ईतर

माउंट लिट्रा झी स्कूल मध्ये l स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा!

पुसद : येथील माउंट लिट्रा झी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता, छत्रपती शिवाजी महाराज, सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले .

सदर कार्यक्रम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, व सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाने घेण्यात आले. सदर कार्यक्रमास डॉ. विनय चक्करवार यांची प्रमुख उपस्थिती होती.संगीत शिक्षक ओम प्रकाश गवई यांच्या मार्गदर्शनात’भारत माँ की संताने हम’या समूहगीताचे गायन करण्यात आले. तसेच स्वातंत्र्यलढ्यातील ब्रीद वाक्यांवर आधारित संगीतमय तालकचेरीचे उत्कृष्टपणे सादरीकरण करण्यात आले.

सहभागी विद्यार्थी स्वराली गवई , शिवांश राजे, काव्या भास्करवार, अन्वय पोराजवार, स्मित मुक्कावार, आयुषी राठोड,नारायणी मोगरे, आरिनी उबाळे ,वंशराज देशमुख व जय वानरे होते.तसेच प्रणवी राठोड, आबा बोरकर व रेहान मेमन या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच सुनील सोमकुवर या शिक्षकांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांनी व देशभक्तांनी दिलेल्या बलिदानाचे महत्व सांगितले. कराटे प्रशिक्षक संध्या तिवारी ,सौरभ नवघणकर यांच्या मार्गदर्शनात अरहम खातिब, यादवी वरवडे, जिज्ञा पवार , पार्थ नंदापूरे, श्लोक खोंड , क्रिष्णा चव्हाण या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे कराटेचे प्रात्यक्षिक सादरीकरण केले.

 अमोल भालेराव यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी ‘देश रंगीला रंगीला’ व ‘ऑपरेशन सिंदूर’ या गीतावर उत्कृष्टपणे नृत्य सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे मुख्याध्यापक , प्रशासन अधिकारी, शाळा समन्वयक,सर्व क्रिडा प्रशिक्षक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आदिती देशमुख व सिद्धी साकला या विद्यार्थिनींने केले .तर आभार परी छतवाणी या विद्यार्थिनींने मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close