पुसद तालुक्यातील बांन्शी ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश केले संपादन!
विभागीय मूल्यांकन समितीद्वारे विभाग स्तरीय मूल्यांकन संपन्न!

पुसद :मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय मूल्यांकनात पुसद पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील बांन्शी ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे ग्रामपंचायतीने आता जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.
याबाबत प्राप्त माहिती नुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रामविकासाला चालना देण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान चालू केले आणि अनेक गावं खेडी आपल्या गावात हे अभियान राबविण्यासाठी सज्ज झाली पुसद तालुक्यातील बान्सी या गावाने या अभियानात सक्रिय सहभागी होऊन अनेक विकासात्मक कामे केलेली आहे यामध्ये प्रामुख्याने सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, जलसमृध गावं , गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण, नरेगा व इतर योजनांचे अभिसरण, लोकसहभाग व श्रमदान, नावीन्यपूर्ण उपक्रम अश्या आठही घटकांवर गावात चांगली कामे केली गावातील लोकांना आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून सर्व सेवा गावातच उपलब्ध करून दिल्या जातात ग्रामपंचायत चे सर्व प्रकारचे दाखले वेळेत दिली जातात लोकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी गावात चांगली व्यवस्था निर्माण केलेली आहे अनेक शासकीय इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेली आहे पारदर्शक कारभारासाठी सर्व नागरिकांच्य मोबाईल मध्ये पंचायत निर्णय, ग्रामसंवाद,मेरी पंचायत असे ॲप डाऊनलोड केलेले आहे व यांच्या माध्यमातून लोकांना सर्व माहिती या ॲप वर पाहता येते ग्रामपंचायत ची स्वतंत्र वेबसाईट तयार केलेली आहे व सर्व प्राथमिक माहिती यावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे गावांमध्ये मागेल त्याला सौरपंप या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी सौरपंप शेतात लावलेले आहे.
गावातील ग्रामपंचायत शाळा, अंगणवाडी, वाचनालय,हातपंप याठिकाणी हे सौरऊर्जेच वापर करण्यात येते, गावात अनेक ठिकाणी त्यामध्ये स्मशाभूमी, रस्त्याच्या दुतर्फा, शाळा,ग्रामपंचायत अश्या ठिकाणी वृक्षारोपण करून ठिबक सिंचनाचा वापर यासाठी केला जातो आरोग्याच्या दृष्टीने गावता अनेक आरोग्य शिबिरे आयोजित केलेली आहे ज्यामध्ये, ॲनिमिया तपासणी, डोळे तपासणी, लसीकरण,रक्तदान शिबिर असे अनेक शिबिरे गावात घेतली आहे गावातील सर्व पात्र लोकांचे आयुष्यमान भारत कार्ड काढलेले असून अनेक लोकांनी या कार्ड च्या माध्यमातून उपचार सुद्धा घेतलेले आहे .महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून अनेक पात्र शेतकऱ्यांनी सिंचन विहीर,गुरांचा गोठा , जलतारा, फळबाग,रेशीम उद्योग अश्या योजनेचा लाभ घेतलेला आहे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अनेक पात्र लाभार्थ्यांना घरकूल येजनेचा लाभ देण्यात आलेला आहे जातीचें दाखले, अधिवास प्रमाणपत्र, श्रावण बाळ योजना,संजय गांधी निराधार योजना अश्या योजनांचा लाभ सुध्दा पात्र लाभार्थ्यांना देण्यात आलेला आहे अश्या अनेक योजना गावात मोठ्या प्रमाणत राबविण्यात आलेल्या आहे ज्यामुळे लोकांना चांगला फायदा झाला.
अभियान कालावधी मध्ये आठवड्यातील एक दिवस गावासाठी हा श्रमदान करण्यासाठी उपक्रम चालू केला होता यामध्ये गावातील अनेक महिला,पुरुष मोठ्या प्रमानात युवक सहभागी होऊन गावात ठिकठिकाणी स्वच्छता केली,लोकवर्गणी व लोकसहभागातून स्मशानभुमी मध्ये बसण्यासाठी टीनपत्राचे शेड, बाकडे व महादेवाची मूर्ती सह ओटा तयार करण्यात आला व गावातील रस्त्यावर तसेच स्मशानभुमी व पांदन रस्त्यावर मुरून टाकून रस्त्याची दुरूस्ती करण्यात आली. 
नावीन्यपूर्ण उपक्रम यामध्ये गावातील १०० % कर भरणाऱ्या नागरिकांना मंडप डेकोरेशन च्या रकमेमध्ये ५०% रक्कम सूट देण्यात येते असे अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम गावात राबविले गेले या अभियानामध्ये अनेक कामे गावामध्ये केली गेली ज्यामुळे बान्सी हे गाव या अभियानात जिल्ह्यात प्रथम आले व विभागाची तपासणी झाली असून विभागाचा निकाल आणखी लागायचा आहे हे अभियान गावात यशस्वी करण्यासाठीं पंचायत समिती चे गटविकास अधिकारी अमोलकुमार अंदेलवाड व सहाय्यक गटविकास अधिकारी संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बान्सी गावाचे कुशल प्रशासक सरपंच गजानन टाले,ग्रामपंचायत अधिकारी प्रेमजित आडे, शाळेचे मुख्याध्यापक सच्चिदानंद बोपिनवार, पदवीधर शिक्षक श्री रुपेश दुधे सह सर्व शिक्षक, उपसरपंच सौ.रेखा निरंजन राठोड,सदस्य संतोष आगलावे,अभय ढोणे,माधव डोंगरे,सौ इंदुबाई तांबारे,सौ शोभाबाई आगलावे, सौ.सूनंदाबाई लथाड, सौ मंगलबाई शर्मा, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रमेश आगलावे जेष्ठ नागरिक सदाशिव चौधरी, बाळासाहेब देशमुख बंडू बनकर यांच्या सह गावातील सर्व महिला बचत गट,पुरुष,युवक यांनी अथक परिश्रम घेतले आहे.



