खडकदरी येथील एका आवलीयाने गणरायाची मूर्ती इस्त्रोचे शास्त्रज्ञांच्या रुपात उभारुन चंद्रयान-३ चा सुरेख देखावा!

पुसद: तालुक्यातील खडकदरी येथील एका आवलीयाने गणरायाची मूर्ती इस्त्रोचे शास्त्रज्ञांच्या रुपात उभारुन चंद्रयान-३ चा सुरेख देखावा निर्माण करण्यात आला आहे. इस्रो या संशोधन संस्थेने नुकतेच चंद्रयान- ३ यान चंद्रावर पाठवले यशस्वी पणे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवा जवळ उतरले आणि भारत जगाच्या इतिहासात महत्वपूर्ण कार्य केले दिसून आले.भारतीय संशोधनानी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यान देशाचे नाव संपूर्ण जगात पसरले आहे.आपल्या देशाने हा बहुमान मिळाल्येने खडदरी येथील होतकरू कलाप्रेमी गणेश कृषी केंद्र खडकदरीचे संचालक गणेश भालेराव यांचे धाकटे बंधू शेतकरी पुत्र जगदीश भालेराव यांनी इस्त्रोचे शास्त्रज्ञांच्या रुपात गणेशाच्या मूर्तीची स्थापना करून 
चंद्रयान -३चा आकर्षक देखावा निर्माण केला असून हा देखावा पाहण्यासाठी गावासह पंचक्रोशीत नातेवाईक, गणेश भक्त, गावातील नागरिक यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती. त्यामुळे जगदीश भालेराव यांनी अथक परिश्रम घेवून आकर्षक देखावा तयार केल्याने त्यांच्यावरच कौतुकाचा वर्षाव होत आहे.



