सामाजिक

वसंत नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत गणेशोत्सव ‘डिजेमुक्त’ साजरा केल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा पोलिस प्रशासनाच्या वतीने सन्मान!

पुसद : यावर्षी वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दि१४ते २६सप्टेंबरच्या महीन्यात साजरा करण्यात आलेल्या गणेशोत्सवात ६५ सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी समाजोपयोगी उपक्रम राबवून ‘डीजेमुक्त’ गणेश उत्सव साजरा केल्याने या गणेशोत्सव मंडळांपैकी ४२मंडाळच्या पदाधिकाऱ्यांचा वसंत नगर पोलिसांनी प्रशस्तीपत्र व शाल श्रीफळ देऊन सत्कार सन्मान करण्यात आला.

याबाबत वसंत नगर पोलिसांच्या सूत्रांनी झेप न्यूज’ ला दिलेली माहिती अशी की, यावर्षी वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शहरातील ३५तर ग्रामीण भागातील ३०अशा एकुण गणेश मंडळांनी श्रिची मुर्तीची स्थापना करून गणेशउत्सव साजरा करण्यात आला होता मात्र या गणेश उत्सवाच्या काळात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच सामाजिक सलोखा वाढवा या उदात्त हेतूने पोलीस प्रशासनाने या प्रत्येक ‘गणेश मंडळांना दत्तक पोलीस कर्मचारी’ ही संकल्पना

पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे राबविण्यात आली होती.दत्तक पोलिसांनी प्रत्येक गणेश मंडळांना नियमीत भेटी देऊन पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला या उपक्रमा अंतर्गत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना सामाजिक उपक्रमांसाठी प्रोत्साहन देवून त्यांना व्यसनमुक्ती, बाबत जनजागृती करणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे, वृक्ष रोपांनासह विविध सामाजिक उपक्रम या गणेश उत्सव मंडळ वतीने राबविण्यात आले तर विशेष म्हणजे या गणेश उत्सवाच्या मिरवणुकीत डिजेमुक्त मिरवणूक काढण्यासाठी पोलिसांनी कॉर्नर सभा शांतता सभा घेऊन डीजेच्या दुष्परिणामाचे जनजागृती केली होती.

या पोलिसांच्या आव्हानाला गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत डिजे न लावता पारंपरिक वाद्यांच्या साथीने गणेशोत्सव व मिरवणुका शांततेत पार पाडल्या त्यामुळे या उल्लेखनीय उपक्रमाची दखल पोलीस प्रशासनाने घेवून दि.९ ऑक्टोंबर रोजी वसंत नगर पोलिसांनी जवळपास ४२गणेश उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा पोलीस उपअधीक्षक पुजा राठोड, सपोनि सुगत पुंडगे, यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशस्तीपत्र व शाल श्रीफळ देऊन सत्कार सन्मान करण्यात आला.यावेळी वसंत नगर पोलीस स्टेशनचा संपूर्ण स्टाफ उपस्थित होता..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close