क्राइम

महागांव पोलीस स्टेशनच्या हद्दीत अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील एकास अटक ; स्थागुशा यवतमाळ ची मोठी कारवाई!

यवतमाळ/ प्रतिनिधी: जिल्हात अवैध अग्नोशस्त्र बाळणा-यांचा शोध व कारवाई तसेच अवेध धंदयाचे समूळ उच्चाटन व्हावे याकरीता पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पांना आदेशीत केले होते त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिनस्थ पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावो कारवाई करणे बाबत सुचना दिल्या होत्या, दि.७फेबुरवारी २०२४रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना पोलीस स्टेशन महागांव हददीत मौजे खडका फाटा येथे इसम नामे शेख सुलतान शेख मुन्शी रा. बडसा ता. माहूर जि. नांदेड हा त्यांच्याकडे अग्नीशस्त्र (गावठी बनावटी कट्टा) बाळगुन असून दखलपात्र गुन्हा करण्याची शक्यता आहे अशी गोपनिय माहीती प्राप्त झाली होती. प्राप्त माहीती नुसार पथकाने तात्काळ घटनास्थळ गाठुन खडका फाटा येथील राजमाता जिजाऊ उडाणपुला खाली एक इसम हा संशयीतरित्या उभा असल्याचे दिसल्याने त्यास ताब्यात घेवून नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव शेख सुलतान शेख मुन्शी वय २२वर्षे, रा. वडसा ता. माहूर जि. नांदेड असे सांगितल्याने त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला देशी बनावटीची पिस्टल (कट्टा) मिळून आल्याने जप्त करुन ताब्यात घेतली. सदर देशी बनावटीची पिस्टल (कट्टा) कोणाकडून आणला याबाबत विचारपूस केली असता अमजद खान रा.अरुण ले-आउट, उमर फारुख शाळेजवळ वसंतनगर पुसद ता.पुसद यांच्याकडून विकत घेतले असल्याचे सांगितले. वरुन नमुद आरोपी शेख सुलतान शेख मुन्शी वय २२ वर्षे, रा. वडसा ता माहूर जि. नांदेड याचे कब्जातुन एक देशी बनावटीची पिस्टल (कटटा) जप्त करुन आरोपी विरुध्द पो.स्टे. महागांव येथे भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला असुन पुढील कार्यवाही कामी पो.स्टे. महागांव यांचे ताब्यात देण्यात आले आहे.सदरची कारवाई सदरची कार्यवाही ही डॉ.पवन बन्सोड, पोलीस अधीक्षक पवतमाळ,  पियुष जगताप, अपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. आधारसिंग सोनोनेसपोनि, गजानन गजभारे, पोउपनिरी/अमोल राठोड, चापोउपनिरी/रेवन जागृत, पोहवा तेजाब रणखांब, सुभाष जाधव, कुणाल मुंडोंकार, रमेश राठोड, सुनिल पंडागळे, मोहम्मद ताज, सर्व स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close