रक्त म्हणजे जीवन, प्रत्येकाने पुढे येऊन रक्तदान करावे:११४ वेळा रक्तदान करणारे गिरीश अनंतवार यांनी दिला संदेश!
पुसद येथील जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने गिरीश अनंतवार यांना पंचरत्न पुरस्काराने सन्मानित!

पुसद:रक्तदान हेच श्रेष्ठदान! रक्तदान हे एक समाजकार्य आहे. एखाद्या व्यक्तीस आपण रक्तदान करून त्याचे प्राण वाचवू शकतो रक्तदान केल्याने दुसऱ्याचा जीव वाचतो व आपल्या शरीरात नवीन, शुद्ध रक्त तयार होते. त्यामुळे पुसद शहरातील सामाजिक कार्यकर्ते गिरीश अनंतवार यांनी ११४ वेळा रक्तदान करून आपलीं सामाजिक बांधिलकी जपली असून अनेक गरजु रुग्णांचे प्राण वाचविल्याने त्यांच्या या सामाजिक कार्याची जेष्ठ नागरिक संघ पुसद यांनी दखल घेऊन त्यांना पंचरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.याबाबत प्राप्त माहिती अशी की पुसद शहरातील सामाजिक कार्यकर्ते गिरीश अनंतवार यांनी ११४ वेळा रक्तदान करून अत्यंत गौरवास्पद आणि कौतुकास्पद सामाजिक कार्य केले आहे शंभरहून अधिक वेळा रक्तदान करणारी व्यक्ती खऱ्या अर्थाने ‘जीवनदाती’ ठरते,रक्तदान हेच श्रेष्ठदान! हे वाक्य आपण नेहमीच ऐकत असतो. वास्तविक रक्तदान करणे ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. या चांगल्या कार्यामुळे आपण एखाद्याचे प्राण सुद्धा वाचवू शकतो याच सामाजिक कार्याची दखल पुसद येथील ज्येष्ठ नागरिक संघाने घेतली असून सामाजिक उत्तरदायित्वाची जाण ठेवून आपल्या हातून जे पुण्यकार्म होत आहे ते वर्णनातीत आहे अतुलनीय अशा कामाचा ठसा समाज मनाच्या स्मरणात कायम राहील्याने या सामाजिक कार्यकर्त्यांची ज्येष्ठ या नात्याने त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन अशीच सेवा निरंतर आपल्या हातून घडत राहो ही सदिच्छा रुपी कौतुक करून त्यांनी मला पंचरत्न या पुरस्काराने सन्मानित केले. दि,१७सप्टेंबर प्रयत्न ११४वेळा रक्तदान केलेले आहे तसेच इतर लोकांचे सुद्धा मी रक्तदान करून घेतलेले आहे रक्तदान करण्यासाठी अनेक मंडळे तसेच सेवाभावी संस्था व रुग्णांच्या नातेवाईकांना स्वतः रक्तदानाचे महत्त्व समजावून सांगून रक्त करण्यास प्रोत्साहन दिले व अशा लोकांकडून रक्तदान करून घेतले त्यामुळे रक्तदानाची चळवळ आजपर्यंत तळागाळात पोहोचविली आजपर्यंत ५० हजार लोकांचे रक्तदान त्यांनी करून घेतले आणि ते रक्त गरजू रुग्णांना तसेच ब्लड बँकांना वितरित करण्यात आले थैली सेमिया या दुर्धर आजाराने जे बाळ रुग्ण बाधित आहे अशा १५ लोकांना रक्तासाठी दत्तक करून घेतलेले जेव्हा जेव्हा त्यांना रक्ताची गरज पडते त्यावेळेस त्यांना रक्ताचा पुरवठा यांच्या मार्गदर्शनाखाली केला जातो रक्तादानाचा जणु काही या सामाजिक कार्यकर्त्यांला आगळावेगळा छंद आहे. रक्तदानासाठी रोटरी या आंतरराष्ट्रीय क्लबने सुद्धा सत्कार केला आहे. कॉम टीव्ही ग्लोबल आर्य वैश्य समाज यांच्या वतीने ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड २०२१ ला प्राप्त झाला वासवी क्लब इंटरनॅशनल यांच्यावतीने २०१५ साली त्यांना आयकॉन म्हणून सत्कार करण्यात आला फुलसिंग नाईक महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी मेळाव्यात वाणिज्य व व्यवस्थापन तसेच कॉमर्स असोसिएशन यांच्यातर्फे सुद्धा सत्कार करण्यात आला होता, दिव्यांग जनशक्ती बहुउद्देशीय संस्था यांच्या तर्फे २०१९ ला माझा सत्कार करण्यात आला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम