लाकडी दांडक्याने मारहाण करून जबरी चोरी करणारे आरोपी जेरबंद; अखेर टॅटू ठरला महत्त्वाचा पुरावा! पुसद शहर डीबी पथकाची मोठी कारवाई!

पुसद : शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत उमरखेड रोड लगत लाकडाच्या आरा मशीन जवळ एका भाजी विक्रेत्याला अनोळखी विशीतील आरोपीने जबरी चोरी करताना फिर्यादीला लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले व त्याच्याकडे रक्कम घेऊन पसार झाले होते त्यावेळी भाजी विक्रेत्यांनी पोलिसात फिर्याद नोंदविली होती. परंतु या मारहाणी प्रकरणाची पोलीसांकडे कोणता ठोस पुरावा नव्हता परंतु फिर्यादीने आरोपीच्या मानेवर टॅटू असल्याचे सांगितले होते त्यावेळी पोलिसांपुढे आरोपींना पकडण्याचे मोठे आवाहन ठाकले होते त्यावेळी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता ज्यांच्या मानेवर टॅटूच्या निशाणा आहेत किंवा पोलिसांनी आपल्या रेकॉर्डवरील तसेच शहरातील २०ते२५ जनाच्या मानेवर टॅटू असलेल्यांची माहिती तपासली आणि आरोपींची अचूक ओळख पटवली.आरोपींना पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या मदतीने जेरबंद केलेआहे.आरोपीकडून जवळपास ५००० नगद व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण ७५००० हजार रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पोलिसाकडे कोणताही पुरावा नसताना आरोपीच्या मानेवर असलेल्या टॅटूच ठरला अखेर महत्त्वाचा पुरावा..
१)सुमित कैलास तूपसुंदरे वय २० वर्षे रा. मुखरे चौक तुकाराम बापू वार्ड पुसद, ता. पुसद जि. यवतमाळ, २) जय अवधूत गंगासागर वय२१वर्षे रा. हुडी ता.पुसद जि. यवतमाळ, असे आरोपीचे नावे आहेत.
याबाबत पोलीस सूत्राने ‘झेप न्यूज’ ला दिलेली माहिती अशी की, दि.२२मे२०२६ रोजी सकाळी १०:०० वाजण्याच्या सुमारास फीर्यादी लखन साहेबराव भांबुर्गे, वय२८, वर्ष व्यवसाय-भाजी विक्री, रा. दहीवड (बु.), ता.पुसद ता.पुसद, जि. यवतमाळ हा भाजीपाला विकन्या करीता महावीर नगर कडे जात असताना उमरखेड रोड लगत आरामशीन जवळ रोडवर त्याचे पाठीमागुन दोन अनोळखी विशीतील विनानंबरचे दुचाकी वरून अंगात सडपातळ बांध्याचे तोंडाला रुमाल बांधलेले वय अंदाजे २०ते २२ वर्ष अंगात काळया रंगाची, टि शर्ट, व काळा पँट अलेले, मानेवर टॅटू, त्याचे जवळ आले आणि येताच त्यांनी फीर्यादीस लाकडी दांडक्याने मारहाण करुण गंभीर जखमी केले फीर्यादी खाली पडला असता त्याच्या खिशात असलेले रोख रक्कम ६७००/ रुपये जबरीने चोरुण नेले अशा आशियाची फीर्याद पुसद शहरात पोलीस स्टेशनला फिर्यादीने दिली होती त्या फिर्यादीवरून पोलिसांनी स्टेशन डायरीला अप.नं. ४१३/२०२६, कलम-३११,१२६ (२), ३ (५) भा.न्या.सं. प्रमाणे गंभीर प्रकारचा गुन्हा नोंद करुण तपासाची चक्रे फिरवली असताना घटनेचे व आरोपीचे कोणतेही सी.सी. फुटेज नसताना व प्रत्यक्षदर्शी कोणीही बघीतलेले नसाताना निष्पन्न करने पोलीसापुढे फार मोठे अवाहण उभे ठाकले होते परंतु पुसद शहर पोलीस स्टेशनचे वरीष्ट पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांनी तात्काळ गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखुन डी.बी. प्रमुख सपोनि प्रेमकुमार केदार व डी.बी. स्टॉप.यांना योग्य त्या सुचना देउन कोणत्याही परस्थीतीत गुन्हा उघडकीस आनन्याचे आदेशीत केले. फिर्यादीने आरोपीचे मानेवर ट्याट् असल्याचे सांगीतले त्यावरुण जबरी चोरी करनारे आरोपी व ईतर २०ते २५ जनाच्या मानेवर असलेले ट्याटु असनारे आरोपी तपासुन सातत्याने आरोपी पसार झालेल्या मार्गावर आरोपींचे शोधकामी अतोनात प्रयत्न करुन तसेच पोलीस कौशल्याचा वापर करुण गोपनिय बातमीदार व आरोपीचे मानेवर असलेल्या टँयाटुवरुण आरोपी निष्पन्न करुन दि.२४मे२०२६ रोजी गुन्ह्यांतील एक आरोपी वाशिम येथे असल्याची गोपनिय माहीती मिळाली त्यावरुण सापळा रचुन अतिशय कौशल्यपुर्वक आरोपी १) सुमीत कैलास तुपसुंदरे, वय-२० वर्षे, रा. मुखरे चौक तुकारामबापु वार्ड पुसद, ता. पुसद, जि. यवतमाळ.यास घानमोडी वाशिम येथुन २) जय अवधुत गंगासागर, वय-२१ वर्षे, रा. हुडी, ता. पुसद, जि. यवतमाळ यास गुंज ता. महागाव येथुन ताब्यात घेउन त्यांना विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली त्यावरुण त्यांना कायदेशीर रीत्या अटक करुण त्यांचे कडून जबरीने चोरुन नेलेली रोख रक्कम ५०००/ व घटनेवेळी गुन्हयात वापरलेली मोटर किमंत ७००००/- रुपये फीर्यादीस मारन्यासाठी वापलेले लाकडी दांडके असा एकुण ७५००००/- रुपयेचा मुदेमाल जप्ती पंचनामा प्रमाणे जप्त करुण ताब्यात घेतला. पुढील तपास डी.बी. पथक करीत आहे. विशेष म्हणजे पोलिसाकडे कोणताही पुरावा नसताना आरोपीच्या मानेवर असलेल्या या टॅटूच्या आधारे पोलिसांनी आपल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती तपासली आणि आरोपींची अचूक ओळख पटवली. अखेर टॅटू ठरला महत्त्वाचा पुरावा..
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक, कुमार चिंता, अप्पर पोलीस अधिक्षक, अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड पुसद गायकवाड साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांचे सुचनाप्रमाणे डी.बी. प्रमुख सपोनि प्रेमकुमार केदार, पो. हवा. मनोज कदम, पो.ना. दिनेश सोळके, पो.काँ.शुध्दोधन भगत, पो, काँ, २०२८ आकाश बाभुळकर यांनी केली आहे.



