ईतर

अमडापूर येथे योगा क्लासच्या वतीने भव्य व्यसनमुक्ती रॅलीचे आयोजन! अनेक नागरिकांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ!

महागाव/प्रतिनिधी (संदीप कदम):-उमरखेड तालुक्यातील व महागाव तालुक्याच्या जास्त संबंधित असलेल्या अतिदुर्गम भागातील अमडापूर या गावांमध्ये योगा क्लास यांच्यावतीने भव्य व्यसनमुक्ती रॅलीचे आयोजन आज २ जुलै २०२३ ला करण्यात आले होते.

या कार्यक्रमांमध्ये संपूर्ण गाव व्यसनमुक्ती करण्याचा निर्धार गावातील शालेय विद्यार्थ्यांनी व गावकऱ्यांनी व्यक्त केला ज्या विद्यार्थ्यांचे पालक व्यसन करतात अशा पालकांना त्यांच्या पाल्यांनी स्वतःच्या डोक्यावर हात ठेवून मी यांच्यानंतर व्यसन करणार नाही अशी शपथ घेतली व व्यसन सोडण्याचा संकल्प केला यावेळी अमोल झांबरे,ज्ञानेश्वर भिसे,रवी पांडे,यांच्या अथक प्रयत्नाने हा कार्यक्रम यशस्वी पार पडला ग्रामीण भागातील असलेली व्यसनधीनता ही ग्रामीण भागाला अधोगतीकडे नेत असल्याचे मत हरिभक्त पारायण गजानन दुमारे महाराज यांनी व्यक्त केले.

संपूर्ण गावाने एकजुटीने व्यसनाधीनतेला आळा घालण्याचा प्रयत्न केल्यास आपण अमडापूर हे गाव व्यसनमुक्त करू शकतो असे अनेक मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून गावकऱ्यांसमोर मत व्यक्त केली या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती अमोल दुमारे पाटील,हरिभक्त पारायण कांचन ताई शेळके,प्रवीण पावडे, कैलास झांबरे, दुबे मामा, शैलेश त्रिवेदी तांत्रिक सहाय्यक पंचायत समिती उमरखेड,शंकर झांबरे,सुखदेव भिसे, अर्जुन झांबरे,गजानन पवार, सौ.अरूना गजानन नारेवाड सरपंच अमडापुर,वैभव हेडे उपसरपंच,उमेश पांडे सर, विनोद कांबळे सर ,विजय बोलके, सैनिक पंडागळे ,रणमले पोलीस पाटील सिरमाळ ,कीरन दुमारे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमडापूर,गजानन दुमारे तंटामुक्ती अध्यक्ष अमडापूर , तसेच नारळी ,जेवली , सोनदाबी ,मोरचंडी ,मुरली, येथील ग्राम रोजगार सेवक यांची सुद्धा उपस्थिती होती या व्यसनमुक्ती रॅलीच्या नंतर आरोग्य शिबिराचे सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये डॉक्टर सचिन गिरी धन्वंतरी क्लिनिक फुलसावंगी ,डॉक्टर शमीन खान ,डॉक्टर विलास माहुरे यांनी मोफत तपासणी करून या कार्यक्रमांमध्ये आपली सेवा दिली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close