ईतर

महागाव घटनेच्या निषेधार्थ पुसद उपजिल्हा रुग्णालयातील नर्सिंग कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन!

पुसद:महागाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर मंगळवारी १८ ऑगस्ट रोजी रात्री आपला जीव वाचविण्यासाठी बाथरूममध्ये लपून बसण्याची वेळ आली होती. अपघातात जखमी झालेल्या शेख इसराइल शेख शाबुद्दीन हा ड्रेसिंग करून घेण्यासाठी रुग्णालयात आला होता.

त्यावेळी डॉक्टर-कर्मचाऱ्यांसोबत वाद झाल्यानंतर तो ‘तुम्हाला दाखवतो’ असे म्हणत निघून गेला. त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासाने १० ते १२ जणांच्या टोळक्यांना सोबत घेऊन तो पुन्हा रुग्णालयात येवून धुडगूस घालत रुग्णालयातील कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर व नर्सिंग कर्मचाऱ्यांवर हल्ला चढवित, मारहाण करु लागले तसेच रुग्णालयातील साहित्याची तोडफोड तसेच जीवे मारण्याच्या धमकी दिली या घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्र नर्सिंग गोरमेंट असोसिएशन पुसदच्या वतीने पुसद उपजिल्हा रुग्णालयातील नर्सिंग कर्मचाऱ्यांनी दि २० ऑगस्ट २०२६ रोजी काम बंद आंदोलन केले. तसेच या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र गवर्नमेंट नर्सेस आसोशिएशन तर्फे पुसद उपजिल्हा रुग्णालयातील नर्सिंग कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करून घटनेचा तीव्र निषेध नोंदवित निवेदन दाखल केले आहे.

 या घटनेतील हल्लेखोरांना तत्काळ अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करावी तसेच रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची ठोस हमी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आरोग्य कर्मचारी अहोरात्र रुग्णसेवा बजावत असताना त्यांच्यावर अशाप्रकारे हल्ले होणे गंभीर बाब असून, अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

या आंदोलनात महाराष्ट्र नर्सिंग गोरमेंट असोसिएशन पुसद जिल्हा यवतमाळ चे अध्यक्ष – कैलास मुधोळकर व उपाध्यक्ष – मंगल देशमुख, गजानन क्याथमवाढ, सचिव – ज्योत्स्ना फिलिप, विद्या डाले, श्रीमती श्रीमती गजू चव्हाण, प्रीती प्रधान, रवीना भटकर, पल्लवी भालेराव, वर्षा कांबळे, प्रियंका रामटेके, तसेच सर्व संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.अशी माहिती’ झेप न्यूज’ला कैलास मुधोळकर अध्यक्ष,पुसद महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस असोसिएशनच्या वतीने दीली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close