Uncategorized

दुचाकीच्या कर्णकर्कश आवाजाच्या मॉडीफाय सायलेन्सरवर चालविला बुलडोझर; पुसद वाहतूक पोलिसांची कारवाई!

बुलेटस्वरांना सायलेंसरमध्ये छेडछाड करणे चांगलेच पडले महागात!

पुसद : उपविभागीय पोलीस अधिकारी तथा साहृयक पोलीस अधिक्षक हर्षवर्धन बि.जे.यांनी पुसद पोलीस उपविभागाचा पदभार घेतल्यापासून कारवाईचा धडाका सुरू आहे. अनेक समाज उपयोगी उपक्रम देखील राबविले आहेत. त्यांच्या धडाकेबाज कारवाईने अवैध धंद्येवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. त्याचा अनुषंगाने दि.१० पासून शहरवासीयांच्या कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाद्वारे शहरवासीयांना त्रस्त करून सोडणाऱ्या व दुचाकीला मॉडिफाय सायलन्सर लावून कर्णकर्कश आवाज करीत ध्वनी प्रदूषण करणाऱ्या अशा सायलेन्सरचा दुचाकीस्वारांनी फटाक्यांसारखा आवाज काढत उच्छाद मांडलेल्या हुल्‍लडबाज दुचाकीस्वारांवर धडक कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद वाहतूक शाखेने आणि दंगा नियंत्रण पथकांनी संयुक्तरीत्या मोहीम राबवून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकीस्वरांवर दंडात्मक कारवाई करुन मॉडीफाय सायलेन्सर जप्त करत सायलेन्सर बुलडोझरखाली दाबून नष्‍ट करण्‍यात आले आहे.

 

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पुसद शहरातील कॉलेजकुमार आणि हुल्लडबाज टवाळखोर मुले सायलेन्सरमध्ये मॉडीफाय करून कर्णकर्कश आवाज करत फिरत असतात. अशा दुचाकी व बुलेटस्वरांना सायलेंसरमध्ये छेडछाड करणे चांगलेच महागात पडले आहे.नागरिकांच्या शांतता, सुरक्षितता व ध्वनी प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने हर्षवर्धन बी.जे. सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद पुसद यांच्या मार्गदर्शनात वाहतुक शाखा, व दंगा नियंत्रण पथक पुसद यांच्यामार्फत विशेष मोहीम राबविण्यात आली. अलीकडील काळात काही वाहनधारकांकडून विशेषतः बुलेट व इतर दुचाकींवर अनधिकृतरीत्या मॉडिफाइड सायलेन्सर बसवून मोठ्या व कर्कश आवाजाद्वारे ध्वनी प्रदूषण निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले होते.

सदर प्रकारामुळे नागरिकांना त्रास होत असून सार्वजनिक शांततेचा भंग होत असल्याचे आढळून आहे. त्याअनुषंगाने हर्षवर्धन बी.जे. सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद यांनी नमुद वाहन चालकाविरुध्द कारवाही करण्याचे आदेशित केले. त्या अनुषंगाने वाहतुक शाखा, व दंगा नियंत्रण पथक पुसद कडून शहरातील विविध ठिकाणी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणावर मॉडिफाइड सायलेन्सर जप्त करण्यात आले होते.दि. १० एप्रिल२६ रोजी जप्त करण्यात आलेल्या सायलेन्सरवर बुलडोझर फिरवून त्यांचा पूर्णतः नाश करण्यात आला आहे. ही कारवाई नागरिकांना ध्वनी प्रदूषणापासून दिलासा देण्यासाठी तसेच वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे.

वाहनधारकांनी आपल्या वाहनांमध्ये कोणतेही अनधिकृत बदल (मॉडिफिकेशन) करू नयेत व वाहतूक नियमांचे पालन करावे, अन्यथा संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ट्रॅफिक शाखेकडून देण्यात येत आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या नियमभंगाची माहिती ट्रॅफिक विभागाला देऊन सहकार्य करावे, असेआवाहन करण्यात येत आहे.सदरची कारवाई हर्षवर्धन बी.जे. सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखा प्रभारी अधिकारी आशिष चौधरी यांच्या नेतृत्वात वाहतूक शाखा येथील अंमलदार आणि दंगा काबु पथक अंमलदार यांनी पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close