पूसद न.प.मधील सहाय्यक रचनाकार कार्तिक पुजारी यांची तात्काळ हकालपट्टी करा; सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे मुख्याधिकारी यांना निवेदनाव्दारे मागणी.!

पुसद :नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ. किरण सुकलवाड यांना रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया(आठवले)पुसद, भिमशक्ती सामाजिक संघटना, वंचित बहुजन आघाडी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष,शिवसेना (उबाठा)गट, लहुजी शक्ती सेना, बिरसा मुंडा ब्रिगेड या राजकीय पक्षाचे व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांच्यावतीने निवेदन देऊन नगरपरिषद मधील सहाय्यक रचनाकार कार्तिक पुजारी यांच्यावर कारवाई करून हकालपट्टी करण्या यावी अशा विषयाचे निवेदन देण्यात आले.सदर निवेदनात म्हटले आहे की पुसद नगरपरिषद मधील बांधकाम विभाग तथा नगर रचना विभागातील कार्यरत असलेले सहाय्यक रचनाकार कार्तिक पुजारी हे नागरिकांच्या तक्रारीवर कोणतीही दखल न घेता त्यांना अरेरावीची भाषा करत तुच्छ वागणूक देतात व शहरात होत असलेले विनापरवाना अवैध बांधकाम करणाऱ्या तसेच ले-आऊट धारकांना सहकार्य करतात व नागरिकांनी केलेल्या तक्रारीवर कोणतीही दखल न घेता त्यांना अरेरावीची भाषा करीत असतात नगर परिषद मधील अनेक प्रभागातील होत असलेल्या विनापरवाना अवैध बांधकामे सुरू असून या बांधकामाविरुद्ध नागरिकांच्या अनेक तक्रारी नगरपरिषद कार्यालयास प्राप्त झालेल्या आहेत, परंतु त्या तक्रारीची कोणतीही चौकशी न करता उलट बांधकाम धारकांना सहकार्य करून अतिरिक्त केलेल्या बांधकामाची कोणतीही परवानगी नसतांना स्वतःच्या आर्थिक लाभापोटी त्यांना बांधकाम करण्यास मूकसंमती देऊन सहकार्य करत आहे. त्यामुळे पुसद शहरात अवैध बांधकामांना ऊत आलेला आहे.तसेच नगरपरिषद हद्दीत येत असलेल्या पुसद खंड-१ मधील अनेक लेआउट धारकांनी निवासी प्रयोजनासाठी ले-आउट तयार केले आहे, परंतु या ले-आउट मध्ये नगरपरिषद नगर रचना अधिनियम नुसार दिलेल्या नियम व अटी तसेच आदेशाचे कोणतेही पालन न करता नागरिकांना लोक सुविधा न पुरविता प्लॉट धारकाची फसवणूक करीत आहेत याबद्दल ही नगरपरिषद कार्यालयास अनेक तक्रारी प्राप्त झाले आहे परंतु त्यांही तक्रारीची चौकशी तथा कोणत्याही प्रकारे दखल न घेता ले-आउट धारकांना पाठीशी घालत आहेत. नागरीकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने कोणतेही समाधान न करता त्यांना उडवा उडवी चे उत्तर देऊन अरेरावीची भाषा करत शासन अशा कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाज व नागरिकांचे कामकाज करण्यासाठी मुबलक पगार देतो मात्र हे कर्मचारी नागरिकांना उद्धट वागणूक देऊन अवैध बांधकाम व ले-आऊट धारकांना मदत करत असल्यामुळे अशा भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांच्या धोरणामुळे लोकशाही कुमकुवत होत चालली आहे त्यामुळे कार्तिक पुजारी यांच्यावर नगरपरिषद अधिनियम अंतर्गत तात्काळ कार्यवाही करून पुसद नगर परिषद मधून त्यांची हकालपट्टी करण्यात यावी अन्यथा सर्वपक्षीय यांच्यावतीने आपल्या नगरपरिषद कार्यालयासमोर आंदोलन तथा उपोषण करू याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील असा इशारा मुख्याधिकारी किरण सुकलवाड यांना निवेदनातून देण्यात आली आहे, या निवेदनावर.. लक्ष्मण कांबळे, संतोष अंभोरे, दर्शन जोगदंडे, विजय बाबर,अरुण राऊत, जयानंद उबाळे, ज्ञानदीप कांबळे, पांडुरंग व्यवहारे, सय्यद अब्बास, प्रकाश खिल्लारे,राहुल पडघणे, डॉ शंकर दळवे,मनोज चंदन, इत्यादी राजकीय पक्षाचे पदाधिकारी तथा सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.



