ईतर

समाजहितासाठी झटणाऱे निस्वार्थी कार्यकर्ते मनीष भाऊ शहा यांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा!

पुसद : समाजासाठी आपलं आयुष्य निस्वार्थपणे वेचणाऱ्या,व समाजसेवेचे व्रत घेऊन कार्य करणाऱे समाजसेवक मनिषंभाऊ शाह यांच्या आज वाढदिवस आहे त्यांच्याप्रती शुभेच्छा देताना आदर आणि प्रेमाची भावना व्यक्त करावी वाटते ते नेहेमी गरजूंना “स्वतःच्या सुखाचा त्याग करून,इतरांच्या आयुष्यात आनंद फुलवणाऱ्याया माणसाला सलाम” तुमचं हे निस्वार्थ कार्य लोकांच्या जीवनात नवा प्रकाश आणतं. समाजकार्याच्या वाटचालीत तुमचं नाव सदैव सन्मानाने घेतलं जावो.”तसेच तुमचं कार्य आम्हा सर्वांना नेहमीच प्रेरणा देत राहो.”आपणास वाढदिवसानिमित्त उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो,हीच ईश्वरचरणी प्रार्थना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

“तुमचे जीवन हेच एक मोठे कार्य आहे.गोरगरिबांच्या डोळ्यातील आनंदाश्रू,हेच तुमच्या कामाचे खरे फळ आहे.समाजसेवेच्या या महान प्रवासात तुम्हाला अधिक यश मिळो स्वतःच्या सुख-दुःखाचा विचार न करता, इतरांच्या आयुष्यात आशेचा किरण बनून उभे राहणारी माणसं समाजात विरळच जन्माला येतात. कारण प्रत्येकजण स्वतःसाठी जगतो,पण जे दुसऱ्यांसाठी जगतात तेच खऱ्या अर्थाने समाजाच्या हृदयावर आपले नाव कोरतात. अशीच एक लोकाभिमुख, सेवाभावी आणि माणुसकीचा सुगंध जपणारी व्यक्ती म्हणजे मनीष भाऊ शाह हे आहेत गरजूंच्या आयुष्यात अंधार दाटून आला असेल, आर्थिक संकटाने कुटुंब खचले असेल, एखाद्या वृद्धाच्या डोळ्यांना पुन्हा प्रकाश देण्यासाठी शस्त्रक्रियेची गरज असेल,एखाद्या गरीब बापाच्या मुलीच्या लग्नासाठी हात पुढे करण्याची वेळ आली असेल, किंवा समाजहिताच्या कार्यासाठी मंदिर उभारणीस हातभार लावायचा असेल अशा प्रत्येक प्रसंगी पुसद आणि परिसरातील जनतेच्या मनात प्रथम उमटणारे नाव म्हणजे मनीष भाऊ शाह त्यांच्या व्यक्तिमत्त्वात केवळ मदतीचा हात नाही, तर माणुसकीचा अथांग सागर दडलेला आहे. विनम्रता ही त्यांची ओळख, सद्विवेक ही त्यांची शक्ती आणि व्यवहारचातुर्य ही त्यांची विशेषता आहे. त्यांच्यावर सोपवलेली प्रत्येक जबाबदारी ते प्रामाणिकतेच्या आणि कौशल्याच्या पायावर इतक्या चोखपणे पार पाडतात की विश्वासालाही अभिमान वाटावा काही व्यक्ती पदाने मोठ्या असतात, काही संपत्तीने मोठ्या असतात; पण काही माणसं आपल्या मनाच्या विशालतेने मोठी होतात. मनीष भाऊ हे त्याच व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत.कोणाच्याही दुःखाचा आवाज त्यांच्या कानावर पडला की, नात्यांची अट न ठेवता मदतीचा हात पुढे करणारे ते एक हळवे, संवेदनशील आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्त्व आहेत. ओळखीचा असो वा अनोळखी, संकटात असलेल्या प्रत्येकासाठी ते धावून येतात आणि हाच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात मोठा मानवी अलंकार आहे समाजात अनेक लोक यशस्वी होतात, पण काही मोजकीच माणसं लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करतात. कारण संपत्तीने माणूस श्रीमंत होतो, पण माणुसकीने तो महान होतो.आज दि १५ हे २०२६ ला त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देताना एवढेच म्हणावेसे वाटते “तुमच्या कार्याचा प्रकाश असा अखंड तेजाळत राहो, तुमच्या माणुसकीच्या सावलीत अनेकांना आधार मिळत राहो, आणि तुमच्या जीवनाचा प्रत्येक क्षण समाजसेवेच्या सुवर्ण अक्षरांनी उजळत राहो.”निस्वार्थ सेवेचा वसा घेणारे समाजसेवक मनीष भाऊ शाह यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा..!-प्रा.वसंत राठोड (पुसद)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close