राजकिय

पुसद काँग्रेस शहर अध्यक्षपदी युवा नेतृत्व झिया शेख

काँग्रेस नेते डॉ. मोहमद नदीम यांचे अत्यन्त विश्वासू म्हणून राजकारणात ओळख

पुसद : प्रांतध्यक्ष श्री हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने जिल्हाआध्यक्ष ऍड. सचिन नाईक यांच्या हस्ते जिल्हाकाँग्रेस कार्यकारणी तथा तालुका व शहर काँग्रेस अध्यक्षाची नियुक्ती करण्यात आली ज्यात पुसद शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी झिया शेख यांची पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या कार्याची दखल घेत पुन्हा त्यांच्यावर विश्वास व्यक्त केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.पुनर्नियुक्तीनंतर बोलताना झिया शेख यांनी सांगितले की, “पक्ष नेतृत्वाने पुन्हा माझ्यावर विश्वास दाखवून जी जबाबदारी सोपविली आहे, त्यामुळे माझी जबाबदारी आणखी वाढली आहे. आगामी काळात पुसद शहरात काँग्रेस पक्षाचा विस्तार करण्यावर विशेष भर देणार असून, पक्षाची विचारधारा तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे.”

तसेच समाजातील शेवटच्या घटकातील व्यक्तीपर्यंत न्याय मिळवून देण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून कौतुक केल्या जात आहे त्यांच्या चाहत्या वर्ग व मित्र मंडळी तर्फे त्यांच्या वर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

आपल्या पुनर्नियुक्तीचे श्रेय आपले नेतृत्व प्रदेश काँग्रेसचे महासचिव डॉ. मोहम्मद नदीम, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ऍड. सचिन नाईक, माजी आमदार डॉ. वजाहात मिर्झा, जिल्हा नेतृत्व तसेच आपल्या मित्रमंडळींना दिले आहे.पक्षाने पुन्हा दिलेली संधी ही विश्वासाची पावती असून, येणाऱ्या काळात पुसद शहरात काँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्यासाठी जोमाने काम करणार असल्याचा विश्वास झिया शेख यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close