पुसद येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या हर्षउत्साहात साजरा; स्थानिक पुढाऱ्यांना जागतिक आदिवासी दिनाची ‘ॲलर्जी” स्थानिक नेत्यांच्या अशा भूमिकेमुळे आदिवासी तरुणांमध्ये आणि समाजामध्ये तीव्र असंतोष !

पुसद: शहरातील क्रांतीसुर्य बिरसा मुंडा चौकात आज ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन आदिवासी बांधवांच्या वतीने व विविध आदीवासी संघटनांच्या वतीने मोठ्या हर्षउत्साहात आणि पारंपरिक जल्लोषात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी ज्येष्ठ समाजसेवक रामकृष्ण चौधरी तर माधव वैद्य माजी समाज कल्याण आयुक्त यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 
“बिरसा मुंडा अमर रहे”, जागतिक आदिवासी दिन चिरायु होवो, “एक तिर एक कमान सारे आदिवासी एक समान ” या घोषणांनी परिसर दुमदुमून.
क्रांतिवीरांना अभिवादन करुन भगवान बिरसा मुंडा व समाजसुधारकांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. अनेक मान्यवरांनी आपले जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व व समाजाप्रती आपली मते व्यक्त केली परंतु या मतदारसंघात कींवा आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या अधिकारक्षेत्रातील भागातील समाजाची प्रगती कां खुंटली विकास कां झाला नाही याला जबाबदार कोण याबद्दल थोडं सामाजाचं आजच्या दिवशी मंथन करायला हवं होतं .पुसद मतदारसंघात मागील कित्येक वर्षांपासून आदिवासी प्रकल्प कार्यालयचे ‘हेड कॉटर’ तरीही या भागातील आदिवासी गावांचा कीती विकास झाला कींवा या मतदारसंघांतील गावाच्या विकासाला कोण अडखळा निर्माण करतात आदिवासी विकास विभाग आदिवासींचं जिवनमान उंचावण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या शासनाचा निधी खर्च केला जातो मग हा निधी पाझरतो कुठे? या विभागामार्फत विविध विकास प्रकल्प सुरू असताना अशिक्षित आणि विकासापासून दुर्गम भागातील अनेक खेडी,पाडी, शेतकरी कुटूंबे, मुले, शाळा व महिला विकासापासून वंचित कां? ठेवली जात आहेत आदिवासी जमातीची स्वतंत्र बोली भाषा, वेशभूषा, रुढी, परंपरा व संस्कृती इतर जातीच्या संस्कृतीपेक्षा भिन्न आहे. आदिवासी जमातीची इतिहासात सुद्धा एक वेगळी ओळख आहे. परंतु येथील स्थानिक राजकीय नेते काही वर्चस्ववादी स्थानिक पुढाऱ्यांनी या मतदारसंघात आदिवासी समाजचा केवळ निवडणुकीपुरता ‘व्होट बँक’ म्हणून वापरला केला जातो, अशी भावना आहे. जर आपण या आदिवासी दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम स्थळी हजेरी लावली की नवा आदिवासींना घटनात्मक हक्कांची जाणीव करून दिली तर यामुळे प्रस्थापित पुढाऱ्यांना आपल्या सत्तेला आव्हान मिळण्याची भीती वाटते.त्यामुळेच स्थानिक पुढारी या कार्यक्रमाला उपस्थित राहत नाहीत की काय असा प्रश्न सर्वसामान्य आदिवासी समाजातील नागरीकांना पडला आहे.पंरतु अशा पुढाऱ्यांच्या दावनीला बांधलेले तथाकथित काही आदिवासी समाजाचे नेते समाजाला गृहीत धरून या मतदारसंघात स्थानिक पुढाऱ्यांन वावरत असुन स्थानिक पुढाऱ्यांना हाताशी समाजाचा उद्धार करण्याऐवजी समाजाला विकासापासून वंचित ठेवत आहेत स्वत:च्या स्वार्थासाठी आदिवासींची कुचंबना करीत आहेत. तसेच आदिवासी समाजातील राजकीय नेतेसुद्धा त्यांच्या सुरात सूर मिसळून आदिवासी जमातीच्या पोटात खंजीर खूपसण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे आजही आदिवासी समाज विकासापासून कोसो दूर असल्याचा आरोप केला जात आहे.आदिवासी समाजाला आजतोवर या मतदारसंघात समाजाचे नेतृत्व करणारा कणखर नेता मिळाला नाही.उलट स्थानिक सत्ताधाऱ्यांची तळी उचलणारे अनेक तथाकथित समाजसेवक व राजकीय नेते निर्माण झाल्याने समाजाचे नेतृत्व करण्याचा आव बाळगणारे राजकीय नेते स्वत:च्या स्वार्थापोटी समाजाला राजकारणाच्या काळ्या बाजारात विकण्याचा कुटील डाव रचतानाच दिसून येत आहेत त्यामुळे या मतदारसंघात आदिवासी समाज आजपर्यंत विकासापासून कोसो दूर राहिला आहे.या मतदारसंघात सत्ताधाऱ्यांना ठणकावून सांगितलं पाहिजे तुम्ही फक्त आदिवासी समाजचा केवळ निवडणुकीपुरता ‘व्होट बँक’ म्हणूनचं वापर करून घेणार असाल आणि आमच्या विकासाला पायबंद घालणार आसाल तर यापुढे आदिवासी समाजाने विचार करण्याची गरज आहे आदिवासी दिनानिमित्त काही स्थानिक पुढाऱ्यांना आदिवासी समाजाच्या कार्यक्रमाची ॲलर्जी असेल तर स्थानिक नेत्यांच्या अशा भूमिकेमुळे आदिवासी तरुणांमध्ये आणि समाजामध्ये तीव्र असंतोष निर्माण होतो.त्यामुळे समाजातील काही समाजसेवकांनी मंथन करायलाच हवं होतं तरच आदिवासी दिन साजरा करण्याचं सार्थक होईल.
या कार्यक्रमाच्या वेळी पारंपरिक कला दर्शन: आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारे लोकगीतांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील आदिवासी बांधव, महिला, युवक, विविध आदीवासी सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.संपूर्ण शहरात आणि ग्रामीण भागात सुद्धा आज दिवसभर जागतिक आदिवासी दिनाचा उत्साह आणि संस्कृतीचा रंग पाहावयास मिळत आहे



