Uncategorizedराजकिय

यवतमाळ- वाशिम लोकसभेसाठी महायुतीने आयात केलेल्या उमेदवाराचे पार्सल मतदार वापस पाठवणार; आदिवासी समाजाचा महाविकास आघाडीचे संजय देशमुखांना जाहीर पाठिंबा..

पुसद : महायुतीला यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघात साधा उमेदवार मिळू शकला नाही. त्यामुळे शिवसेना शिंदेगटानी सौ. राजश्री हेमंत पाटील ह्यांना उमेदवारी देऊन नांदेडहून आयात करावे लागले. त्यामुळे महाविकास आघाडीच्या शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उमेदवार संजय देशमुख यांच्या विरुद्ध लढण्यासाठी उमेदवार आयात करावा लागल्याने हाच संजय देशमुख यांचा विजय होणार असल्याची चर्चा यवतमाळ -वाशिम लोकसभा मतदारसंघात सुरू आहे. भाजप प्रणीत (एनडीए) सरकारच्या कार्यकाळात आदिवासी समाजावर चहूबाजुने अन्याय अत्याचार होत असुन या अन्यायाचा निषेध करीत आदिवासी समाज बांधवांनी  यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीच्या शिवसेना (उबाठा) गटाचे अधिकृत उमेदवार संजय उत्तमराव देशमुख यांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या बाबत प्राप्त माहिती अशी की, पुसद येथील वसंतराव पुरके महाविद्यालयात आदिवासी समाजाचे विचारवंत सामाजिक कार्यकर्ते विविध पक्षाचे व संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते अदिच्या उपस्थितीत आदिवासी समाजाची बैठक आयोजित केली होती या बैठकीत भारतीय जनता पक्ष प्रणीत (एनडीए) सरकारच्या कार्यकाळात आदिवासी समाजावर मोठ्या प्रमाणावर आन्याय अत्याचार सुरू असल्याची चर्चा करण्यात आली.भाजप जाणीवपूर्वक आदिवासी समाजावर आन्याय अत्याचार करण्याऱ्यांना पाठीशी घालत आहे.या देशाच्या प्रमुखपदी आदिवासी समाजाच्या महामहिम द्रौपदी मुर्मु ह्या राष्ट्रपती लाभल्या आहे परंतु भाजप जाणीवपूर्वक त्यांचा व आदिवासी समाजाचा आवमान केला आहे.देशाच्या संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटनप्रसंगी महामहीम राष्ट्रपतींना जाणीवपूर्वक डावले, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करतांना पंतप्रधान खुर्चीवर बसून राहिले व घटनेच्या मुख्य पदावर असलेल्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु त्यांच्या समोर उभ्या राहील्याचे चित्र संपूर्ण जगाने पाहिले.त्यामुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या तसेच मणिपूरमध्ये कारगिल युद्धात देश वाचविणाऱ्या माजी सैनिकांच्या पत्नीसह  आदिवासी असहाय्य महिलांना विवस्त्र करुन धिंड काढण्यात आली. हिंसाचाराने हादरलेल्या मणिपूरमध्ये भेट देण्यासाठी पंतप्रधानांनी अद्याप वेळ मिळाला नाही. मध्यप्रदेशातील सीधी जिल्ह्यात भाजपाच्या प्रवेश शुक्ला या व्यक्तीने आदिवासी युवकावर लघवी केल्याची घटना घडली. या अत्यंत घृणास्पद कृत्यानंतर समाजात संताप व्यक्त करण्यात आला ह्या घटना ताज्या असतांनाच नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांबरोबर खासदार हेमंत पाटील यांनी गैरवर्तवणुकी केली आदिवासी समाजाचे डॉ. वाकोडे आणि बंजारा समाजाचे डॉ.राठोड यांना संडास साफ करायला लावले होते.त्यामुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत तर या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या वतीने या मतदारसंघात बाहेरचा उमेदवार लादला आहे.यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघात पाच टर्म भावनाताई गवळीचा पत्ता कट करून शिवसेना शिंदे गटाच्या सौ.राजश्री हेंमत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आता शिवसेना उबाटा गटाचे संजय देशमुख विरुद्ध शिवसेनेच्या राजश्री हिम्मत पाटील यांच्यात लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. आयात उमेदवाराचे पती मराठवाड्यातील एकमेव हिंगोली लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना शिवसेना शिंदे गटाच्या पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर झाली होती. या उमेदवारीनंतर महायुतीमध्ये नाराजीचा सूर उमटतांना दिसला हेमंत पाटील हे जनतेशी लॉयल नसलेले उमेदवार होते ते पाच वर्षात कधी जनतेत मिसळले नाही, लोकांची त्यांनी कामे केली नाही, केवळ पक्षाच्या प्रमुखाशी चांगले संबंध ठेवून उमेदवारी आणली होती शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांबरोबर खासदार हेमंत पाटील यांनी केलेल्या गैरवर्तवणुकी बदल मतदार संघातील आदिवासी व बंजारा समाज पेटून उठला होता.त्याचा निषेध म्हणून आदिवासी समाजाचे अनेक ठिकाणी हिंगोली-यवतमाळ जिल्ह्यात मोर्चे निघाले, निवेदने दिलीत तर मराठा आरक्षणावरून राज्यात वणवा पेटला असताना. अशाताच मराठा समाजाची जनभावना लक्षात घेत खासदार हेमंत पाटील यांनी राजीनामा देण्याबाबत इच्छा व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी थेट लोकसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहिले व ते पत्रदेखील व्हायरल केले होते.आपल्याच सरकराविरोधात राजीनामा दिला.यामुळे हेमंत पाटलांच्या विरोधात जनतेत नाराजी असल्याचं सांगत भाजपने शिंदेंवर दबाव टाकला एकनाथ शिंदेंनी हेमंत पाटलांची उमेदवारी मागे घेतली आपलाच जाहीर उमेदवार मागे घेण्याची नामुष्की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आली होती. ज्या उमेदवारांनी हिंगोली मतदार संघाचा विकास केला नाही तरीही महायुतीच्या वतीने यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघात त्याच खासदार हेमंत पाटलाच्या सुविध्पत्नी सौ. राजश्री हेमंत पाटील यांना लोकसभेची उमेदवारी देऊन या मतदारसंघात लादले असून निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. या लोकसभा मतदारसंघात आदिवासी समाजाचे जवळपास दोन लाख मतदार आहेत आदिवासी अस्मितेचा अपमान करणाऱ्या भाजप प्रणीत( एनडीए) महायुतीच्या उमेदवारास एकही स्वाभीमानी आदिवासी मतदान करणार नाही.व महायुतीने यवतमाळ -वाशिम लोकसभेच्या मतदार संघात आयात केलेले पार्सल पुन्हा नांदेडला पाठवण्याची आदिवासी समाज बांधवांनी घेतलेल्या बैठकीत निर्णय घेतला असून शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे अधिकृत उमेदवार संजय उत्तमराव देशमुख यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

