क्राइम

पुसद शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बोरी खुर्द येथील चार धार्मिक स्थळावरीलभोंगे उतरविले!

पुसद : शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील बोरी खुर्द येथील जामा मस्जिद, अली मुर्तुजा मस्जिद, श्री संत दुधाधारी महाराज मंदिर व धम्मभुमी बुध्द विहार अशा चार धार्मिक स्थळांवरील विनापरवाना लावलेले भोंगे लाऊडस्पिकर, उतरविले आहे.हि कारवाई दि.११ एप्रिल २०२६ रोजी करण्यात आली होती.

बोरी खुर्द येथील सुज्ञ मस्जिदचे विश्वस्त शे. यासीन शे. रज्जाक, शे. सलीम शे. अकबर अली मुतुर्जा मस्जिदचे जाबाज खाँ समशेर खॉ व शेख रहीम व त्यांचे इतर सहकारी तसेच श्री संत दुधाधारी महाराज मंदिर चे अध्यक्ष  सिताराम भाकरे, नारायण जरांडे, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील कृष्णा पारध तसेच धम्मभुमी बुध्द विहार बोरी खु.चे शरद जाधव,अमोल खंडारे,विश्वनाथ मनवर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तसेच गावक-यांनी ग्रामपंचायत चा लाऊडस्पिकर्स,भोंगे मुक्त करुन ध्वनी प्रदुषण टाळण्यासाठी पुढाकार घेवून ठराव पारीत करण्याचे आश्वासन सुध्द यावेळी पोलीस प्रशासनास देण्यात आले. ही कार्यवाही जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधिक्षक अशोक थोरात, सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद हर्षवर्धन बि.जे. यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सेवानंद वानखडे व गोपनिय अंमलदार अभिमन्यू चव्हाण, नितेश भालेराव, बिट अमलदार सपोउपनि सुभाष जाधव, पोहेकों अविनाश राठोड यांचे उपस्थितीत काढून घेतले.हि कारवाई दि.११ एप्रिल २०२६ रोजी करण्यात आली होती.पोलीसांनी सर्व धर्मांच्या धार्मिक स्थळांवरील  आभार मानून अशाच प्रकारे सर्वांनी पुसद शहर मधील लावलेले विनापरवाना लाऊड स्पीकर्स,भोंगे सर्व विश्वस्त,संचालकांनी स्वेच्छेने व स्वयंस्फुर्तनि काढून घेवून कायदेशिर कार्यवाही टाळावी असे आवाहन याद्वारे करण्यात येत आहे.पुसद शहर हद्दीमधील सर्व मंदिर, बुध्द विहार, चर्च, मस्जिद, दर्गा, अशा व इतर सर्व प्रकारच्या धार्मिक व सामाजिक स्थळावरील विनापरवाना लावलेले लाउड स्पीकर/भोंगे काढून घेण्यात यावे अशा सुचना सर्व सर्व मंदिर, बुध्द विहार, चर्च, मस्जिद, दर्गा, अशा व इतर सर्व प्रकारच्या धार्मिक व सामाजिक स्थळावरील लाऊडस्पीकर्स काढण्याच्या तीन मिटींग घेवून सुचना/निर्देश देण्यात आलेले होते. व कायदयाचे तंतोतंत पालन करण्यात यावे अन्यथा प्रशासन कायदेशिर कार्यवाही करण्यात आली असल्याचे माहिती पोलिस सूत्रांनी झेप न्यूज ला दिली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close