सामाजिक

पावसाची दडी!शेतकऱ्यांची चिंता वाढली यवतमाळ जिल्ह्यात कोरडा दुष्काळ घोषित करण्याची शेतकऱ्यांची मागणी!बैल पोळा सणांवरही दुष्काळाचे सावट गडद!

शेतकऱ्यांसमोर आभाळाएवढं दु:ख, पावसाअभावी हातातून पैसा मिळवून देणारं पीक करपली; जिल्ह्यात कोरडा दुष्काळ घोषित करुन हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या- शेतकरी नेते मनीष जाधव !

यवतमाळ/पुसद: पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात खरीप हंगामातील शेतकऱ्यांच्या शेतावरील पिके हातातून गेली आहेत गेल्या महिनाभरापासून व्यवस्थित पाऊस पडलेला नाही. पाऊस न पडल्याने शेत जमीन तापू लागली आहे. या हवामानाने शेतकऱ्यांवर मोठं संकट निर्माण झालं आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं आहे. पाऊस पडत नसल्याने पैसा मिळवून देणारं सोयाबीन पीक हातातून जाणाच्या मार्गावर आहेत तर अनेक शेतकऱ्यांची पिके करपली आहेत त्यामुळे पावसाची प्रतीक्षा करण्यापेक्षा दुसरा कोणताही उपाय शेतकऱ्यांच्या हाती नसल्याचे समोर येत आहे.दुसरीकडे शेतकऱ्यांचा सण तोंडावर आला आहे बैलपोळ्या निमित्त बैल सजावटीचे साहित्य तसेच अन्य वस्तूंची खरेदी करतात. मात्र, यंदा या खरेदीसाठी शेतकऱ्यांचा उत्साह कमी झाल्याचे बाजार पेठेत दिसून येत आहे. शेतकऱ्यांसाठी वर्षभरातील सणांमध्ये श्रावणी पोळा हा महत्त्वाचा सण मानला जातो.त्यामुळे या कोरड्या दुष्काळा बाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात तब्बल ९५ टक्के खरीप पेरण्या पूर्ण झाल्या असून, उपलब्ध पाण्यावर पिके जगविण्याचा शेतकऱ्यांपुढे मोठे संकट आव आणून ठाकले आहे.या पावसा अभावी हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून नेल्याने शेतकऱ्याच्या स्वप्नाची राख रांगोळी झाल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.त्यामुळे राज्य सरकारने तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना एक लाख रुपये आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी नेते मनीष जाधव यांच्या वतीने करण्यात आली आहे.

आर्त हाक -मुख्यमंत्री साहेब पाऊसा अभावी आमच्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पिकं करपली नाही तर ,आमच्या स्वप्नांची देखील राख रांगोळी झाली असून, आम्ही घेतलेलं कर्ज फेडावे कसं , जगावं कसं आमच्यावर आत्महत्येची वेळ आली आहे- पुसद तालुक्यातील काटखेडा या गावचे सोयाबीन उत्पादक शेतकरी पांडुरंग रायसिंग आडे यांनी शासनाकडे साद , घालून आपल्या व्यथा , वेदनांना वाट करून दिली , कोरड्या दुष्काळाच्या सावटाखाली सापडलेल्या शेतकऱ्यांना मानसिक धीर देण्यासाठी शेतकरी नेते मनीष जाधव यांनी पुसद तालुक्यातील काटखेडा या गावाला भेट दिली जिल्ह्यात मागील २८ दिवसापासून पाऊस पावसा अभावी कापूस, सोयाबीन हि उभी पीके पूर्णतः करपून गेली या शेत शिवारातील माणसं जगण्याची उमेद गमावून बसली आहे.

  या कोरड्या दुष्काळात आर्थिक दृष्ट्या उध्वस्त झालेला आहे गतवर्षी अतिवृष्टी,ओला दुष्काळ व चालू खरीप हंगामात कोरडा दुष्काळ एलनिनोच्या प्रभावाखाली दुष्काळाच्या दृष्ट चक्रात आज शेतकरी मरणाच्या दारावर उभा आहे केंद्र शासनाच्या एनडीआरएफ ,(NDRF ) व राज्याच्या (SDRF) कडून हा कोरडा दुष्काळ राष्ट्रीय आपत्ती घोषित करून तात्काळ हेक्टरीे एक लाख रुपये पंचनामा न ,करता सरसकट घोषित करावं अशी विधायक मागणी पुसद चे तहसीलदार मा. रेखा विणा , यांच्याशी शेतशिवारातून दूरध्वनीवरून ही मागणी केली यावर तहसीलदारांनी यासंदर्भात आम्ही तात्काळ जिल्हा अधिकारी साहेबांना नुकसान झालेल्या पिक परिस्थिती बाबत कळवू असे आश्वासन दिले , एकीकडे आज कृषी विभागाचे लोक त्यांच्या न्यायिक मागण्यासाठी आंदोलनात आहे.

शेतकऱ्यांकडे पाहण्यासाठी ना , नेत्यांना वेळ ना , प्रशासनाला अखेर शेतकऱ्यांनी कोणाकडे जाऊन न्याय मागायचा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेला आहे शेत पातळीवरील प्रत्यक्ष पिक नुकसानीचा मोका पंचनामा करून पिक विमा जे नैसर्गिक आपत्तीत संरक्षणाची हमी देते या योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी देखील मागणी यावेळेस शेतकरी नेते मनीष जाधव यांनी केली शासनाने अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांना सावरून घेऊन त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची नैतिक जबाबदारी घ्यावी , यवतमाळ जिल्ह्यात दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत ही अत्यंत गंभीर बाब असून या पुढच्या कालखंडात या आत्महत्येचा आकडा वाढू शकतो त्यामुळे शासनाने विषयाचे संवेदनशीलता लक्षात घेऊन दुष्काळी उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी विधायक मागणी केली यावेळी पांडुरंग आडे, विकास राठोड, संतोष जाधव, चांगदेव आडे ,किसन रेवा राठोड, संतोष आडे, श्याम साखरे विश्वदीप झोडगे, सुदर्शन झोडगे ,संतोष जाधव, अंबादास जाधव, विजय जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते शासनाने मागणी मान्य न केल्यास रस्त्यावर उतरून न्याय देऊ असं गर्भित इशारा देखील यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close