ईतर

पुसद येथे सातव्या सामूहिक ग्रामगीता पारायणाची सांगता गुरुदेव सेवा मंडळाचा उपक्रम

पुसद : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित ग्रंथराज ‘ग्रामगीते’चा घरोघरी प्रचार व प्रसार व्हावा, या उदात्त हेतूने ५१ सामूहिक ग्रामगीता पारायणाचा संकल्प श्री गुरुदेव सेवा मंडळ, तालुका शाखा पुसद व स्वाध्याय माऊली भवन, अमरनगर यांच्या संयुक्त विद्यमाने समन्वयाचार्य, हभप विठ्ठल महाराज भोयर यांच्या विशेष प्रयत्नातून दर महिन्याला राबविण्यात येत आहे. एकूण ५१ पैकी सातव्या सामूहिक ग्रामगीता पारायणाची सांगता रविवारी (दि ११) करण्यात आली.

     येथील बंजारा कॉलनीतील हरिओम मंदिर सभागृहात आयोजित या ग्रामगीता पारायण सप्ताहात दररोज सकाळी १२:३० ते ३ या वेळेत हभप, समन्वयाचार्य विठ्ठल महाराज भोयर, गुरुदेव सेवा मंडळाचे तालुकाध्यक्ष प्रा. प्रकाश लामणे, उपाध्यक्ष प्रा. नंदकुमार खैरे, प्रचार प्रमुख राजेंद्र काळबांडे, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर सुरडकर, भजन प्रमुख माधव जाधव, ज्ञानेश्वर इंगोले, रमेश सरागे, किसन गरडे, निळकंठ घाटगे, शिवशंकर नागरे, जयसिंग राठोड, यशवंत देशमुख, शंकर मंदाडे, रमाकांत मामीडवार, महिला प्रतिनिधी छाया लामणे, कुसुम इंगोले, शांताबाई राठोड, उषा पांगारकर, हेमा तरटे, अनिता राठोड, ताई बोरकर, कांताबाई गरडे आदींनी सक्रीय सहभाग नोंदविला.

    समारोपीय कार्यक्रमात मंडळाचे अध्यक्ष प्रा प्रकाश लामणे, उपाध्यक्ष प्रा नंदकुमार खैरे, राजेंद्र काळबांडे, रमाकांत मामीडवार, ज्ञानेश्वर इंगोले, माधव जाधव, शिवशंकर नागरे आदींनी समयोचित विचार मांडून गुरुदेव सेवा मंडळाच्या सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थना व सामुहिक ग्रामगीता पारायण उपक्रमांत सक्रीय सहभागी होण्याचे आवाहन केले.याप्रसंगी आठवे सामूहिक ग्रामगीता पारायण नोव्हेंबरमध्ये होणार असल्याची माहिती विठ्ठल महाराज भोयर यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close