ईतर

महावितरण’ला जोरदार झटका… पुसद शहरात स्मार्ट मीटर विरोधात शिवसेनेचा शिंदे गट आक्रमक!

स्मार्ट मीटरवरून सुरू असलेल्या वादात आता सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेने शिंदे गटाचीही उडी!

पुसद ;राज्य सरकारच्या स्मार्ट मीटर योजनेविरोधातील असंतोष आता महायुतीतील घटक पक्षांपर्यंत पोहोचला असून, पुसद शहरातील परिसरात शिवसेनेच्या शिंदे गटाने तर स्मार्ट मीटर विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याची कार्यवाही रोखावी, वाढीव वीज बिलांच्या तक्रारींची तातडीने दखल घ्यावी तसेच बसविलेले स्मार्ट मीटर हटवून नियमित सुस्थितीत असलेले विद्युत मीटर बसवुन विज ग्राहकांना दिलासा द्यावा सोलर मिटर व इतर विदयुत मिटर रिडींग दर महिन्यात घ्यावे अवरेज बिल देऊ नये व पुन्हा ऍव्हरेज बिल कमी करण्या करिता ग्राहकांना विनाकारण त्रास देऊ नये.आणि नागरिकांची फसवणूक थांबवावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरण प्रशासनाला दिला आहे.

महावितरणतर्फे बसविण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटरच्या सक्तीला आणि अंमलबजावणीला राज्य सरकारच्या महायुतीतील घटकपक्षातील शिवसेना (शिंदे गट) तीव्र विरोध दर्शवला आहे. पुसद विभागातील विद्युत वितरण कंपनीचे कार्यक्षेत्रामध्ये येत असलेल्या ३३ के.व्ही. उपकेंद्रांवर क्षमतेपेक्षा जास्त विद्युतभार पडत असल्यामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असतो.विद्युत पुरवठा खंडित होऊ नये याकरिता योग्य ती उपाययोजना करीत विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या दृष्टीने कार्य करावे.३३ के.व्ही. उपकेंद्रामधून रोहित्रा पर्यंत विद्युत पोहोचण्या करिता टाकण्यात आलेली विद्युत खांबे त्यांना कोणत्याच प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून या विद्युत लाईन सभोवतालची वृक्षे साफ करून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा तसेच विद्युतरोहीत्रांची योग्य ती देखभाल करीत विद्युत रोहित्रे सुस्थितीत राहण्याबाबतही योग्य ती खबरदारी घ्यावी.आणि शेतकऱ्यांना शेती करिता लागणारी विद्युत योग्य आणि सुस्थितीत मिळण्याच्या दृष्टीने सकाळी ८:०० ते सायंकाळी ८:०० वाजेपर्यंत अखंडित व सुरळीत विद्युत पुरवठा देण्यात यावा. जेणेकरून शेतकऱ्यांना आपल्या शेतातील विद्युत मोटर पंप चालू ठेवून आपल्या उत्पादनात वाढ करण्यास मदत होईल आणि शेतकरी समृध्द होईल तर शेतकरी समृध्द झाला तर देशही समृद्ध होईल तसेच पुसद विद्युत विभागाअंतर्गत कित्येक विद्युत ग्राहकांनी सौरऊर्जेचा लाभ घेण्याच्या दृष्टीने आपल्या घरावर तसेच शेतीमध्ये सौरऊर्जेचा वापर सुरू केलेला आहे. अशा ग्राहकांना सुद्धा अवाढव्य विद्युत देयके दिल्या जात आहेत ती देयके संबंधित कालावधीतच त्यांना देण्यात यावी. आवरेज बिल अवाजवी, अवाढव्य रकमेची विद्युत देयके देऊन विद्युत ग्राहकांना मानसिक त्रास देऊ नये. स्मार्ट मीटर बसविण्यावरून वीज ग्राहकांमध्ये सुरू असलेल्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर सुरळीत सुरू असलेले मीटर बदलण्याचा प्रकार तातडीने थांबवावा आणि ग्राहकांची लेखी संमती घेतल्याशिवाय मीटर बदलू नयेत, तसेच सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यामध्ये हिंदू धर्माचे सण, उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे केल्या जाणार आहेत. या उत्सवामध्ये विद्युत पुरवठा अखंडित व सुरळीत राहण्याच्या दृष्टीने महावितरणने जातीने लक्ष देऊन गणेशोत्सव, महालक्ष्मी उत्सव, नवरात्रोत्सव, दीपावली आदी सारख्या सण उत्सवामध्ये विद्युत पुरवठा खंडित होऊ नये.याचीही दक्षता घ्यावी.अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने केली आहे. यासंदर्भात संघटनेतर्फे वितरण कंपनीला निवेदन देण्यात आले.विद्युत ग्राहकांना सुरळीत व अखंडित विद्युत पुरवठा सुरू राहण्याच्या दृष्टीने योग्य ती दखल घेतली गेली नाही तर नाईलाजास्तव आम्हाला शिवसेनेच्या स्टाईलने जन आंदोलन करावे लागेल असा इशारा महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे.

या निवेदनावर पुसद स्थानिक शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख दीपक उकळकर,विधानसभा समन्वयक संजय सिंह बयास, शहर प्रमुख संतोष दरणे, महिला उपजिल्हाप्रमुख सुनिता भोयर, महिला विधानसभा संघटक नालीनी व्यवहारे, शहर संघटक अनिल चव्हाण,शहर समन्वयक अनिल तोंडारे,अल्पसंख्यांक आघाडी राजीक देशमुख,उपशहर प्रमुख अरुण जाधव,उपशहर प्रमुख बाबुराव पाईकराव, उपशहर प्रमुख भारत मोदीराज, प्रभाग प्रमुख रामराव सोनुने,प्रभाग क्रमांक कुणाल मडके, प्रभाग प्रमुख मिलिंद बांडे, प्रभाग प्रमुख सिद्धार्थ धुळे,प्रभाग प्रमुख तुषार व्यवहारे, प्रभाग प्रमुख सुभाष खुडे, शिवसेना सदस्य विजय ढोकणे,प्रशांत मंदाडे, टि एन दानातकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close