या सभेच्या बैठकीत सर्वश्री रंगराव काळे जिल्हा समन्वयक उबाठा, माधवराव वैद्य राकाँ शरद पवार गट पुसद तालुकाध्यक्ष, राकाँचे ज्येष्ठ नेते सुरेश धनवे, ॲड. सुनिल ढाले, परसराम डवरे माजी जि. प. सदस्य, गजानन उघडे माजी जि. प. सदस्य, तोलबाजी चिरंगे, देविदास डाखोरे, रंगराव व्यवहारे चिलवाडी, शिवाजी धावस काटखेडा, दत्तराव पुरकुटे पुसद, भास्कर साखरे धरमवाडी, नारायणराव कहऱ्हाळे, हरिदास बोके पुसद, नथ्थुजी आढाव काळी दौलत, गजानन टारफे हर्षी, रामराव काळे नगरवाडी, सुदाम मारोती काळी ब्रम्ही, राजु प्रकाश गायकवाड मोहदरी, दत्ता बोलके पाथरवाडी, सुजित माधव आढाव पाथरवाडी, लक्ष्मीकांत तडसे पुसद, विजय मोहेकर माणिकडोह, पंकज वंजारे माणिकडोह, भाऊराव किसनराव बेले माजी सरपंच माणिकडोह, दावला काळे वाकद ई., यश मारकड हर्षी, विठ्ठल मिराशे लोहरा ई., निखिल दशरथे वडसद, शरद जोगदंडे वडसद, अभिजीत खरात वडसद, गजानन टाले सरपंच बांन्सी, मनोहर बोंबले पुसद, किसनराव इंगळे पुसद, किसनराव पुरकुटे पुसद, बापुराव पठारे पुसद, आनंदराव रनमले शिवाजीनगर, दत्ता चिरंगे चिरंगवाडी, विठ्ठल उघडे मनसळ, संतोष गारुळे खैरखेडा, दिलीप चिरमाडे आडगांव, संदीप विठ्ठलराव आढाव पाथरवाडी, भागवत चिरंगे चिरंगवाडी, देवानंद आंबोरे काळी दौलत, नथ्थुजी आढाव काळी दौ., परसराम डवरे बोरी इत्यादी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close