गोवंश जातीच्या जनावरांचे मांस कापल्या प्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल! ग्रामीण पोलीसांच्या पथकाने छापा टाकून केली कारवाई!

पुसद : ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काळी दौ. येथील एका इसमाच्या राहत्याघरी गोवंश जातीच्या जनावरांच्या कत्तलीस बंदी असताना देखील बेकायदेशीररीत्या कत्तल करून जनावरांचे मांस कापत आल्याची पोलिसांना गोपीनिय माहिती मिळाली होती ग्रामीण पोलिसांनी तात्काळ छापा टाकला असता चार इसम गोवंश जातीच्या जनावराचे मांस कापत असल्याचे आढळून आल्याने त्यांच्या जवळ गोवंश जातीचे ६०की गोमांस अंदाजे कीमत १२०००रुपये तसेच कतलीसाठी लागणारे साहित्य कुराड,सुरु, इलेक्ट्रिक काटा,असे साहित्य मीळुन आल्याप्रकरणी चार आरोपीस ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर पुसद ग्रामिण पोलीस स्टेशन येथे गोवंश जातीच्या जनावरांची बेकायदेशीर कत्तल करून मांस कापत आसणाऱ्या आरोपींना महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हे दाखल करुन अटक केली आहे.
याबाबत ग्रामीण पोलीस सुत्रांनी झेप न्यूज’ ला दिलेली माहिती अशी की, सध्या बकरी ईद आणि अहील्यादेवी होळकर जयंती असे सण व उत्सव असून यवतमाळ जिल्ह्यांमध्ये हे सण शांततेत पार पडावेत. याकरीता जिल्हा पोलीस अधिक्षक कुमार चिंता सा. यांनी जिल्हयात सतत पेट्रोलींग करून शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आदेश दिले होते. त्याच आदेशाच्या अनुषंगाने ग्रामीण पोलीस स्टेशन पुसद अंतर्गत दुरक्षेत्र काळी दौ हद्दीत दि, २९ मे२०२६ रोजी पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय माहीती मिळाली की, ग्राम काळी दी. ता. महागाव येथील ईसम नामे मिर्झा जकी बेग फरातुल्लाह बेग याचे घरी अवैध्यरीत्या गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करून कापत आहे. अशी माहीती मिळताच पोलीस पथकाने तातडीने सदर ठीकाणी जावून छापा मारला असता १. मिर्झा अनस बेग जकी बेग, २. मिर्झा जकी बेग फरातुल्लाह बेग, ३. मिर्झा सुजात बेग जकी बेग, रा. काळी दौ.४. मिर्झा मुजीब ख्वाजा बेग रा. वसंतनगर, पुसद हे गोवंश जातीचे मास कापतांना दिसल्याने त्यांना ताब्यात घेतले असता त्यांचे जवळ गोवंश जातीचे अं. ६० कीलो १२,००० रू.व मांस कापण्याकरीता कु-हाड, सुरी, इलेक्टीक काटा, लाकडी ओंडका असे साहीत्य आढळून आले. त्यावरून आरोपीतांना ताब्यात घेवून पुढील कार्यवाही करीत आहो.सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक यवतमाळ कुमार चिंता सा.मा. अप्पर पोलीस अधिक्षक यवतमाळ अशोक थोरात यांचे मार्गदर्शनात तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, पुसद सिध्देश्वर भोरे सामा पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांचे नेतृत्वात ठाणेदार आशिष चौधरी, पोउपनि राहूल देशमुख, पोहेका हनूमान गंगासागर, पोना नितीन आडे, पो. अं. उत्तम चव्हाण पो. स्टे. पुसद ग्रामिण यांनी यशस्वीरीत्या पार पाडली असून नागरीकांना पोलीस स्टेशन हद्दीत कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर कृत्याची माहीती मिळाल्यास तात्काळ पोलीस स्टेशन पुसद ग्रामिण येथे संपर्क साधावा.



