अवैधरित्या देशीकट्टा बाळगणा-या तरुणास अटक; पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पथकांची कारवाई!

पुसद : ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सांडवा परिसरातून देशी कट्टा बाळगणा-या एका २५ वर्षीय तरुणास पोलिसांनी अटक केली आहे. शेख आतिक शेख रशीद वय २५ वर्षे रा.शिवाजी वार्ड पुसद असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या कब्जातून अंदाजे १५ हजार रुपये किमतीचा देशी कट्टा हस्तगत करण्यात आला आहे. त्याच्या विरुद्ध पुसद ग्रामीण पोलिस स्टेशनला अपक्रं.३४७/२०२६ भारतीय हत्यार अधिनियम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी ‘झेप न्यूज’ ला दिलेली माहिती अशी की, बकरी ईद आणि अहील्यादेवी होळकर जयंती सण उत्सव यवतमाळ जिल्ह्यात शांततेत पार पडावेत. याकरीता जिल्हा पोलीस अधिक्षक कुमार चिंता यांनी जिल्ह्यात सतत पेट्रोलींग करून शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आदेश दिले होते. त्याच आदेशाच्या अनुषंगाने पुसद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सांडवा परिसरात पोलीस पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय माहीती मिळाली की, सांडवा परिसरात एक संशयित तरुण अवैधयरीत्या बनावटीचा देशीकट्टा बाळगून संशयास्पदरीत्या फीरत हसण्याची गोपिनीय माहीती पोलिसांना मिळताच ग्रामीण पोलिसांनी तात्काळ पोलीस पथकास सांडवा परीसरात सापळा रचून संशयीत तरुणास ताब्यात घेवून त्यास नाव, गाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव, शेख अतीक शेख रशीद वय २५ वर्ष रा. शिवाजीवार्ड, पुसद असे सांगितले. वरून त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कंबरेला एक देशी बनावटीचा गावठी कट्टा त्याची किंमत अंदाजे १५हजार रुपये अवैधरीत्या बाळगतांना मिळून आल्याने या प्रकरणी पुसद पो. स्टे. येथे अप.कं. ३४७/२०२६ क.३,२५ शस्त्र अधि. व सहक. १३५ मपोका अन्वये गून्हा नोंद करण्यात आला आहे. सदर तरुणाला अटक करण्यात आली आहे पुढील तपास पोउपनि कैलास ससाणे व पोअ / विष्णु काईट हे करीत आहे.
सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधिक्षक यवतमाळ कुमार चिंता सा. मा. अप्पर पोलीस अधिक्षक यवतमाळ अशोक थोरात यांचे मार्गदर्शनात तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, पुसद सिध्देश्वर भोरे सामा. पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांचे नेतृत्वात ठाणेदार आशिष चौधरी, सफौ शेख मसूद, पोअ. योगेश आळणे, केशव मुंढे, अक्षय मोटे, सैनिक /३३२ सुनिल देव्हारे, शेख सद्दाम ब.नं. ३६७, महीला सैनिक निकीता ब.नं. २१०९, पो. स्टे. पुसद ग्रामिण यांनी यशस्वीरीत्या पार पाडली असून नागरीकांना पोलीस स्टेशन हद्दीत कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर कृत्याची माहीती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ पोलीस स्टेशन पुसद ग्रामिण येथे संपर्क साधावेत असे आव्हान करण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस करीत आहेत.



