क्राइम

आठ महिन्यापासून खुनाचा प्रयत्न गुन्ह्यातील फरार आरोपीला अखेर अटक, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकाची मोठी कामगिरी!

पुसद : शहरातील वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मागील आठ महिन्यापूर्वी खुनाचा प्रयत्न जबरी गुन्हा करून आरोपी फरार झाला होता या आरोपीच्या मुसक्या आवळण्यास आता स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पोलिसांना मोठे यश आले आहे.

या खून प्रकरणी प्रयत्न करणारा आरोपी मोहम्मद आवेज ऊर्फ तिड्डा मोहम्मद नजीर वय २७ वर्ष, रा. पार्वती नगर पुसद ता. पुसद जि. यवतमाळ असे आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी ‘झेप न्यूज’ ला दिलेली माहिती अशी की, यवतमाळ जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, अवैध शस्त्र, अउघड गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन व्हावे तसेच आज पावेतो पाहीजे व फरार आरोपी शोध घेवून त्यांना अटक करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता सा यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिस्थान पथकांना गोपनिय माहीती काढून पाहीजे फरार आरोपी शोध घेण्याबाबत सुचना दिल्या आहेत. दि,२४ एप्रिल २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद उपविभाग पुसद पाहीजे व फरार आरोपी शोध घेत असतांना सन २०२५ पासून पोलीस स्टेशन वसंतनगर अप क्रमांक २८०/२०२५ कलम १०९, ३५१(२),३५१(३), २९६, ३ (५) भान्यास सह कलम ३, २५ आर्म ॲक्ट मधील खुनाचा प्रयत्न गुन्ह्यातील फरार पाहीजे आरोपी मोहम्मद आवेज ऊर्फ तिड्डा मोहम्मद नजीर हा गायमुखनगर रोड पुसद परिसरात असल्याबाबत नमूद पथकांस गोपनिय माहीती मिळाल्याने गायमुखनगर रोड पुसद परिसरात पोहचुन शोध घेवून पोलीस कौशल्याचा वापर करुन अतिशय शिताफिने त्यास ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव मोहम्मद आवेज ऊर्फ तिड्डा मोहम्मद नजीर वय २७ वर्ष, रा. पार्वती नगर पुसद असे असल्याचे सांगितल्याने तसेच हाच आरोपी सन २०२५ पासून खुनाच्या प्रयत्नातील मधील नमूद गुन्हयातील फरार पाहीजे आरोपी असल्याचे खात्री झाल्याने त्यास ताब्यात घेवून आरोपी नामे मोहम्मद आवेज ऊर्फ तिडा मोहम्मद नजीर वय २७ वर्ष, रा. पार्वती नगर पुसद ता. पुसद जि. यवतमाळ यास पुढील कारवाई कामी पोलीस स्टेशन वसंतनगर यांच्या ताब्यात दिले.सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता (भा.पो. से) सा, मा. अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ अशोक थोरात (म.पो. से) सा, मा. सहा पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद हर्षवर्धन बी. जे सा तसेच मा. पोलीस निरीक्षक सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात सपोनि धिरज बांडे, पोउपनि शरद लोहकरे, सफो मुन्ना आडे, पोहवा संतोष भोरगे, पोहवा तेजाब रणखांब, पोहवा सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, चापोउपनि रविंद्र शिरामे, पोशि राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ तसेच सायबर सेल यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close