क्राइम

पुसद -वाशिम राज्य मार्गावरील येलदरी घाटात एका दूचाकीस्वारास अज्ञात चोरट्यांनी लुटले!

पुसद: शहरासह तालुक्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. अनेकवेळा वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुन्हा एक मोठी बातमी समोर आली आहे. एका दुचाकीस्वारास चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना पुसद-वाशिम राज्य मार्गावरील येलदरी घाटातील परिसरात घडली आहे. चोरटे रक्कम लुटुन पसार होण्यात यशस्वी झाले असुन पोलिसांकडून पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. मात्र विशेष म्हणजे याच परिसरात यापूर्वी सुद्धा याच लुटीच्या उद्देशातून एका निष्पाप व्यक्तीला जीव गमावा लागला होता. तरीही या परिसरात सबंधित पोलिस विभागामार्फत वेळोवेळी पोलीस गस्त घालत नसल्यामुळे याचाच फायदा घेत परिसरात चोरट्यांना रान मोकळे झाले आहे.

वसंता जनार्दन कांबळे वय ५० वर्षे रा.जुनूना ता.पुसद जि. यवतमाळ असे फिर्यादीचे नाव आहे. 

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनला दि,२९मे२०२६ रोजी वसंता कांबळे यांनी फिर्याद दाखल केली की दिनांक २७ मे २०२६ रोजी सायंकाळी ८:५० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी त्याच्या दुचाकीने आपल्या राहत्या घरी जुनून येथे परत जात असताना पुसद- वाशिम राज्य मार्गावरील येलदरी घाटात अचानक दोन वीस ते पंचवीसीतील तोंडाला रुमाल बांधून असलेल्या अज्ञातांनी दुचाकी थांबून दुचाकी वरून चाकूचा धाक दाखवत खाली उतरविले व तुझ्या जवळचे पैसे काढ नाहीतर तुला खूपसून टाकीन असे म्हणून धमकवू लागले त्यानंतर त्यांच्या खिशातील नगदी ७ हजार रुपये व शर्टच्या खिशातील जुना वापरता १ हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण ८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला व अज्ञात आरोपी पसार झाले त्यावेळी फिर्यादीने पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दि.२९ मे २०२६ रोजीच्या संध्याकाळी ६.१९ वाजता याप्रकरणी दुचाकीवरील दोन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.मात्र विशेष म्हणजे याच परिसरात यापूर्वी सुद्धा याच लुटीच्या उद्देशातून एका निष्पाप व्यक्तीला जीव गमावा लागला होता. तरीही या परिसरात सबंधित पोलिस विभागामार्फत वेळोवेळी पोलीस गस्त घालत नसल्यामुळे याचाच फायदा घेत परिसरात चोरट्यांना रान मोकळे झाले आहे. त्यामुळे या परिसरातून ये-जा करणाऱ्या वाहनधारकाची संख्या जास्त असल्यामुळे त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त जास्त वेळ घालावी अशी मागणी नागरिकाच्या वतीने करण्यात येत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close