नाना पाटेकर यांना विविध सामाजिक संघटनांकडून सामुहिक श्रद्धांजली!

पुसद : ज्येष्ठ अभिनेते आणि समाजसेवक नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर श्रीरामपूर येथे शुक्रवारी(ता.९) संवेदना सोशल फाऊंडेशन,नाम फाऊंडेशन,मराठा सेवा संघ व छत्रपती ग्रुप आदी विविध सामाजिक संघटनांतर्फे सामुहिक श्रद्धांजली वाहिली.कार्यक्रमाच्या सुरवातीला मराठा सेवा संघ श्रीरामपूरचे माजी अध्यक्ष प्राचार्य डाॅ.गणेश पाटील यांनी नाना पाटेकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले.यानंतर सर्व मान्यवरांनी पुष्पे अर्पण करुन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.यावेळी स्वप्निल देशमुख यांनी नाम फाऊंडेशन’ ही ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये सुरू केलेली एक अत्यंत महत्त्वाची सामाजिक चळवळ असल्याचे सांगून महाराष्ट्रातील भीषण दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या लक्षात घेऊन नाम फाऊंडेशन च्या माध्यमातून लाखो शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांना संकटातून बाहेर काढण्यासाठी बहुआयामी कार्य करण्याबरोबरच जलसंधारण आणि जलक्रांती, नद्या व कालव्यांचे पुनरुज्जीवन,आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक आधार, महिला सक्षमीकरण आणि रोजगार, आदर्श गावे दत्तक घेणे आणि याशिवाय वृक्षारोपण, देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्या शहीद जवानांच्या कुटुंबांना आर्थिक मदत आणि नैसर्गिक आपत्तीतील पूर परिस्थिती काळात मदत छावण्या उभारण्याचे कार्यावर प्रकाश टाकून नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली.कार्यक्रमाला मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष हरगोविंद कदम,संवेदना सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण देशमुख सवनेकर,छत्रपती ग्रुपचे प्रभाकर टेटर पाटील यांचेसह दिलीप पाटील कान्हेकर,अॅड.सुनिल नरवाडे,विजय कदम,दिगंबर चव्हाण,विजय देशमुख,गजानन जाधव,शिवाजी कदम,प्रताप पतंगे,अविनाश अडकिने,प्रकाश बेद्रे,विवेक खोडके,गिरिधर ठेंगे आदी मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचालन चंद्रकांत ठेंगे यांनी केले.उपस्थितांचे आभार शशिकांत जामगडे यांनी मानले.



