क्राइम

वसंत नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बिट जमादाराच्या आशीर्वादाने अवैध धंद्यांना सुगिचे दिवस मात्र ठाणेदाराने घेतले धृतराष्ट्राचे सोंग!

ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे बंद असल्याचे हमीपत्र द्यावे लागणाऱ्या जि.पो. अधीक्षकाच्या आदेशाला या पोलीसांकडूनच केराची टोपली!

पुसद: यवतमाळ जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करावे,असा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकाचा असताना सुद्धा पुसद शहरातील सध्या वसंत नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाचही बीटमध्ये बीट जमादाराच्या हप्ते खाऊ धोरणामुळे या अवैध धंद्यांना सुगीचे दिवस आले आहेत यामध्ये अवैध गावठी दारू, देशी दारू विक्री, चौका चौकातील पान टपऱ्यावर तसेच जुगार, मटका, तितली भवरा, अवैध गुटखा, अवैध प्रवासी वाहतूक, बैल बाजाराती गुराची वसुली,आदी अवैध धंद्यांना ऊत आला असून या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील या अवैध धंद्याची वसुली वीट जमादाराकडून राजरोजपणे सुरू आहेत. ही बाब गंभीर दखल घेण्याजोगी आहे तरीही सध्या कार्यरत असलेले २६७५, १८६९,१२९४,१३३३,३०२ या बीट जमादाराचे सुरू असलेले कामकाज समाधानकार नसल्याने पोलिस दलाची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे पुसद पोलीस उपविभागात उपविभागीय पोलीस अधिकारी व ठाणेदार यांना प्रत्येक महिन्यात त्यांच्या कार्यक्षेत्रात अवैध धंदे बंद असल्याचे हमीपत्र द्यावे लागणाऱ्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.त्याच कारणाने वसंत नगर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकाऱ्याने हे अवैध धंद्दे रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडवणीस व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे दाखल केली असून जर तक्रारीची या अधिकाऱ्याने तात्काळ दखल घेऊन संबंधित बिट जमादारांना शासकीय सेवेतून बडतर्फ करून कारवाई केली नाही किंवा त्यांची बदली जिल्ह्याबाहेर केली नाही तर आंदोलन किंवा उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोठेही अवैध धंदे, जुगार, दारु अड्डे आढळून आल्यास त्याला सर्वस्वी संबंधीत उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलिस ठाण्याच्या निरीक्षकाला जबाबदार धरण्यात येणार होते. एवढेच नाही तर आपल्या हद्दीत कोणत्याही प्रकारचे धंदे सुरू नाहीत असे हमीपत्र द्यावे लागणार असे आदेश होते तरीही वसंत नगर पोलिसांनी या आदेशाला केराची टोपली दाखवली की काय? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.जिल्ह्यात कोणत्याच प्रकारचे अवैध धंदे चालू द्यायचे नाहीत, तसेच या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करावे,असे जिल्हा पोलीस अधीक्षकाचे आदेश असतांना सुद्धा पुसद शहरातील सध्या वसंत नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाचही बीटमध्ये बीट जमादाराच्या हप्ते खाऊ धोरणामुळे या अवैध धंद्यांना सुगीचे दिवस आले आहेत वसंत नगर क्रमांक-१ बीट जमादार विनोद पवार २६७५ वसंतनगर, पार्वतीनगर, दूधे ले-आउट, खडसे मैदान, अरुण ले-आउट, रहेमत नगर, बेंडकीपुरा, बंजारा व्हिल्स कानडे ले-आउट, रेस्ट हाऊस,अखिरत नगर, सहारा पार्क,अनस कॉलनी, प्रणवनगर, तथागत नगर,वसंत नगर क्रमांक-२ बीट जमदार विष्णू नालमवार १८६९ शिवाजी वार्ड,विद्यानगर, जयनगर,भाग्यनगर, धनकेश्वर नगर, शांतीनगर, आदर्श नगर,विठाबाई नगर,मुंगसाजी नगर, दया नगर, सरनिक ले-आउट, जमजम कॉलनी, मोमीनपुरा, वॉटर सप्लाय परिसर, मेडिकेअर हॉस्पिटल परिसर,श्रीरामपूर बीट जमादार गोपाल ठाकूर १२९४ श्रीरामपूर, इंजिनियर कॉलेज परिसर, ग्रीन पार्क, सप्तगिरी नगर, कदम लेआउट, द्वारका नगरी, धम्म नगर,गोकुळ नगर,गांधीनगर, बावणे ले-आउट,पत्रे ले-आउट,भोजला बीट जमादार विजयसिंग ठाकूर १३३३ भोजला वालतुर रेल्वे, पार्डी, निंबी बजरंग नगर, गणेशपुर तांडा, सेवादास नगर,मधुकर नगर बीट जमादार संतोष चव्हाण ३०२ मैनाबाई नगर, येरावर ले-आउट, पी.