डीएमएलटीत स्वप्नपूर्तीचा जलवा! एकाच संस्थेच्या विद्यार्थ्यांची ‘टॉप थ्री’वर मोहोर; प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकावर कब्जा!

पुसद : महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त डी.एम.एल.टी. परीक्षेच्या निकालात पुसदच्या स्वप्नपूर्ती पॅरामेडिकल व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत यशाची हॅट्ट्रिक साधली. विशेष म्हणजे, एकाच संस्थेच्या तीन विद्यार्थ्यांनी परीक्षेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावत ‘टॉप थ्री’वर आपली मोहोर उमटवली. या उल्लेखनीय कामगिरीमुळे संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेची सर्वत्र चर्चा होत आहे.कु.शिला मारुती जंगले हिने तब्बल ९२.५६ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु.रोशनी सदानंद जाधव हिने ८८.७८ टक्के गुणांसह द्वितीय, तर प्रज्वल किशोर गोकुळे याने ८७.५६ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.मेहनत, प्रशिक्षण अन् मार्गदर्शनाचा परिणामविद्यार्थ्यांच्या या यशामागे सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत, प्रयोगशाळेतील प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानाचे शास्त्रीय ज्ञान आत्मसात करत विद्यार्थ्यांनी परीक्षेत मिळविलेल्या गुणांच्या माध्यमातून आपली गुणवत्ता सिद्ध केली.एकाच संस्थेतील विद्यार्थ्यांनी निकालातील पहिल्या तीन क्रमांकांवर स्थान मिळविण्याची कामगिरी केल्याने स्वप्नपूर्ती पॅरामेडिकल वोकेशनल ट्रेनिंग सेंटरच्या शैक्षणिक वाटचालीत हा निकाल विशेष मानला जात आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षक, पालक, मार्गदर्शक व मित्रपरिवाराकडून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.


