राजकिय

दिग्गजांच्या सभांनी पुसद विधानसभा मतदारसंघात धुरळा! प्रचाराच्या तोफा थंडावल्या ;आता ‘लक्ष्मीदर्शना’सह छुपा प्रचार सुरू!

पुसद: विधानसभा मतदारसंघात गेल्या महिना भरापासून सुरू असलेली प्रचाराची धामधूम आज सोमवार सायंकाळी थंडावली. या विधानसभा मतदारसंघात राज्य व राष्ट्रीय नेत्यांच्या सभा, प्रचार दौरे आणि उमेदवारांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांच्या निघालेल्या पदयात्रा, वाहन फेरी यामुळे तापलेले राजकीय वातावरणही थंडावले. या निवडणुकीत मतदारसंघात एकूण उमेदवारांची संख्या १३ आहे.या विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (ता. २०) मतदान होणार आहे. त्याचा प्रचार सोमवारी (ता. १८) सायंकाळी संपला. त्यापूर्वी पुसद विधानसभा मतदारसंघातील महायुती व महाविकास आघाडी तसेच वंचित बहुजन आघाडीसह अन्य पक्षांच्या व अपक्ष उमेदवारांनी विविध ठिकाणी मतदारांच्या भेटीगाठी घेऊन संवाद साधला. काहींनी वाहन फेरी काढली. काहींनी लघुउद्योजक, व्यापारी, वकील, कामगार विविध संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांच्या बैठकी घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले.महाराष्ट्राच्या सत्तेची चावी कुणाच्या हाती याचा निर्णय २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. नियमानुसार आता प्रचार संपला असून यापुढे दोन दिवस छुपा प्रचार सुरू राहणार आहे. राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक होत असून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. लोकसभेमध्ये बसलेल्या फटक्यानंतर सावध झालेल्या महायुतीने वेगळी रणनीती आखल्याचं दिसून आलं. तर दुसरीकडे आत्मविश्वास वाढलेल्या महाविकास आघाडीने जोरदार दणक्यात प्रचार केला.निवडणुकीसाठी ३ लाख २१ हजार ८२६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरुष मतदार १ लाख ६५ हजार ५३९ तर स्त्री मतदार १ लाख ५६ हजार २८० तर ०७ तीर्थीय पंथाचा समावेश आहे. पुसद शहरात ४९ मतदान केंद्रावर ६३८९३ तर ग्रामीण भागात २८४ मतदान केंद्रावर २लाख ५७ हजार९३३ मतदान होणार आहे. ही मतदान प्रक्रियेसाठी एकूण १८०० अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे सर्व अधिकारी, कर्मचारी मंगळवारी सायंकाळपर्यंत आपापल्या मतदान केंद्रांवर दाखल हाेणार आहेत. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने फ्लाइंग स्कॉड, व्हिडिओ पथक आणि चेकपोस्ट कार्यरत ठेवले आहेत. बहुतांश मतदान केंद्र शाळांमध्ये आहेत. बंदोबस्तासाठी पोलिस कर्मचाऱ्यांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.यामतदारसंघात तिरंगी कींवा बहुरंगी लढतीचे चित्र आहे. त्यामुळे निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close