चोरीची दुचाकी विकायला आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला; पुसद शहर डी.बी. पथकाची कारवाई!

पुसद:दुचाकी चोरटा चोरीची दुचाकी हिरो कंपनीची फॅशन प्रो नंबर प्लेट बदलून विक्री करण्यासाठी ग्राहक शोधत असल्याची ‘टीप’ मिळाली त्यावेळी शहर पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने सापळा रचून चोरट्याच्या मुसक्या आवळल्या असून, आरोपीला जेरबंद करून त्याच्याकडून चोरुन नेलेली दुचाकी हस्तगत केली आहे. नामे विजय विठ्ठल राठोड वय ३० वर्ष रा. तुळशीनगर ता. महागाव जि. यवतमाळ असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत ‘झेप न्यूज’ ला पोलीस सूत्राने दिलेली माहिती अशी की,पुसद शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील हॉटेल अनुपप्रभा समोर गायमुख नगर येथील रहिवाशी असलेले फिर्यादी नामे अतुल विश्वनाथ वानखडे यांनी दि.३ मे २०२६ रोजी रात्री ९:१५ वाजण्याच्या सुमारास त्यांची पॅशन प्रो कंपनीची दुचाकी उभी करून मंडपाचे काम करीत असताना त्यांची दुचाकी ( मोटर सायकल) कोणीतरी अज्ञात इसमाने चोरुण नेली होती अशी फिर्याद पोलीस स्टेशन पुसद शहर येथे दाखल केली होती त्यावरून अपराध अप.क्र. ३३४/२०२६ कलम ३०३ (२) भा.न्या.सं. प्रमाणे गुन्हा नोंद करुण तपासावर असताना पोलीस स्टेशनचे पुसद शहरचे ठाणेदार सेवांनद वानखेडे यांनी पुसद शहरातील वाढलेल्या चोरीचे गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखुन मोटर सायकल चोरट्यांचा शोध घेण्याच्या कामी डी.बी. पथकाला योग्य त्या सुचना देऊन गुन्हा उघडकीस आणन्याचे आदेशीत केले. त्यावरुण सातत्याने पोलीस कौशल्याचा वापर करुण आरोपीचा शोध घेत असताना दि. ११मे२०२६ रोजी सायंकाळी ७/३० वाजता गोपनिय बातमीदार कडुन माहीती मीळाली की, नामे विजय विठ्ठल राठोड वय ३० वर्ष रा. तुळशीनगर ता. महागाव याने पुसद शहरातुन पँशन प्रो कंपनीची मोटर चोरुण आनुन तीची नंबर प्लेट काढुन टाकुण गाडी विक्री करीता गि-हाईक शोधत आहे असे माहीती मिळाली वरुण आम्ही आरोपी निष्पन्न करुन अतिशय कौशल्यपूर्वक सापळा रचुन आरोपी नामे विजय विठ्ठल राठोड वय ३० वर्ष रा. तुळशीनगर ता. महागाव जि. यवतमाळ यांस ताब्यात घेऊन सखोल विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली देऊन अनुप्रभा हॉटेल समोरुन चोरुन नेलेली पॅशन प्रो कंपनीची मो.सा.क्र. एम- २९ एएच-८३०७ किमंत ५००००/- रुपयेची आरोपी कडुन जप्त करण्यात आली असून अहो तिला जर बंद केले आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक, कुमार चिंता, अप्पर पोलीस अधिक्षक, थोरात, उपविभागीय, पोलीस अधिकारीपुसदश्री, हर्षवर्धन बि.जे. साहेब यांचे मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांचे सुचने प्रमाणे स.पो.नि. प्रेमकुमार केदार, पो. हवा. मनोज कदम, पो.ना. निरंजन आडे,पो,काँ, शुध्दोधन भगत, पो.ना. दिनेश सोळके, सचिन राउत यांनी केली आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथक पुसद शहर करीत आहे.



