कवी मुकुंद पांडे यांच्या ‘प्रतिबिंब भावनांचे ‘ या काव्यसंग्रहाचे १७ नोव्हेंबरला हिवरा संगम येथे प्रकाशन!

महागाव/प्रतिनिधी (संदीप कदम)-महागाव तालुक्यातील एच.ई.एस. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिस्तप्रिय सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा आदर्श शिक्षक परिसरातील सुप्रसिद्ध कवी मुकुंद सुभाष पांडे यांच्या ‘प्रतिबिंब भावनाचे’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन शुक्रवार दि.१७ नोव्हेंबर २०२३ रोजी महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथील एकवीरा देवी संस्थानच्या सभागृहात होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध विदर्भ कवी नीलकृष्ण देशपांडे तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव पाटील कदम, प्रमुख पाहुणे गजाननभाऊ वाघमारे संपादक लोकचिंतन साप्ताहिक, डॉ. धोंडेराव बोरुळकर, शरद पाटील उपसरपंच
ग्रामपंचायत कार्यालय हिवरा, राजूभाऊ धोतरकर ग्रामपंचायत सदस्य हिवरा, मोरेश्वर पांडे हिवरा शिक्षण संस्था अध्यक्ष, बालाजी घाडगे मुख्याध्यापक, भगवानराव फाळके अध्यक्ष ग्रामीण पत्रकार संघ, प्रमोद रायपूरकर पुसद,ज्येष्ठ पत्रकार विजयराव बोंपीलवार, यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी कवी मुकुंद पांडे यांचा मित्रपरिवार उपस्थित राहणार आहेत महागाव तालुक्यातील हिवरा संगम सारख्या ग्रामीण भागात वास्तव्य असणाऱ्या मुकुंद पांडे यांनी हजारो कवितांचे लिखाण केले आहे सदर कार्यक्रमासाठी एच. ई .एस.हायस्कूल मधील सन १९९८ बॅच माजी विद्यार्थी अथक परिश्रम घेत आहेत.



