ईतर

पुसद वैद्यकीय संघटनेच्या वतीने ‘राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त’ डॉ.सतीश चिद्दरवार यांना सपत्नीक ‘जिवन गौरव पुरस्काराने’सन्मानित!

पुसद : येथील वैद्यकीय क्षेत्रासह ले-आउट बांधकाम शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेले सुपरिचित डॉ.सतीश चिद्दरवार यांना पुसद वैद्यकीय संघटनेच्या वतीने आयोजित ‘आयएमए’ हॅलो मध्ये नुकताच१ जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर्स डे (National Doctors’ Day) दिवसानिमित्त त्यांना ‘जिवन गौरव पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आला. ज्यामुळे डॉ.सतीश चिद्दरवार यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

पुसद वैद्यकीय संघटनेच्या वतीने आयएमए हॉल येथे भव्य कार्यक्रम आयोजित केला होता.यावेळी पुसद वैद्यकीय संघटनेचे डॉ.यादराव सुर्यवंशी, डॉ.अविनाश जाधव, डॉ. वीरेंद्र पापळकर, डॉ .सुरेंद्र बिलोलीकर, डॉ.संजय अग्रवाल, डॉ. संजय भांगडे डॉ.राजेश चव्हाण, डॉ.राजेन्द्र जाजु, आदि डॉक्टरांच्या उपस्थितीत डॉ.सतिश चिद्दरवार यांना सौ. डॉ.सुप्रिया सतिश चिद्दरवार यांच्यासह सन्मानित करण्यात आले.

“हा केवळ पुरस्कार नाही, तर जनसेवेच्या अखंड प्रवासाला मिळालेली प्रेरणा आहे. ज्या अपेक्षेने माझी निवड झाली, त्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी मी अखेरच्या श्वासापर्यंत जनसेवा करीत राहीन,” अशी भावना जिवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ.सतीश चीद्दरवार यांनी व्यक्त केली. यापुर्वीसुध्दा डॉ.सतिश चिद्दरवार यांना ‘लोकमत टाइम्स’ च्या ‘आयकॉन्स ऑफ सेंट्रल इंडिया’ या ‘कॉफी टेबल बुक’ चा नागपूर येथे महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

तसेच आर्य वैश्य समाज डॉक्टर असोसिएशनच्या वतीने ‘सुश्रुत जीवन गौरव’ पुरस्कार सुद्धा मिळाला होता. तसेच पोहरादेवी येथील भक्तीधाम येथे आयोजीत गोर बंजारा एकता संमेलन २०२५ या ऐतिहासीक कार्यक्रमाच्या सोहळ्यात मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पुसद चे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.सतीश चिद्दरवार यांचा विधान परिषद सदस्य आमदार धर्मगुरू संत बाबूसिंग महाराज यांच्या हस्ते विशेष सन्मान पुरस्कार व शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला होता.

आर्य वैश्य समाज डॉक्टर असोसिएशनच्या वतीने वैद्यकीय क्षेत्रात तसेच लेआउट बांधकाम व शिक्षण क्षेत्रात तसेच सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असुन शहरात मागील ४० वर्षापासून निरंकार सेवा देत आहेत डॉ. सतीश चिद्दरवार यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या त्यामध्ये ज्योतिर्गमय

इंग्लिश स्कूल, मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, मेडिकेअर कॉलेज ऑफ नर्सिंग (Medicare College of Nursing), पुसद ची स्थापना करून हे यवतमाळ जिल्ह्यातील एक प्रमुख नर्सिंग शिक्षण केंद्र उभारले तसेच जमीन विकासक(ले-आउट) व बांधकाम क्षेत्रात केलेले विकासकामे तसेच पंतप्रधान निवास योजनेतून नागपूर येथे ९०० च्या वर मध्यमवर्गीय नागरिकांच्या घरांची स्वप्नपूर्ती करून प्रकल्प यशस्वी केला.

आणि केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते सर्वसामान्य घर धारकांना चावी देण्यात आली होती. तसेच आर्य वैश्य समाज बांधवांसाठी आर्य वैश्य समाजाच्या मंगल कार्याकरिता ले-आउटची तीन एकर जमीन अदलाबदली करून समाज हितासाठी सामाजिक बांधील की जपत समाजाच्या ट्रस्टला जागा उपलब्ध करून दिली. त्यामुळे या पुसद उपजिल्ह्यासाठी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला वैद्यकीय संघटनेने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केल्यामुळे हा अभिमानाचा क्षण ठरला आहे. त्यामुळे डॉ. सतीश चिद्दवार यांनी नेहमी जनसेवेसाठी अखंड आयुष्य वेचून घेतल्याचे यावेळी मत व्यक्त केले आहे.

तर डॉ. सतीश चिद्दरवार यांची पुढची पिढी सुद्धा म्हणजे त्यांचे चिरंजीव आणि सुनबाई डॉ.सजल सुप्रिया सतिश चिद्दरवार व डॉ.सौ.दिपाली सजल चिद्दरवार हे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून या पुसद शहरात रुग्णसेवा देत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close