क्राइम

घातक शस्त्र तलवार घेउन दंहशत निर्माण करणाऱा इसम जेरबंद: पुसद शहर पोलीसांच्या डी.बी.पथकाची कारवाई!

पुसद: शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक इसम एखादा घातपात करण्याचे दृष्टीने हातात घातक धारदार शस्त्र (तलवार) सोबत बाळगुन असल्याचे दिसून आल्याने शहर पोलिसांच्या डी.बी पथकाने मुसक्या आवळल्या असुंन त्याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गजानन शंकर काळे वय २४ वर्ष रा. गुणवंतराव शाळेजवळ श्रीरामपुर पुसद ता. पुसद जि. यवतमाळ असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,पुसद शहरात वाढलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे ईसमावर आळा बसावा या करीता ठाणेदार सेवानंद वानखेडे यांनी प्रभावी गस्त (पेट्रोलींग) वाढवून कारवाई करण्याचें आदेश पोलीस स्टेशनचे डी.बी.पथकास दिले त्याच सुचणे प्रमाणे दि. ३जुलै२०२६ रोजी पुसद शहर डी.बी. पथक शहरात गस्त घालत असतांना डी.बी. पथकास गोपनिय बातमीदार यांचे कडुन खात्रीलायक खबर मिळाली की, एक ईसम हा जिजामाता मंगल कार्यालयाचे बाजुला मैदानात श्रीरामपुर पुसद येथे एखादा घातपात करन्याचे दृष्टीने हातात घातक शस्त्र (तलवार) सोबत बाळगुन आहे. असे गोपनिय माहीती वरुण घटनेचे गांभीर्य ओळखुन डी.बी. स्टॉप. पथकांनी अतिशय कौशल्यपूर्वक सापळा रचुन जिजामाता मंगलकार्य जवळ जावुन आरोपी गजानन शंकर काळे वय २४ वर्ष रा. गुणवंतराव शाळेजवळ श्रीरामपुर पुसद ता. पुसद जि. यवतमाळ यांची कायदेशीररीत्या अंगझडती घेतली असता त्यांचे जवळ एक धारदार व टोकदार तलवार जीची एकुण लांबी ३४ इंच, किमंत ३०००/रुपये ची मिळून आल्याने त्यास घातक शस्त्रासह ताब्यात घेउन त्याचेवर पोलीस स्टेशन पुसद शहर येथे कलम ४, २५ शस्त्र अधिनियम १९५९ प्रमाणे गुन्हा नोंद करुण पुढील तपास डी.बी. स्टॉप करीत आहेत.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक, कुमार चिंता, अप्पर पोलीस अधिक्षक, अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद / उमरखेड हनुमंत गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार सेवानंद वानखेडे यांचे सुचणे प्रमाणे डी.बी.प्रमुख पोउपनि अक्षय सनगर, पो. हवा. मनोज कदम, पो.काँ. शुध्दोधन भगत, पो. काँ. सचिन राउत, पो.काँ. आकाश बाभुळकर, यांनी पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close