एन.कॉलेज परिसर, गायमुख नगर,मधुकर नगर,सुदर्शन नगर सुधाकर नगर,वरुड, या पाचही बीटमध्ये अवैध गावठी दारू, देशी दारू विक्री, चौका चौकातील पान टपऱ्यावर तसेच जुगार, मटका, तितली भवरा, अवैध गुटखा, ऑटो, अँपेरिक्षांची बेकायदा वाहतूक, अवैध प्रवासी वाहतूक, बैल बाजाराती गुराची वसुली,आदी अवैध धंदे तेजीत सुरू असताना पोलिस अधिकारी धृतराष्ट्राचे सोंग घेत आहेत. अवैध धंद्यांवर कारवाईचा फास आवळण्यात महत्त्वाची भूमिका असलेली स्थानिक बीट जमादार मात्र अवैध धंद्याच्या वसुलीच्या कामात गर्क आहेत.या पोलीस ठाण्याची हद्दीत एकूण पाच बिटमधील जवळपास प्रत्येक गावामध्ये आणि वसंत नगर मधील इदगाच्या बाजूला ३ अवैध मटक्या वाल्याचे काउंटर चालू असुन तर वसंत नगर गल्ली नंबर -१ मटका काउंटर , जिल्हा परिषद व्यापार संकुलाजवळ-१, मामा चौक रेस्ट हाऊस जवळ-१ मटका काउंटर मटका काउंटर ,मुलतानवाडी परिसरात-१ मटका काउंटर, सोनम वाईन बार जवळ-१ मटका काउंटर, श्रीरामपूर पोस्ट ऑफिस जवळ-१ व एम एस ई बी कार्यालयाजवळ -१ कवडीपुर -निंबी इथेही मटका काउंटर सुरू आहेत. मधुकर नगर येथे अवैध गावठी दारू आणि देशी दारू तसेच ३ मटक्याचे काउंटर व गुटखा विक्री सुरू आहेत तसेच बैल बाजारात येणाऱ्या गुरांचा मोठ्या प्रमाणात हप्ता वसूल केल्या जात आहे.गायमुख नगर येथे अवैध गावठी दारू पाडणाऱ्याची जवळपास संख्या मोठ्या प्रमाणावर आहेत. माहूर चौकात खुल्लेआम पान टपऱ्यावर देशी दारूची विक्री केली जात आहे. भोजला बीट मध्ये अवैध गावठी दारू देशी दारू मटका सर्रासपणे सुरू आहे. तर दुसरीकडे या पाचही बीटमध्ये अवैध गावठी दारू,देशी दारू, अवैध मटका, तितली भवरा, गुटखा विक्री, अवैध वाहतुकीची वसुली राजरोसपणे सुरू आहे. तसेच पार्डी व सुदर्शन नगर येथे गुटखा विक्रीचे मोठे केंद्र आहेत तर सामान्य नागरिकांना या अवैध धंद्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे, मात्र संबंधित व्यावसायिक आणि पोलीस यांचे संगणमत असल्याने याबाबत एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीने तक्रार दाखल केली तर या बीटमध्ये कार्यरत असलेले हे बीट जमदार या अवैध धंद्यावाल्याशी संगणमत करून त्या तक्रारदाराचे नाव जाहीर करतात नंतर याच्यातूनच भानगडी तयार करा करतात व उलट तक्रारदारावरच दबाव टाकल्या जातो त्यामुळे आजपर्यंत या अवैध धंद्या विरुद्ध झालेल्या तक्रारीची शहानिशा केली तर हेच कारण उघड होऊ शकते. त्यामुळे या अवैध व्यावसायिकांची दहशत असल्याने नागरिक तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. तर याचाच फायदा घेऊन संबंधित पाचही बीट मधील बीट जमादार व अवैध धंदेवाली संगणमत करून लाखो रुपयांची वर कमाई करीत आहेत. या ठाण्यातील बिट जमदाराच्या हप्ते खाऊ धोरणामुळे या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पाचही बीट मध्ये सध्या अवैध धंद्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून, त्यामुळे गावागावांत गुन्हेगारी प्रवृत्ती डोके वर काढू लागल्या आहेत. हातभट्टीची दारू, मटका, जुगार, गांजा तस्करी यांसारख्या अवैध व्यवसायांनी या ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण