क्राइम

मांडवा शिवारात प्रेमियुगलांचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की खून?तर्कवितर्कांना उधाण!

पुसद: तालुक्यातील मांडवा येथील शेतशिवारात प्रेमीयुगुलांचे विहिरीत दोघांच्या कमरेला नायलॉनची पिवळी दोरी बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असुन मृत्यूचे गुड वाढले असून ही आत्महत्या की खून? अशा वेगवेगळ्या तर्कवितर्कांना पंचकोशीत चर्चेला उधाण आले आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती आशी की, पुसद तालुक्यातील मांडवा येथील रहिवाशी असलेला सुरेश अनिल राठोड वय २२ वर्ष यांनी गावातीलच अल्पवयीन मुलीला घेऊन दि. ५ ऑगस्ट २०२४ रोजीच्या रात्री दरम्यान पळून गेला होता. परंतु आज दि. ७ ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलीचे आजोबा भागोराव तुकाराम साखरे सकाळी ११:०० वाजण्याच्या सुमारास शेतात कामा करीता गेला असता त्यांना शेतातील विहिरीत या प्रेमी युगलांचा मृतदेह दोघांच्याही कमरेला नायलॉनची पिवळी दोरी बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली त्यावेळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.सदर घटनेची माहिती पुसद ग्रामीण पोलिस स्टेशनला देण्यात आली त्यावेळी तात्काळ पुसद ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह विहिरीतून बाहेर काढून पंचनामा करण्यात आला. पोलिसाच्या प्रथमदर्शीय अंदाजानुसार या प्रेमीयुगुलांचा मृत्यू अंदाजे दोन दिवसांपूर्वी झाला असावा असा कयास व्यक्त करण्यात आला. सदर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे दाखल करण्यात आले असून सदर प्रेमीयुगल दोरीच्या सहाय्याने एकमेकांस घट्ट बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने या मृत्यूचे गुढ वाढले असून ही आत्महत्या की खून? अशा वेगवेगळ्या तर्कवितर्कांना पंचकोशीत चर्चेला उधाण आले आहे. सदर घटनेचा अधिक तपास पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close