सुनील पडागळे, Dpsi रवींद्र शिरामे.यांनी पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close