क्राइम

पुसद शहर पोलीसांचे हातभट्टी दारु अड्डयांवर धाडसत्र: गावठी दारुसह पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त; तात्पुरती मलमपट्टी नको, तर कायमस्वरूपी कारवाईची मागणी!

पुसद : शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध हातभट्ट्या विरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. पुणे येथे विषारी दारुच्या सेवनामुळे अनेकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर राज्यभरात सुरु असलेल्या हातभट्ट्यांचा मुद्दा ऐरणीवर आला. त्या पार्श्वभूमीवर पुसद शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील अवैधरित्या हातभट्टनिर्मिती आणि विक्री केंद्रांविरोधात मोहीम सुरु केली असून १८ अवैधरित्या गावठी हातभट्ट्या उध्वस्त करून ५४ लिटर अवैध गावठी दारूसह २१०० लिटर मोहाचा सडवा नष्ट करून १६१७७७/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. परंतु राज्यातील एखाद्या जिल्ह्यातील परिसरात विषारी दारूमुळे जवळपास १९ जणांचा मृत्यू झाल्यानंतरच किंवा अशी दुर्दैवी घटना घडल्यानंतरच राज्यातील पोलीस प्रशासनाला जाग येत असेल तर हा मात्र संशोधनाचा विषय आहे मात्र सध्या याच पार्श्वभूमीवर अवैधरित्या हातभट्ट्याच्या धंद्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांचे नाहक बळी गेल्यावरच संबंधित प्रशासनाला हातभट्‌‍ट्या दिसतात, मग इतर वेळेस त्यांच्याकडे डोळेझाक कां केली जाते?, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. त्यामुळे तात्पुरती मलमपट्टी नको, तर कायमस्वरूपी कारवाईची मागणी या परिसरातील नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.याबाबत सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, पुसद शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील परिसरातील तांडे, वाड्या, वस्त्या झोपडपट्‌‍ट्यांलगत आदी भागांत हातभट्टीचा व्यवसाय फोफावला असुन अनेक ठिकाणी खुल्लेआम रसायनमिश्रित हातभट्टी दारू बनवली जाते.तर स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस बिट जमादार हे या अवैधरीत्या हातभट्ट्या चालकांकडून खुल्लेआम चिरीमिरी घेऊन संबंधित पोलिस यंत्रणाच या परिसरात अवैध व्यवसायवाढीला जबाबदार आहेत. हातभट्टी व्यावसायिकांकडून पोलिस हप्ते वसूल करत असल्याने या अवैध दारू विक्रेत्याचे मनसुबे वाढले असून या भागात खुल्लेआम हातभट्टीचा व्यवसाय फोफावला आहे. ‌‘सद्रक्षणाय खलनिग्राहणाय‌’ या बीदवाक्याप्रमाणे पोलिसांनी आपले कर्तव्य अधिच बजाबले असते तर हे हातभट्टी निर्मिती केंद्र सुरू राहीले नस्ते या पोलीसांच्या हद्दीतील परिसरातील आजही अनेक भागात हातभट्टी आणि देशी दारूची विक्री होत आहे.सायंकाळी सहानंतर या अड्ड्‌‍यांवर तळीरामांची मोठी गर्दी पाहवयास मिळते. मागील काही वर्षापासून बिअर व वाइनच्या दरामध्ये मोठी वाढ झाली. त्यामुळे दररोज बिअर किंवा वाइन घेणारे लोकही आता कमी किमतीमध्ये मिळणाऱ्या हातभट्टी आणि देशी दारूकडे वळू लागले आहेत. दिवसभर मोलमजुरी करून सायंकाळी हातभट्टी आणि देशी दारू पिऊन घरी जाणाऱ्या कामगारांचे प्रमाण यात जास्त आहे.

दारूमुळे स्वतःच्या शरीराचे तर वाटोळे होतच आहे; पण दारूवर पैसे उधळल्याने त्यांच्या संसाराची व मुलाबाळांच्या शिक्षणाचीही हेळसांड होत असल्याने महिलावर्गामध्ये याविषयी प्रचंड रोष आहे.हातावर पोट असणारे मजूर आणि कष्टकरी वर्ग स्वस्तात मिळणाऱ्या गावठी दारूच्या आहारी जात असून, अनेकांची कुटुंबेही उद्ध्‌‍वस्त झाल्याची उदाहरणे आहेत.परिसरात रात्रंदिवस पेट्रोलिंग सुरू असल्याचे पोलिस सांगतात आणि अवैध दारूधंद्यांवर नियमित कारवाई केली जात असल्याचे पोलिस सांगतात मात्र पोलिसांची गाडी गेल्यानंतर पुन्हा अवैध धंद्यांना ऊत येतो पोलिसांनी केवळ तात्पुरती कारवाई न करता कायमस्वरूपी उपायोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.पुणे जिल्ह्यातील परिसरात विषारी दारूमुळे अनेकांचं मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली त्याच पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्हा पोलीस अधिक्षक कुमार चिंता यांनी घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन कोणत्याही प्रकारची घटना यवतमाळ जिल्ह्यात घडु नये म्हणून यवतमाळ जिल्हयात अवैध्यरीत्या सुरू असलेल्या गावठी

हातभट्ट्याची दारु गाळना-यावर कारवाई करण्याची विशेष मोहीम राबवुन अवैध्यरीत्या गावठी हातभट्टी गाळणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश पुसद शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सेवानंद वानखेडे यांना दिले त्यावरुन ठाणेदार सेवानंद वानखेडे यांनी पोलीस स्टेशन पुसद शहर चे पोलीस अधिकारी व अमलदार यांचे वेगवेगळे पथक तयार करुण दि. ३मे२०२६ पासुन रोज सकाळी ५/०० वाजता उठुन ग्राम आरेगाव, मोहा, अश्निनपुर, सेलु, बोरनगर, वसंतपुर, बोरी, येथे वेगवेगळ्या ठिकाणी अवैध्यरीत्या गावठी हातभट्टी दारु गाळना-यावर धाडी टाकुण एकुण १८ गावठी हातभट्टीचे अड्डे उध्दवस्त करुण अंदाजे २१०० लिटर मोहामास सडवा नष्ट केला व ५६ लिटर गावठी हातभट्टी दारु असा एकुण १,६१,७७०/- रुपयेचा मुद्देमाल जप्त करन्यात आली असुन गावठी हातभट्टीची दारु गाळना-या संबधितावर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंद करन्यात आले आहेत तसेच त्यांचे कडुन भविष्यात अशाच प्रकारचे गुन्हे पुन्हा घडु नये म्हणुन प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करन्यात आली आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक, कुमार चिंता, अप्पर पोलीस अधिक्षक, थोरात, एस.डी.पी.ओ.श्री. गायकवाड साहेब यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार सेवानंद वानखडे, पोउपनि अक्षय सनगर, पोउपनि राजू ठोंमरे, स. फो. सुभाष जाधव, पो. हवा. मनोज कदम, ईदल आडे, निलेश उचेकर, अविनाश राठोड, अतुल दातीर, निरंजन आडे, पो, काँ, शुध्दोधन भगत, पो.कॉ. सुदर्शन खंदारे, पो.का. अनुप मडके, म.पो.काँ,किरण राठोड, हेमलता रोकडे, रजनी बानाईत यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close