राजकिय

लाडकी बहीण योजनेतील अन्यायग्रस्त महिलांच्या न्यायासाठी पुसद काँग्रेसचा जनता दरबार! पात्र व अन्यायग्रस्त महिलांच्या समस्या ऐकून घेऊन संबंधित शासकीय यंत्रणेकडे पाठपुरावा करून बहिणींना न्याय मिळवून देणार -डॉ. मोहमद नदीम

पात्र महिलांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी पुसद काँग्रेस करणार पाठपुरावा

पुसद : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत असलेल्या तसेच पात्र असूनही विविध कारणांमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुसद तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जनता दरबाराचे आयोजन करण्यात करण्यात आले होते.सदर जनता दरबारच्या अध्यक्ष स्थानी डॉ. मोहमद नदीम महासचिव प्रदेश काँग्रेस, तर प्रमुख उपस्थिती डॉ. सारिका सचिन नाईक, जिल्हा उपाध्यक्ष ऍड. वासिम अहेमद,तजम्मूल हक्क प्रकल्प उप समन्व्यक तालुका अध्यक्ष ज्ञानदीप कांबळे, शहर अध्यक्ष झिया शेख,अभिलाष खैरमोडे विधानसभा अध्यक्ष,महिला शहरअध्यक्ष योगिता नेमायते, नगरसेवक अमरीन गाझी खान, नगरसेवक समिना फिरोज खान, नगरसेवक जब्बार लाखे, इर्शाद कुरेशी होते.

         पुसद तालुक्यातील व शहरातील अनेक महिलां कडून लाडकी बहीण योजनेसंदर्भात विविध अडचणी व तक्रारी काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडे मांडण्यात आल्या.अर्जातील त्रुटी, के. वाय.सी. शासनाने बंद केली आहे तसेच कागदपत्रांशी संबंधित अडचणी, बँक खाते व आधार संलग्नतेच्या समस्या तसेच पात्रता असूनही लाभ मिळत नसल्याच्या तक्रारींची जनता दरबारात महिलांनी मांडल्या.या पार्श्वभूमीवर पुसद तालुका व शहर काँग्रेसचे वतीने जनता दरबार घेऊन महिलांच्या समस्या थेट ऐकून घेण्यात आल्या. प्राप्त तक्रारींचा संबंधित शासकीय विभागाकडे पाठपुरावा करून पात्र महिलांना नियमानुसार न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करणार आहे.“लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणे हा पात्र महिलांचा हक्क आहे. पात्र असूनही कोणतीही महिला केवळ प्रशासकीय अडचणींमुळे लाभापासून वंचित राहू नये, यासाठी काँग्रेस महिलांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवत राहील,” अशी भूमिका शहर अध्यक्ष झिया शेख यांनी व्यक्त केली.जनता दरबारात महिलांनी आपल्या तक्रारी व योजनेशी संबंधित कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन पुसद शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.या उपक्रमामुळे लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध केल्या मुळे महिला मध्ये आनंद व्यक्त करण्यात आले सदर जनता दरबार मध्ये असंख्य महिला उपास्थित होत्या.सदर जनता दरबार यशस्वीते करिता मसूद मिर्झा,मोहम्मद जुनेद,अहमद पठाण,गाझी खान,प्रकाश नेमायते,शाहिस्ता खान, समरीन खान,रमेश केचकर,पाशा खान,हमीद अली, योगेश जाधव,फिरोज खान,सादिक ठेकेदार, राहील खान, जाफर अली यांनी अथक परिश्रम घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close