क्राइम

पुसद शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ३८ वर्षीय इस्माने खिडकीच्या काचेने गळा चिरून केली आत्महत्या!

पुसद :शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काकडदाती येथील मधुसूदन नगरातील रहिवासी असलेल्या व मार्केटिंगचे काम करणाऱ्या ३८ वर्षीय इस्माने गळा चिरून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना दि.२० फेब्रुवारी २०२४ रोजीच्या सांयकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली असून प्राथमिक माहितीनुसार या इसमाने मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली आहे.    शहर पोलीस स्टेशनमध्ये मृतकाच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून मर्ग दाखल करण्यात आला आहे.     रविंद्र भालचंद्र दरणे वय ३८ वर्षे रा.मधुसुदन नगर असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.पतीने आत्महत्या केल्याची माहिती स्वाती रविंद्र दरणे वय ३५ वर्षे यांनी दिली असता त्यांच्या तक्रारीवरून मर्ग दाखल करण्यात आला आहे.तो मार्केटिंग करून त्याचा व त्याच्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता.घटनेच्या दिवशी रागाच्या भरात त्याने राहत्या घराच्या खिडकीच्या काच फोडुन त्यानंतर फुटलेल्या काचाने गळा चिरून आत्महत्या केली आहे.आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.त्याला एक तीन वर्षांचा मुलगा,पत्नी,आई, वडील असुन घरातील कर्त्या पुरुषाने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.सदर प्रकरणाचा अधिक तपास शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद लोहकरे,मनोज कदम करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close