अर्थव्यवस्थेसोबतच सामाजिक स्वास्थ्यही बिघडवले जात आहे. विशेष म्हणजे या कृत्यांना स्थानिक पोलिसांचे व बीट जमादारांचे अभय आहे. शेतात आणि ओढ्याकाठी चालणाऱ्या हातभट्‌‍ट्यांचे लोण आता थेट गावातील गल्लीबोळापर्यंत पोहोचले आहे. ढाबे आणि टपऱ्यांच्या आडून छुप्या पद्धतीने होणारी अवैध दारू विक्री आता ओपन सिक्रेट झाली आहे. यामुळे अनेक सुखी संसार उघड्यावर पडत आहेत. केवळ दारूच नव्हे, तर ग्राामीण भागातील हॉटेल आणि टपऱ्यांच्या आडोशाने मटका आणि पत्त्यांचे क्लब जोमात सुरू आहेत. काही विशिष्ट भागांत दिवसाढवळ्या मटक्याच्या आकडे लावले जात आहेत. कमी वेळांत श्रीमंत होण्याचे आमिषदाखवून तरुणांची लूट केली जात आहे. गल्लोगल्ली असलेल्या या जुगारांच्या अड्ड्‌‍यांमुळे अनेक संसार उघड्यावर येत आहेत ज्यामुळे महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.अवैध दारू अड्ड्यांमुळे परिसरात टवाळखोरांचा वावर वाढला असून, याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठे कॉलेज आहे शाळा आहेत त्यामुळे शाळा कधी विद्यार्थी विद्यार्थिनींना तसेच महिलांना रस्त्यावरून ये-जा करणे कठीण झाले आहे.तर शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात देखील अमली गुटख्याची विक्री होत त्यामुळे कॉलेजला जाणारी तरुण मुले व्यसनाच्या आहारी जात आहेत अनेक गावात व्यसनाधीन झालेले तरुण कमी वयात जात असल्याने अनेक महिला विधवा झाले आहेत त्यामुळे या अवैध धंद्यांमुळे मजुरी करणाऱ्या कामगारांचा कष्टाचा पैसा या अवैध धंद्यांच्या विळख्यात जात आहे. त्यामुळे अनेक कुटुंबात कौटुंबिक कलह वाढला असून, महिलांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. परंतु स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रारी देऊनही कारवाईच्या नावाने पोलिसांकडून केवळ धूळफेक केली जात आहे. पोलिसांची गाडी येण्यापूर्वीच या अवैध धंद्याच्या अड्ड्‌‍यांवर निरोप पोहोचतो, ही कार्यपद्धती पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. कारवाई होते पण पुन्हा काही तासांतच हे अवैध धंदे जशास तसे सुरू होतात मात्र या ठाण्याची पोलीस निरीक्षकांनी जााणी झोपेचे सोंग घेतले आहे. त्यामुळे या ठाण्याच्या हद्दीतील पाचही बीट जमादार जबाबदारीची वरिष्ठ स्तरावरून सखोल चौकशी करून हे बिट जमादार शासकीय सेवेत राहून अवैध धंद्येवाल्याना सहकार्य करीत असल्याने तसेच या हप्ते खाऊ धोरणातून त्यांनी अवैधरित्या कमावलेल्या मालमत्तेची तसेच त्यांच्या नातेवाईकांच्याही मालमत्तेची व बँक खात्याची वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत सखोल चौकशी करून वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेल्या या पोलीस कर्मचाऱ्यांना ७ दिवसांच्या आत शासकीय सेवेतून बडतर्फ करावे किंवा जिल्हा बाहेर गडचिरोली जिल्ह्यात तात्काळ बदली करावी तसेच या ठाण्याच्या हद्दीत पाचही बीटमध्ये अवैध धंदे करणाऱ्या विरुद्ध स्थानबद्धतेची (महाराष्ट्र प्रतिबंधक गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत) तरतुदीनुसार कारवाई करण्यात यावी अशी आशियाई ची तक्रार सामाजिक कार्यकर्ते यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पोलीस महासंचालक व पोलीस आयुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे दाखल केली आहे, संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई केली नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन किंवा उपोषण करण्याचा पोलीस प्रशासनाला तक्रारकर्त्यांनी इशारा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close