पुसद-माहुर मार्गावर भीषण अपघात; इंदिरानगर डम्पिंग ग्राउंड जवळील विचित्र अपघातात मालवाहू मेट्राडोरने दोन दुचाकीस्वारास चिरडले दोघांचा जागी मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी!

पुसद:माहुर मार्गावरील इंदिरानगर डम्पिंग ग्राउंड जवळ आज (दि.२५मे) सोमवार सकाळी८:३० ते ८:४५ वाजण्याच्या सुमारास विचित्र अपघात झाला असून या अपघातामध्ये पुसद कडे येणाऱ्या एका टाटा कंपनीच्या मालवाहू मेट्राडोरने मागील बाजूने दोन दुचाकी स्वारांस चिरडले असून या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जख्मी झाली आहे हा विचित्र भीषण अपघाताने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
या भीषण अपघातातील मृतांमध्ये गणेश विष्णू जाधव वय २९, वर्ष रा. काटखेडा ता. पुसद जि. यवतमाळ, तसेच अरविंद प्रल्हाद राठोड वय ३५ वर्ष, रा.कोठारी ता. महागाव जि.यवतमाळ, यांचा जागीच मृत्यू झाला. तर अनिता अरविंद राठोड वय ३५, रा. कोठारी ता. महागाव जि. यवतमाळ,ही महीला गंभीर जख्मी आहे.तिच्यावर शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे उपचार सुरू आहेत.
या अपघाताबाबत सूत्राने दिलेली माहिती अशी की, अपघाततील मृत्यूमुखी पडलेले तरुण आपापल्या दुचाकीने पुसद शहराकडे येत असताना इंदिरानगर येथील डम्पिंग ग्राउंड जवळ त्यांच्या मागून येणाऱ्या एका टाटा कंपनीच्या मालवाहू मेट्राडोर क्रमांक एमएच २१बीएच ३७६० या चारचाकी मालवाहू मॅटाडोरने हिरो स्प्लेंडर (क्र.७५७०) व हिरो पॅशन (क्र.८३६०) या दोन दुचाकीस्वरास विचित्र पद्धतीने चिरडले पहिले काटखेडा येथील दुचाकीस्वारास चिरडले आणि त्याचवेळी दुसऱ्या दुचाकीवर डबल सीट स्वार असलेल्या कोठारी येथील जोडप्याला भीषण जबरधडक दिली त्यावेळी दुचाकी वरील महिला दूर फेकल्या गेली तर हे दोन्ही दुचाकी स्वार या मालवाहू मॅटाडोर खाली चिरडले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला तर महिला गंभीर जखमी झाली अपघाताचा आवाज इतका मोठा असल्याने परिसरातील ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना अंबुलन्सद्वारे पुसद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले.
मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नगीना शेख मॅडम यांनी पोलिसांचा फौजफाटा घेऊन घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांत मालवाहू मॅटाडोर क्रमांक एमएच २१ बीएच३७६० व चालक भारत शंकर पवार (वय २८, रा. काटखेडा ता. पुसद) याच्याविरुद्ध शहर पोलीस स्टेशनला फिर्यादी विष्णू कसना जाधव (वय ५८ रा. काटखेडा, पुसद) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास उपनि नगीना शेख मॅडम करीत आहेत.या भीषण अपघातामुळे पुन्हा भरधाव वेगाने धावणाऱ्या मालवाहतूक वाहनाचा महामार्गावर वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.



