स्वातंत्रदिनाचे औचित्य साधून चेतना क्रीडा मंडळ पुसदच्या वतीने गरजू नवोदित फुटबॉल खेळाडुना फुटबॉल शुजचे वितरण

पुसद: येथील चेतना कि्डा मंडळ तर्फे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून खेळाडूंना फूटबाल शूज चे वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हाजी इद्रिस खान उपाध्यक्ष चेतना किडा मंडळ यांनी भुषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून पुसद शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार उमेश बेसरकर उपस्थित होते. मंचावर नगर परिषद पुसदचे माजी उपाध्यक्ष डॉ. मोहमद नदिम , माजी नगर सेवक तथा बयास पत संस्थेचे अध्यक्ष निशांत बयास, माजी नगर सेवक उत्तम चापके, दिपक जाधव, तसेच हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे पदाधिकारी नानासाहेब जळगांवकर, मंडळाचे मार्गदर्शक शे. कय्युम शेख मुनाफ, ललीतभाई चव्हाण, इश्त्याक भाई, झिया भाई, हे कार्यक्रमात सहभागी होते.मंडळाचे वतीने हाजी इद्रिस खान ,अनिसभाई चव्हाण तसेच मंडळाचे माजी सचिव स्व.ए.डी. खान यांच्या पत्नी हे सर्व हज तिर्थयात्रेला जावून आल्याने तसेच मंडळातील काही सदस्यांनी त्या त्या खात्यामध्ये सेवा देवून सेवानिवृत्त झाल्याने नंदकुमार चौधरी पोलीस विभाग, नंदकुमार पांडे सीआरपीएफ, भगवान पवार पोलीस खाते हयांचा तर वि. परिस्थितीत नौकरीमध्ये बढती मिळालेले पोलीस खात्यातील शेख मसूद शेख मुनाफ (ए.एस.आय) तर को. दौ. विद्यालयात पर्यवेक्षक म्हणून बलराम मुरारी यांची पदोन्नती झाली त्यांचाही सत्कार उपस्थितांचे हस्ते करण्यात आला.प्रस्तुत कार्यक्रम हा मंडळाचे अध्यक्ष अॅड. विरेंद्र जगजीवन राजे यांचे संकल्पनेतून आयोजीत करण्यात आला .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे प्रितीन आहाळे, सैय्यद अन्सार उर्फ हन्नान बाबा, शेखर जोशी, बबलू खान गफार खान अजय पोंगाडे, ज्ञानेश्वर गादेकर यांनी परिश्रम घेतले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सचिव सुशिल दिक्षीत यांनी केले तर आभार प्रदर्शन नंदकुमार चौधरी यांनी केले.



