सुवर्णपदक प्राप्त साक्षी बुरकुलेचा शरद मैंद यांचे वतीने सत्कार !

पुसद : येथील सुकन्या कु साक्षी बंडू बुरकूले हिने रायपूर छत्तीसगड येथे झालेल्या पहिल्या भारत सरकार आयोजित ट्रायबल खेलो इंडिया स्पर्धेतल ८२ किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकावले आहे पुसद च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याने तीचा सत्कार शरद मैंद, अध्यक्ष पुसद अर्बन बँक तथा प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांनी पुसद अर्बन बँकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात केले.
साक्षीने जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय यश संपादून राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक प्राप्त केले. साक्षी ही बी.कॉम. सवना येथे शिकत असून तिला वडिलांचे छत्र नसून आई रोजमजुरी करून जीवन व्यतीत करते अश्या स्थितीत तिने प्रशिक्षक रोशन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश संपादन केले आहे. सोबतच यावेळी वेटलिफ्टिंग मध्येच बिहार मध्ये आयोजित शालेय राष्ट्रीय स्पर्धेत पूजा ठेपेकरने कास्य पदक मिळविले .नाशिक मनमाड येथे आयोजित राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत पियुष आढावेने रौप्य पदक मिळविले.
सुरज इंगोलेने राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत रौप्य पदक मिळविले.या खेळाडूंना व वेट लिफ्टिंग अकॅडमीचे प्रशिक्षक रोशन देशमुख या मार्गदर्शकाचाही यावेळी पुष्पगुच्छ,शाल, श्रीफळ देऊन सत्कार करन्यात आला.
यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, “अशा ग्रामीण व सुविधा नसलेल्या परिस्थितीतून येऊन राष्ट्रीय स्तरावर यश मिळवणे ही पुसदकरासाठी मोठी अभिमानाची बाब आहे.” हा सत्कार केवळ पुरस्कारासाठी नसून, संघर्षातून यश मिळवणाऱ्या प्रत्येक खेळाडूसाठी प्रेरणादायी ठरणारा क्षण आहे.असे नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण क्षीरसागर यांनी तर आभार नाना बेले यांनी मानले यावेळी के.जि. चव्हाण, गणेश दिंडे, बळवंत मनवर,ऍड. गोपाल मस्के, नाना बेले, कैलास जळगांवकर, नवाब भाई प्रवीण कदम,यश काळे, दत्ता शिंदे, जय दळवी, श्रीकांत वानखेडे, करण मोहिते,आवेश शेख, राहुल सोनटक्के,छत्रपती शेलकर, सुमेध बोडखे,ऍड जुनेद शेख, सागर पारवानी संदेश रणवीर व मंडळी उपस्थित होते.



