ईतर

राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची शेतकरी, निराधार मुलांसोबत दिवाळी साजरी; आनंदाचा शिधा, दिवाळी फराळ, गोड पदार्थ केले वितरित

पुसद : दिवाळी हा आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण असून यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी पुसद तालुक्यातील गौळ मांजरी, चिलवाडी, भगतवाडी आणि श्रीरामपुर येथे सहपत्नीक उपस्थित राहून शेतकरी कुटुंब, निराधार मुलांसोबत उत्साहात दिवाळी साजरी केली.

यावेळी एल निनोच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीवर राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा केली. शेतकऱ्यांच्या अडचणी, गावातील विविध समस्या आणि संभाव्य उपाययोजनांबाबत संवाद साधत संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

 

गावातील निरागस बालकांसोबत दिवाळीचा आनंद साजरा करताना फटाके फोडून तसेच फटाक्यांचे वाटप करून त्यांच्या आनंदात भर घातली. गावातील ज्येष्ठ नागरिकांना दिवाळीनिमित्त ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. तसेच राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि पुसदच्या नगराध्यक्ष मोहिनी नाईक यांच्या हस्ते शेतकऱ्यांना दिवाळीची भेट म्हणून विविध गोड पदार्थांसह ‘आनंदाचा शिधा’, दिवाळी फराळ वितरित करण्यात आला.

 

ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि त्यांच्या मनातील समाधान हीच खरी दिवाळी साजरी केल्याची अनुभूती असल्याची भावना राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी व्यक्त केली.

 

याप्रसंगी ग्रामस्थांसोबत विविध विषयांवर संवाद साधत त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि बालकांसोबत स्नेहपूर्ण वातावरणात साजऱ्या झालेल्या या दिवाळी सोहळ्याने गावात आनंद आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close