सर्वत्र भाजपची घोडदौड सुरू मात्र पुसद जिल्ह्यात अंतर्गत कलह गटबाजीमुळे भाजपची पिछेहाट…

पुसद : एकीकडे देश पातळीवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची मोठ्या जोमाने घौडदौड सुरू आहे देशावर अधिराज्य गाजवणाऱ्या भाजप पक्षाची गेल्या काही दिवसापासून पुसद शहरात मात्र पिछेहाट झाली आहे.तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष ‘मिशन २०२९’च्या तयारीत तयारीला लागला आहे . पुसद शहरात स्थानिक पातळीवरील भाजपमधील अंतर्गत कलह गटबाजीमुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये व पदाधिकाऱ्यांमध्ये संघर्ष या विरोधाभासी गोष्टींमुळे भाजपाची पिछेहाट सुरू आसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.तर पक्षासाठी एकनिष्ठेने काम करणारे पदाधिकारी अंतर्गत कलाहमुळे व पक्षातील स्थानिक नेतृत्वाच्या खच्चीकरणाने पक्षसंघटना दुबळी होत चालली असून त्याचा फटका पक्षाला बसत आहे.
पुसद जिल्ह्यातील पक्ष संघटन मात्र अंतर्गत संघर्षाच्या भोवर्यात अडकली असल्याचे स्पष्ट झाले आहे.२०१९ मध्ये नगर परिषदेत पक्षाचे १० नगरसेवक निवडून आलेले असताना सुद्धा तसेच शहरात भारतीय जनता पक्षाचे तुल्यबळ मतदार असताना सुद्धा या नगर परिषदेच्या निवडणुकीत पुसद जिल्ह्याला व तालुक्याला समाधानकारक नेतृत्व न मिळाल्याने नगर परिषदेमध्ये एकहाती येणारी सत्ता स्थानिक राजकारणातील अंतर्गत कलह गटबाजी आणि हेवेदाव्यांमुळे पक्षाला अनेक प्रभागांमध्ये मोठा फटका बसला आहे, ज्यामुळे भाजपचा धुवा उडाला (मोठा पराभव) झाल्याचे बोलले जात असून पक्षातीलच स्थानिक नेत्यांनी व काही पदाधिकाऱ्यांनी विरोधी पक्षाला पडद्यामागून मदत केल्याने मोठा पराभव पत्करावा लागला तरीही स्थानिक भाजपचे डोळे उघडले नाही. उलट या पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्याचा वाद एवढा विकोपाला गेला आहे.
पण आजच्या घडीला संपूर्ण देशात पक्षाची घौडदौड सुरू आहे नुकतेच पक्षाने दोन तीन राज्य जिंकले त्या संदर्भात स्थानिक पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शहरातील मेन चौकात सेलिब्रेशन केले परंतु हे सेलिब्रेशन करण्यासाठी सुद्धा हे पदाधिकारी एका नेत्याच्या नेतृत्वाखाली न येता किंवा आपल्या वरिष्ठ नेत्याला न जुमानता मनमानी पद्धतीने सेलिब्रेशन करीत असल्याचे चित्र या शहरातील सर्वसामान्य जनतेने पाहिले आहे.
त्यामुळे येत्या काळात भारतीय जनता पक्ष स्थानिक पातळीवर पुसद जिल्ह्यात डोळ्यात देखत पक्षाचा ऱ्हास होत असतांना डोळ्यावर कातडे वढुन हे नेते स्वस्त बसले आहे असाच निकर्ष यातून काढावा लागेल तर पक्षातील काही नाममात्र भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक सत्ताधाऱ्यांच्या वळणीला जाऊन बसल्याचे चित्र दिसून येत आहे. या पक्षात संघटनात्मक नियुक्त्यांचा धडाका लावत पक्षाने ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला असला, तरी प्रत्यक्षात पुसद जिल्ह्यातील वास्तव हे अंतर्गत कलह गटबाजी, आरोप-प्रत्यारोप आणि उघड बंडाळीचे चित्र दाखवत आहे. मागील काळात पक्षाने जिल्हाध्यक्षपदी एका महिलेची वर्णी लागली त्यावेळी मात्र या नियुक्तीचे स्वागत करण्याऐवजी पक्षातच जिल्हाध्यक्ष विरुद्ध तालुकाध्यक्ष व इतर पदाधिकारी असा संघर्ष उफाळून आला आहे. दुसरीकडे पक्षाने नगरपरिषद निवडणुकीत अधिकृत उमेदवारी जाहीर केली असता त्याच उमेदवाराला पक्षातीलच काही पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विरोध दर्शवून आपल्याच पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची बदनामी करण्याची सुरुवात केली तसेच कार्यकर्त्यांमधील अंतर्गत मतभेद आणि एकमेकांचे पाय खेचण्याची प्रवृत्तीमुळे या निवडणुकीत पक्षाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले