बांन्शी ग्रामपंचायतीच्या हद्दीत बेकायदेशीर माती उत्खनन; महसूल प्रशासनाचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष!

पुसद : तालुक्यातील बांन्शी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील भवानी नगरला लागून ईक्लासच्या जमिनीवर सरपंच सचिव तलाठी यांच्या संगनमताने अवैधरित्या पाझर तलावातून ट्रॅक्टर व ढंपर द्वारे गौणखज मातीचे उत्खनन सुरू आहे या अवैध उत्खनाकडे महसूल प्रशासनाचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. बेसुमार माती उत्खननामुळे निसर्गाचा ऱ्हास होत आहे. या बेकायदेशीर माती उत्खननावर प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून व पर्यावरण प्रेमींकडून केली जात आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की,पुसद तालुक्यातील बांन्शी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील भवानी नगरला लागून ईक्लासच्या जमिनीवर सरपंच सचिव तलाठी यांच्या संगनमताने अवैधरित्या पाझर तलावातून ट्रॅक्टर व डंपर द्वारे गौणखज मातीचे उत्खनन सुरू आहे या अवैध उत्खनाकडे महसूल प्रशासनाचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. बेसुमार माती उत्खननामुळे निसर्गाचा ऱ्हास होत आहे. या बेकायदेशीर माती उत्खननावर प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलावा यासाठी काही नागरिकांकडून व पर्यावरण प्रेमींकडून संबंधित महसूल विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली असून बन्सी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये सरपंच सचिव तलाठी यांच्या संगनमताने ईक्लासच्या जमिनीवरील पाझर तलावातुन शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडवून बांन्शी तांडा येथे अवैधरित्या वीट भट्टीवर सुरू आहे. परंतु सदर वीटभट्टी ला प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी घेणे आवश्यकता असताना वीट भट्टी धारकाने कोणत्याही प्रकारे परवानगी घेतली नाही व माती उत्खननासाठी सुद्धा परवानगी घेतली नाही उलट त्या गावात एका व्यक्तीने वीटभट्टीला परवानगी मागितली होती ती मात्र कमी ब्रास मातीची आहे.बांन्शी ग्रामपंचायत च्या हद्दीतील भवानी नगरला लागून असलेल्या ई क्लासच्या जमिनीवर पाझर तलावातून अवैधरित्या पाच ते सहा ट्रॅक्टर द्वारे गाळ व मातीचे उत्खनन सुरू असून या वीट धारकांनी एक लाखाच्या वर विटा तयार केल्या असून आणखी लाखो विटा तयार करण्यासाठी लागणाऱ्या काळ्या मातीचा साठा करून ठेवला आहे. तर जवळपास ४० हजाराच्या दोन लावल्या आहेत सदर वीटभट्टीला परवानगी नसल्याची माहिती उपलब्ध आहे. परंतु ग्रामपंचायत चे सचिव, सरपंच,तलाठी यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता ही माती स्मशानभूमी करिता टाकली जात असल्याची त्यांनी माहिती दिली आहे परंतु स्मशानभूमी च्या जागी चार ते पाच ट्रिपा नावा पुरत्या टाकल्या असून वीट भट्टीवर आले तर त्या ठिकाणी साठा केला आहे या वीटभट्टीला तलाठी,सचिव,सरपंच याची मुकसंमती असल्याचे निदर्शनास आले आहे. अवैधरित्या गौण खनिज काळी मातीचा उपसा करून ई क्लासच्या जमिनीवरील पाझर तलावात ट्रॅक्टर व डंपरद्वारे मोठमोठे खड्डे खोदून संपूर्ण चाळण केली असल्याने व जनावरांना व माणसांना या उत्खननामुळे भविष्यात जिवीत्वाचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही वीट भट्टी धारकाकडून अवैधरित्या उपसा सुरू असल्याने शासनाच्या महसूल विभागाला लाखो रुपयांचा चुना लावला जात आहे.अवैधरित्या काळ्या मातीच्या उपसा करण्यासाठी ५ते६ नग ट्रॅक्टर,ढंपर वाहने वाहतूक सुरू आहेत. महसूल प्रशासनाची डोळेझाक होत आहे माती उपसा करणाऱ्या वाहनावर आजपर्यंत कोणत्याही महसूल विभागाच्या तलाठ्याने किंवा मंडळ अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही गौण खनिज उपसा सुरू असल्याने त्यातून पर्यावरणाची अपरिमित हानी होत आहे तर भविष्यात गावातील जनावरांना व नागरिकांना धोका निर्माण होऊ शकते. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तात्काळ या अवैधरित्या गाळ, माती उपसा करणाऱ्यावर महाराष्ट्र जमीन गौणखनिज अधिनियमान्वये १९६६ चे कलम ४७ (७) (८) नुसार दंडात्मक कारवाई करून गुन्हे दाखल करून यातील वाहाने जप्त करण्यात यावे तसेच वीटभट्टी धारक सरपंच, सचिव, तलाठी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून शासकीय कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करावे अन्यथा आम्हाला लोकशाही मागनि आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.अवैधरित्या होणाऱ्या माती उत्खनन व वाहतुकीवर प्रशासनाने अंकुश बसवावा अशी मागणी केली जात आहे.



