समाज सेवक मनिषभाऊ शहा यांच्याकडून कारला देव शाळेतील गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप!

पुसद :तालुक्यातील कारला येथे श्री देव हायस्कूल शाळेतील पाचवी ते सातवी पर्यंतच्या आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्यांना समाजसेवक मनीष भाऊ शहा यांच्या पुढाकाराने व सेवाभावी वृत्तीने या शाळेतील गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्यचा वाटप करण्यात आला.
.या सेवाभावी उपक्रमांतर्गत दोन्ही शाळांतील एकूण१७५ विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या उज्ज्वल भविष्यास हातभार लागावा, या उद्देशाने मनीष भाऊ शहा यांनी हा उपक्रम राबविण्यात आला. तर याच कार्यक्रमात श्री देव हायस्कूल कारला येथील शाळेतील सलग ३० वर्षे सेवा देणाऱे व सेवानिवृत्त झालेले ज्येष्ठ शिक्षक ग.वा.इंगळे सर यांचा सेवापूर्ती कृतज्ञ सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात श्री देव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजनभाऊ मुखरे हायस्कूलचे संस्थेचे संस्थापक अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाची सुरुवात सद्गुरु ओंकारनाथ देव यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या प्रसंगी संस्थेच्या वतीने अध्यक्ष राजन मुखरे यांच्या हस्ते सामाजिक बांधिलकी जपणारे मनीषभाऊ शाह व त्यांच्या मित्रमंडळाचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
सलग३० वर्षांच्या सेवेचा गौरव व भावूक वातावरणदीर्घ सेवेनंतर निवृत्त झालेले ज्येष्ठ शिक्षक ग. वा. इंगळे यांचा शाल, श्रीफळ, गौरव पत्र व भेटवस्तू देऊन संपूर्ण शिक्षकवृंद आणि मान्यवरांच्या हस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला.सत्काराला उत्तर देताना श्री इंगळे सर भावूक होऊन म्हणाले, “या शाळेत दिलेली ३० वर्षांची सेवा मी आयुष्यभर विसरू शकत नाही. निवृत्त झालो तरी या शाळेशी आणि विद्यार्थ्यांशी माझे नाते कायम राहील.”
यावेळी शाळेची विद्यार्थिनी कु. राजनंदिनी जाधव हिने इंगळे सरांच्या शिस्तप्रियतेविषयी आणि विद्यार्थीप्रेमाविषयी मनोगत व्यक्त केले.शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याने ते विचार बदल, अंधश्रद्धा निर्मूलन आणि सामाजिक समता निर्माण करते. हे व्यक्तीला विवेकी बनवते, अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती देते आणि देशाच्या विकासात मदत करते.या सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून सामाजिक कार्यकर्ते ग्वाही मनीषभाऊ शाह यांनी, या शाळेतील गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले “भविष्यातही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि श्री देव हायस्कूलच्या विकासासाठी आमचे सहकार्य कायम राहील ,” अशी ग्वाही आणि विश्वास दिला.
अध्यक्षीय भाषणात राजन मुखरे यांनी समाजसेवक मनीषभाऊ शाह मित्रमंडळाच्या उपक्रमाचे भरभरून कौतुक करून आभार मानले, तसेच इंगळे सरांना निवृत्तीनंतरच्या सुखी व निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 
या कार्यक्रमास श्री देव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजन मुखरे सचिव शरदसिंह बयास, ॲड.अशोक महामुने दिगंबरराव पुंडे, बाबाराव पुलाते, सतीश आजेगावकर, प्रा.वसंत राठोड, प्रा. बाबूसिंग राठोड, रिंकू वाझा श्री देव हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय चेके, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा कारला मुख्याध्यापक गणेश पांडे यांच्यासह जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे व संस्थेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद तसेच ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक, या सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्री मुकुंद जोशी यांनी केले.