तर दुसरीकडे काहींनी विरोधी पक्षा सोबत मागील दराने संगणमत करून भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडणुकीत पाडला तर काही पक्षातील पदाधिकाऱ्यांनी स्वतः उमेदवारी दाखल केली तरीही पक्षातील बंडखोरांना किंवा पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे कोणत्याही पदाधिकाऱ्यावर कारवाई केली नाही त्यामुळे स्थानिक पातळीवर पुसद जिल्ह्यात हा भारतीय जनता पक्ष नेताहीन झाल्यामुळे या पक्षाचे ‘संघटन मजबूत करण्याची’ योजना प्रत्यक्षात ‘अंतर्गत विस्कळीतपणाचे प्रदर्शन’ ठरत असल्याची टीका राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. भाजपामध्ये अनेक नेतृत्वहीन पदाधिकारी पदावर कार्यरत आहेत परंतु पुसद जिल्ह्याचा कारभार उमरखेड शहरातून चालत असल्यामुळे तसेच येथील प्रत्येक घटनेमध्ये तेच हस्तक्षेप करीत असल्याने पुसद जिल्ह्यातील कार्यकर्त्यासह पदाधिकाऱ्यांमध्ये मोठी नाराजी पाहावयास मिळत आहे.पुसद जिल्ह्यांमध्ये जिल्हाध्यक्ष संघटनात्मक बळ वाढवण्याच्या ऐवजी व्यक्तीस्तोम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ठराविक नेत्यांना पुढे करून आपले ईप्सिप्त त्यांनी साधले. त्यांच्याच कार्यकाळात भाजप पक्षातील स्थानिक नेते व कार्यकर्ते यांच्यात किती अंतर निर्माण झाले आहे हे त्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना ठाऊक आहे. मात्र अध्यक्षांना कळत नाही तर तालुका अध्यक्ष नाममात्र असल्याचे चित्र प्रवास मिळत आहे तर दुसरीकडे स्थानिक नेते जबाबदार पदाधिकारी आपापल्या संधी साधून राजकारण करीत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर भारतीय जनता पक्षाची दिशा आणि दशा कशी झाली याचे त्यांना भान नाही. ज्या एकनिष्ठ पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्ष या शहरात जिवंत ठेवला त्यांना तर पक्षात कोणीही विचारायला तयार नाहीत जे हिंदुत्व वादी विचाराचे उपरे आलेत त्यांनी पक्षातच अंतर्गत कलह निर्माण करून गटबाजी तयार करीत पक्षाची ताकद कमी करून विरोधी पक्षातील स्थानिक पातळीवरील सत्ताधाऱ्याच्या वळणीला पक्ष बांधला काय? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे ज्या पक्षाची संपूर्ण देशात घोडदौड चालू आहे तो पक्ष आज अशा निष्क्रिय कार्यकर्ते पदाधिकारी नेत्यामुळे पुसद जिल्ह्यात अस्तित्वहीन झाला आहे.
भाजपातील अंतर्गत संघर्ष आता केवळ कुजबुज न राहता उघडपणे समोर आला आहे. या विरोधाभासी भूमिकेमुळे पक्षाच्या अंतर्गत शिस्तीचा पूर्णतः बोजवारा उडाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सामान्य कार्यकर्त्यांसमोर ‘नेमके ऐकायचे कोणाचे?’ असा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, हा संघर्ष केवळ वैयक्तिक मतभेदांचा नसून ‘स्थानिक सत्ता आणि वर्चस्वाच्या लढाईचा’ भाग आहे. मात्र, शहरातील भारतीय जनता पक्षाची सध्याची परिस्थिती पाहता अंतर्गत संघर्ष उग्र झाला आहे. संघटन मजबूत करण्याऐवजी गटबाजीमुळे पक्षाची ताकद कमी होत असल्याचे वास्तव नाकारता येत नाही. जर ही परिस्थिती अशीच राहिली, तर ‘मिशन २०२९’साठी आखलेली रणनीती कागदावरच राहण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.भाजपाला सध्या बाह्य विरोधकांपेक्षा अंतर्गत संघर्षाचाच मोठा धोका निर्माण झाला आहे. येणाऱ्या काळाच्या दिशेने वाटचाल करण्यापूर्वीच पक्षाला स्वतःच्या घरातील ‘आग’ विझवावी लागणार आहे; अन्यथा, हीच आग आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपासाठी मोठा अडथळा ठरू शकते. या प्रकारामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढत चालला असून येणाऱ्या काळात शहरात पक्षाची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



