पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मनोहर नगर शिवारातील टेकडीवर आढळला कुजलेल्या आणि विवस्त्र अवस्थेत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह!

पुसद : ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत मनोर नगर शेत शिवारातील गगन टेकडीवर एका अनोळखी (वय अंदाजे ५०) व्यक्तीचा कुजलेल्या आणि विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही घटना सोमवारी दि.१मे२०२६ रोजी उघडकीस आली. त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली.पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार प्रखर उन्हामुळे या व्यक्तीच्या पोटामध्ये काही नसल्याने प्रकृती बिघडून संबंधित अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा कयास लावला जात आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसल्याने पुसद ग्रामीण पोलिसांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी ‘झेप न्यूज’ला दिलेली माहिती अशी की, पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मनोहर नगर शेत शिवारातील एका गगन टेकडीवर गुरे चारणाऱ्या व्यक्तीला काहीतरी सडलेला वास येवू लागला. तो गुराखी त्या वासाच्या दिशेेने शोध काढत पुढे गेला असता त्याला या गगन टेकडीवर एका पुरुष जातीचा विवस्र अवस्थेतील अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असता त्याने तात्काळ गावातील पोलीस पाटलांना ही माहिती दिली त्यावेळी पोलीस पाटील अविनाश पवार यांनी पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनला या घटनेची संपूर्ण माहिती देत फिर्याद नोंदवली तोपर्यंत घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर रात्री धुवाधार पाऊस सुरू असताना भर पावसात ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आशिष चौधरी,सहपोनि राहुल देशमुख, गावंडे साहेब मकसूदभाई, गावंडे, योगेश, काळी दौ.येथील पोलीस कर्मचारी घटनाास्थळी पोहोचले परंतु मयताची ओळख पटविण्याचे आवाहन ग्रामीण पोलिसांपुढे ठाकले होते मृतदेहाची दुर्गंधी येत असल्याने मृतदेह कुजलेल्या आणि विवस्त्र अवस्थेत असल्याने ग्रामीण पोलिसांनी हा मृतदेह रात्री १:३० वाजण्याच्या सुमारास शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला तर मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे त्याची ओळख पटवण्यात अडचणी येत होत्या परंतु जोपर्यंत या व्यक्तीची ओळख पटत नाही तोपर्यंत हा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. 
सध्या परिसरात तीव्र उष्णतेची लाट सुरू असल्याने उष्माघातामुळे या व्यक्तीच्या पोटामध्ये अन्न पाणी नसल्यामुळे मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील प्रक्रिया सुरू केली आहे.दरम्यान, मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पुसद ग्रामीण पोलिसांकडून प्रयत्न सुरू असून, संबंधित व्यक्तीबाबत कोणाला माहिती किंवा जवळपास या वयाचा कोणताही व्यक्ती मिसिंग असल्यास तात्काळ ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.ही व्यक्ती नेमकी कोण आहे? कुठली आहे? त्याचा मृत्यू कशामुळे झाला? त्यास कोणी मारुन टाकले कां? याचा तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, चार पाच दिवसांपूर्वी येथील परिसरात एक अनोळखी वेडसर व्यक्ती फिरत असल्याचे सांगितले जात आहे.



