क्राइम

वसंत नगर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेला आरोपी अखेर जेरबंद!

फरार आरोपी मिळाल्याने पोलिसांनी घेतला सुटकेचा मोकळा श्वास!

पुसद : वसंत नगर पोलिस ठाण्यात कलम १०९ ३(५) भारतीय न्याय संहिता सह कलम ४/२५ आर्म ॲक्ट चा गंभीर गुन्ह्यांमध्ये असलेल्या आरोपीला दि ४ सप्टेंबर रोजी जिल्हा सत्र न्यायालयातून पोलीस रिमांड घेऊन त्याची उपजिल्हा शासकीय रुग्णालयात शारीरिक वैद्यकीय तपासणी करण्यासाठी घेऊन गेले असता रुग्णालयातील जनरल वार्ड मधुन पोलिसांच्या तावडीतून पळून गेलेल्या  आरोपीला पोलिसांनी अथक परिश्रमानंतर त्याच्या राहत्या घरी मधुकर नगर येथून अखेर अटक केली आहे.हजरत बिलाल शेख मुसा वय २० वर्षे रा. मधुकर नगर ता. पुसद जि. यवतमाळ असे अटक आरोपीचे नाव आहे.पोलीस सूत्रांनी ‘झेप न्यूज’ला दिलेल्या माहितीनुसार वसंत नगर पोलीस ठाण्यात दि३सप्टेंबर २०२६ रोजी एका इसमावर चाकूने जीवघेणा हल्ल्या केल्याप्रकरणी कलम १०९ ३(५) भारतीय न्याय संहिता सह कलम ४/२५ आर्म ॲक्ट च्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अटक असलेल्या आरोपीला दि ४ सप्टेंबर रोजी जिल्हा सत्र न्यायालयातून पोलीस रिमांड घेऊन उपजिल्हा शासकीय रुग्णालय पुसद येथे शारीरिक वैद्यकीय तपासणी करण्यासाठी घेऊन गेले असता रुग्णालयातील जनरल वार्ड मधुन पोलीस कर्मचारी रुग्णालयातील कामात व्यस्त असताना त्याचा फायदा घेऊन पोलिस कर्मचाऱ्यांच्या तावडीतून रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामा कडुन पळून गेला ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली असता पोलीस प्रशासनामध्ये खळबळ माजली त्यावेळी पोलिसांनी या आरोपी विरुद्ध पुसद शहर पोलीस स्टेशन येथे ८९७/२०२६ कलम २६२ भारतीय न्याय संहीत अन्वये गुन्हा नोंद करून तपास सुरू केला.पोलिसांनी नमुद आरोपीला शोधण्यासाठी वेगवेगळे पथके बनवुन त्याव्दारे शोध पथक रवाना केले तसेच पोलीस स्टेशन वसंतनगर पुसद, पुसद शहर, पुसद ग्रामीन, आर.सी.पी. पथक व पुसद विभागाचे स्था. गु.शा. कर्मचारी यांनी रात्रंदिवस एक करून आरोपीचा पोलीस स्टेशन परीसरात, खंडाळा, सेलु, पोखरी, श्रीरामपुर, उमरखेड, वाशिम माहुर, नांदेड, या ठिकानी तपास पार्टी कडुन शोध मोहीम घेण्यात आली. ठाणेदार दिनेश झांबरे यांनी स्वतः त्यांचे पथक ला सोबत घेवुन गोपनिय यंत्रना सतर्क करून आरोपी हा त्याचे मधुकर नगर येथील राहते घरी आल्याची माहीती होताच आरोपी यास मोठ्या शिताफीने आज दि.६ सप्टेंबर२०२६ रोजी सकाळी ०३/०० वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले व पुढील कार्यवाही करीता पोलीस ठाण्यात आणले.सदर ची कार्यवाही जिल्हा पोलीस अधिक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधिक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी अमरसिंग मोहीते यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे, पोनि चावरे, सपोनि बांडे व स्था.गु.शा टीम, सपोनि सुगत पुंडगे, पोउपनि आनंद चंदेवाड, पोउपनि मकसुद शेख, पोना सुरेश राठोड, अरविंद चव्हाण, सुनिल मोरे, कुणाल मुंडोकार व वसंतनगर संपुर्ण स्टॉप, पुसद शहर, पुसद ग्रामीण, आर.सी.पी. पथक व होमगार्ड अंमलदार यांनी पार पाडली असुन गुन्ह्यांचा पुढील तपास पोउपनि शिवप्रसाद आवळकर हे करीत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close