जयंती निमित्य सलग तीन वर्ष सत्कार सन्मान करण्यात आला आयुर्वेद महाविद्यालय पुसद येथे स्नेहसंमेलनानिमित्त २०२३साली सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला श्री ज्ञानेश्वर संस्थान पुसद सत्कार करण्यात आला माणुसकीची भिंत या सेवाभावी संस्थेने माझा २०२१साली सत्कार झाला आर्य वैश्य समाज यांच्या वतीने सुद्धा यशवंत नागरिक म्हणून २०२४ मध्ये सत्कार करण्यात आलेला आहे, पुसद येथील हिंदी वाचनालय यांच्यातर्फे सर्वाधिक वेळा रक्तदान केल्या म्हणून मानवसेवेचे कार्य केल्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन २०२१ मध्ये सत्कार करण्यात आला एक्झिक्यूटिव्ह श्री या जिल्हास्तरीय शरीर संस्था स्पर्धेत २०२१ मध्ये केसरी युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले धैर्य सोशल वेल्फेअर फाउंडेशन यवतमाळ यांच्यावतीने सुद्धा रक्तदाता गौरव व सन्मानचिन्ह देऊन २०२६ मध्ये रक्त रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले इंदिराई बहुउद्देश्य संस्था वाशिम द्वारा दिव्यांग पुनर्वसन या कार्यक्रमात मला मोमेंट देऊन पुरस्कृत केले चिंतामणी देवस्थान पुसद च्या वतीने सुद्धा सत्कार करण्यात आला स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त सुद्धा रक्तदान महायज्ञात प्रमाणपत्र देऊन सत्कार केला उपजिल्हा रुग्णालय पुसद यांनी सुद्धा शंभर वेस रक्तदान झाले म्हणून सन्मानपत्र देऊन सत्कार केला२०२० यवतमाळ जिल्हा पोलीस यांच्या वतीने सुद्धा २६ जानेवारी २०२० ला रक्तदानाबद्दल सत्कार करण्यात आला पुसद तहसीलच्या वतीने तहसीलदाराच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला राज्य रक्त संक्रमण परिषद च्या वतीने सुद्धा सत्कार करण्यात आलातर ययाती भाऊ नाईक यांच्या हस्ते२०२२-२३ या वर्षासाठी जनसेवा हा म्हणून पुरस्कार मिळाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या कार्यक्रमात सन्मानपत्र देऊन सुद्धा सत्कार करण्यात आला.विश्वेश्वरया इंजिनियर्स अँड आर्टिक टॅक्स असोसिएशन पुसद च्या वतीने सुद्धा सत्कार करण्यात आला जगद्गुरु तपस्वी श्री संत रामराव महाराज सेवा आश्रम धार्मिक ट्रस्ट पोहरादेवी ता. मानोरा यांच्या हस्ते सुद्धा सामाजिक कार्य व रक्तदान कार्यासाठी समाजातील मुलाची योगदान दिले त्या कार्यातील समर्पण व प्रामाणिकपणा व उत्कृष्ट कामगिरीबद्दल रामनवमी निमित्य श्री संत सेवालाल महाराजांचे जन्मोत्सवाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला महाराष्ट्र युवा शिक्षक संघ यांच्या महायोगी उत्सव नाशिक येथे १० व ११ डिसेंबर २०२२ ला सुद्धा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला आमदार हिंगणघाट समुद्रपूर सिंधी रेल्वे विधानसभा क्षेत्र आदरणीय समीर भाऊ कुणावर यांच्या वतीने सुद्धा एक विठ्ठलाची मूर्ती देऊन छानसा सत्कार करण्यात आला अनाथांचा नात सेवा मंडळ पोफळी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ यांच्याव तीने वारकरी वैभव या पुरस्काराने सन्मानित करून महंत प्रमोद महाराज जगताप बारामती यांच्या हस्ते श्री नामदेव महाराज मंदिर विजापूर गल्ली पंढरपूर येथे सुद्धा सत्कार करण्यात आल्याने आता यांच्या या कार्याची दखल समाजाने तसेच विविध सामाजिक संस्था संघटनांनी घेतली आहे परंतु आता शासनाने कींवा प्रशासनाने जिल्हा पातळीवर किंवा राज्य पातळीवर या सामाजिक कार्याची दखल घेण्याची गरज आहे.



