सामाजिक

हरविलेले मोबाईल शोधून मूळमालकांना परत; पुसद ग्रामीण पोलीसांचाअत्यंत स्तुत्य उपक्रम!

पुसद: एकदा मोबाईल हरविला किंवा चोरीस अथवा गहाळ झाला तर तो परत मिळण्याची आशाच नसते. मात्र पुसद ग्रामीण ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांनी तांत्रिकरित्य तपास करुन आणि आयएमईआय क्रमांकाला ट्रेसिंग करून असे मोबाईल शोधण्यात यश आले आहे.व ते मोबाईल पोलीसांनी रक्षाबंधनाच्या पवित्र सणाच्या दिवशी एक दोन नव्हे तब्बल २० मोबाईल किंमत अंदाजे २लाख५०हजार रुपये किंमतीचे मोबाईल मूळमालकास परत केले. हरविलेला आपला मोबाईल परत मिळत असल्याचे पाहून प्रत्येकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.नागरिकांनी आनंद व्यक्त करत पोलिसांचे आभार ही व्यक्त केले आहे.

आजच्या काळात मोबाईल हरविणे किंवा चोरीस जाणे ही दैनंदिन बाब झाली आहे. अनेकांचे महागडे मोबाईल चोरीस जातात किंवा कुठेतरी हरविले जातात. परंतु एकदा हरविलेला मोबाईल परत मिळत नसल्याने अनेक जण तक्रारही करीत नाहीत मात्र हरविलेला मोबाईलही सापडू शकतो, हे पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांनी सिद्ध केले आहे. दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचे औचित्य साधुन पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण यांच्या वतीने हरविलेले मोबाईल फोन तांत्रिक तपासाच्या माध्यमातून शोधून त्यांच्या मुळमालकांना परत करण्याचा कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात आला.नागरिकांचे हरविलेले अथवा गहाळ झालेले मोबाईल फोन परत मिळवून देण्यासाठी पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी सातत्याने प्रयत्न करुन मोबाईलचे तांत्रिक माहिती व उपलब्ध डिजीटल साधनाच्या आधारे तपास केला. या तपासात संपुर्ण जिल्ह्यातुन तसेच परराज्यातुन एकुण २० मोबाईल फोन किंमत अंदाजे २,५०,०००/- रुपयाचे शोधुन काढण्यात ग्रामीण पोलीसांना यश आले.रक्षाबंधनाच्या निमित्याने सदर २० मोबाईल फोन त्यांच्या मुळमालकाच्या स्वाधीन करण्यात आले. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलीस विभागाचे आभार मानत समाधान व्यक्त केले. तसेच यापूर्वी सुध्दा पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण येथुन १५ मोबाईल फोनचा शोध घेवुन मुळमालकास परत करण्यात आले होते.पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांना अवाहन करण्यात येते की, मोबाईल फोन हरविल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून मोबाईलचे आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करुन द्यावी. मोबाईल मध्ये असलेली वैयक्तीक व आर्थिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी. सदरचा उपक्रम मा. कुमार चिंता जिल्हा पोलीस अधिक्षक, यवतमाळ, मा.अशोक थोरात अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ, मा. अमर मोहिते उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार आशिष चौधरी पो. स्टे पुसद ग्रामीण तसेच पोलीस अंमलदार रवि गावंडे, हनुमान चव्हाण, इम्रान खान, बालाजी मारकड, अक्षय मोटे, व पो. स्टे चे बीट अंमलदार यांनी सदरची कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close