जागतिक आदिवासी गौरव दिनाच औचित्य साधून पुसद येथे विदर्भस्तरीय आदिवासी युवा महोत्सवाचे आयोजन होणार
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे भव्य आयोजन

पुसद : संयुक्त राष्ट्र संघाने आदिवासींच्या हक्काचा दिवस म्हणून ०९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी गौरव दिन म्हणून घोषित केला. याच दिनाचे औचित्य साधून पुसद येथे दि. २३ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११:० वाजता पुसद येथे सुधाकर प्रेक्षागृह, बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय पुसद जिल्हा यवतमाळ येथे आयोजित करण्यात असल्याची माहिती पुसद येथील शासकीय विश्राम गृह येथे दि. २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११:०० वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत झालेल्या अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. यावेळी कार्यक्रमाविषयी माहिती देताना आदिवासी हा या देशाचा मूळनिवासी निवासी आहे. आदिवासींच्या सामाजिक सांस्कृतिक, कलागुणांना वाव देण्यासाठी, त्याचबरोबर समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच त्यांच्या अधिकाराच्या संरक्षणासाठी प्रेरित करणे, या उदात्त हेतूने ०९ ऑगस्ट हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाने आदिवासी गौरव दिन म्हणून घोषित केला. या शुभदिनाचे औचित्य साधून समाजाच्या विविध हक्क आणि न्यायासाठी पर्यायाने राज्यातील अधिवेशनच्या प्रश्नाला गती देण्याकरिता पुसद येथेअखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने विदर्भस्तरीय आदिवासी युवा महोत्सवाचे आयोजन मोठ्या थाटात होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास विभागाचे राज्यमंत्री नामदार ॲड . इंद्रनील नाईक तर अध्यक्षा म्हणून आदिवासी विकास विभागाचे आयुक्त लीना बनसोडे मॅडम उपस्थित राहणार आहेत. तर विशेष उपस्थिती म्हणून जिल्हाधिकारी विकास मीना साहेब, पांढरकवडा प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी अमित रंजन, अमरावती आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त जितेंद्र चौधरी, माजी आमदार ॲड. निलय नाईक, सौ.मोहिनीताई नाईक, पुसद प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर,माजी आमदार उत्तमराव इंगळे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आरतीताई फुकाटे, माधवराव वैद्य, माजी आमदार संतोष टारफ़े,जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी तुकाराम भिसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश नाटकर, जितेंद्र मोघे जिल्हा आरोग्य अधिकारी सुभाष ढोले, प्रदेशाध्यक्ष आदिवासी विकास परिषद राम चव्हाण दादाराव डोलारकर, अमोल माळकर, रंगराव काळे, प्रकाश झळके, चंद्रशेखर मडावी, डॉ.नामदेव सरकुंडे, केशव मस्के विशाल झांबरे यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.सर्व आदिवासी बांधवांनी तसेच पुसद परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आव्हान पत्रकार परिषदेत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदे तर्फे करण्यात आले.
या पत्रकार परिषदेला अ भा. आदिवासी विकास पारिषदेचे जिल्हाध्यक्ष ॲड.सुनील ढाले, ॲड.रामदास भडंगे. माधवराव वैद्य, सुरेश धनवे , रंगराव काळे , गजानन टारफे , नारायण कऱ्हाळे , गजानन उघडे , किसन भुरके , संतोष गारुळे , राजु गायकवाड , तातेराव भडंगे , गणेश भुजाडे , बालाजी उघडे , विठ्ठल उघडे अधिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.



